Posts

TK Prosperity Private Limited

Image
२९ मे २०२०... २०१५ शेवटापर्यंत एका मराठी न्यूज चॅनेलमध्ये टाईमपास करत होतो... दुसरीकडे पुण्यात MCA सुरु होतं...! मास्टर्स पुर्ण झालं आणि मी माझ्या मूळ ट्रॅकवर आलो... म्हणजे टेक्नॉलॉजी बेस्ड !... छोटे छोटे प्रोजेक्ट घेणं सुरु होतं... कॉलेजमध्ये कॅम्पस होत होते... फ्लो विथ् फ्लो सारखं सगळे देतात तसं इंटरव्ह्यू सेशन्सही सुरु होते... ... मनात आयुष्यासाठी विशलिस्ट असते - भविष्यात उद्योग उभा करायचाय असं माझ्या विशलिस्ट मध्ये होतं - फेसबुकवर Quotations मध्ये "चांगल्या पगाराची नोकरी करणारा होण्यापेक्षा, चांगल्या पगाराची नोकरी देणारा होईल" हे वाक्य खुप आधीपासून आहे...  MCA होतांना ती इच्छा प्रखर होत होती, आणि त्या इच्छेला त्या दरम्यान हवा मिळाली -  इच्छा म्हणजे एक गोल सेट झालं...! हवा मिळण्याची स्टोरी भन्नाट आहे...  एक मराठी सिनेमा आहे : वन रुम किचन. भरत जाधवचा... त्यात भरत जाधव एका मिलमध्ये काम करतो... चाळीत राहतो... एकदा तो आणि त्याची बायको बायकोच्या मैत्रिणीला भेटायला जातात ... मोठ्ठी सोसायटी, जबरदस्त फ्लॅट... तिथे त्या मैत्रिणीचा नवरा राजेश श्रृंगारपूरे त

Business Motivation Speakers are...

बिजनेस मॉडल, स्ट्रॅटेजीज्, Constitution या गोष्टी कधीच कॉपी करु नये - फुकटचे सल्ले वापरून तर नाहीच नाही. कारण प्रत्येक व्यवसाय, तो चालवणाऱ्याला माणसाचं गोल, स्वभाव, अडथळे, आयडीयाज् वेगवेगळ्या असतात... सणक वेगळी असते... मी तर म्हणतो लोगो, टॅगलाईन, प्रोफाईल्स आणि घटना ही पुर्णपणे स्वतःच्या हाताने लिहावी.... थोडे एक्स्ट्रा लागतील - पण काम म्हणजे काम होईल ! तर आणि तरच कुठल्याही संकटात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचं बळ मिळतं... आपण किती पाण्यात आहे, आणि स्टाफ पाण्यात उतरतोय की कपडे सांभाळतोय, वेळप्रसंगी हातातली अदृष्य दोरी ओढून स्टाफला पाण्यात ओढण्याची आपल्यात धमक आहे की नाही हे सगळं कळतं...! जन्माला घालतो तोच संकटात रक्षण करतो... आपण व्यवसाय उभा केलाय तर तो आपल्यालाच मजबूत करावा लागतो... ... हजारो रुपये घेवून मोटीवेशनल लेक्चर्स ठोकणाऱ्यांच्या नादी लागू नका... ढिगानं रोज जन्माला येतात - जातात... कुठलातरी नितीवाला गेले दहा दिवस फोन करून मागे लागला होता, "व्यवसायिकांसाठी कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानं" यावर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या म्हणून... फि : ३९९९९ फक्त ! प

Police : Are they devils?

पोलीसांनी स्वयंसेवक म्हणून काही पोरं पांढऱ्‍या टिशर्टमध्ये उभी केलीय... त्या पोरांची पोलीसांच्या वर ताण आहे... आत्ता साठ-पासष्ठीतला एक माणूस स्कूटीवरुन जात होता, गाडीवर किराणा सामान. या टोळभैरवांनी अडवलं...  - कुठे निघालास ? त्यांच्या वडीलांच्या वयाच्या माणसाला अरे-तुरे करत विचारलं... त्यांनी किराणा सामान दाखवलं... तोपर्यँत चौघं घोळका करुन उभे राहीले. टोळक्याने लायसन्स मागितलं, लायसन्स घरी विसरल्याचं ऐकताच एकाने चारचौघात त्याची शिव्यांसह अक्कल काढली, एकाने पाठीत काठी घातली, एकाने काठीने गाडीवरची पिशवी उडवून लावली... साखर, तांदूळ सगळं अस्ताव्यस्त झालं... एक पावती फाडायला उभा... त्या टोळक्याच्या चार क्षणांच्या आनंदासाठी एका क्षणात त्या माणसाच्या आठवड्याच्या बजेटची माती झाली... ! . लॉकडाऊनच्या पहील्या टप्प्यात सामाजिक संवेदनशीलतेच्या जाणीवेतून, उन्हातान्हात उभे राहतात, हायरिस्क फ्रंटला सिक्यूरिटी देतात म्हणून मी पोलीसांना पाण्याच्या बॉटल्स, फूड पॅकेटस्, विटॅमीन सी टॅबलेटस वगैरे दिलेले... पण नंतर त्यांच्या असंवेदनशील वागणूकीचे एक एक किस्से समोर आले तर त्यांच्य

Thought of Cities

दहा-दहा लाखाची अवाढव्य महानगरं नाही - ना हजाराचं एकदमच छोटं खेडं... एक लाख लोकांच्या लहान शहरात राहणारा माणूस आज एकदम सुखी आहे. त्याला ना महानगराची धावपळ, ना खेड्याची गैरसोय - जे जेवढं हवं तेवढं, वेळेवर - व्यवस्थित मिळतं ... सामुहीक संकटाची झळ सुद्धा कमी पोहचते ! - ओव्हरऑल मज्जानू शहरी लाईफ !  पोटार्थी लोकांची स्वार्थी गर्दी म्हणजे महानगर, ही लहान शहरं म्हणजे सुखवस्तू कुटूंब म्हणता येईल. महानगरातली लोकं एरव्ही त्याला डाऊनक्लास म्हणत असू, पण आज तीच माणसं आपली किव करताय...!

Open For Business

Image
#OpenForBusiness ... Background : कोरोनाची चाहूल लागताच १३ मार्चलाच आम्ही मुंबई आणि पुणे दोन्ही ऑफीसला वर्क फ्रॉम होमचं नोटीफीकेशन काढलं, दोन दिवसात सगळी सिस्टीम उभारली... आणि १५ नंतर १९ पर्यंतच्या काळात मुंबई-मुंबई उपनगर-ठाणे-पुणे बाहेरच्या असणाऱ्या स्टाफला फॉर सेफसाईड गावाकडे पाठवलं... दरम्यान २२ पासून ट्रेन्स, बस, डोमेस्टिक फ्लाय सगळं बंद झालं... लॉकडाऊन लागलं... आम्ही १३ पासूनच तयारी केल्याने आमची सेफसाईड स्टेप योग्य ठरली... अपेक्षित होतं की फार झालं तर १५ एप्रिल पर्यंत सगळं आवरलं जाणार... आणि महिनाभराचा बॅकलॉग पुढे दिड महिन्यांत सहज भरून येईल... ! पण परिस्थिती हाताबाहेर गेली... मुंबई - पुण्यात कहर झाला... त्यामुळे आता सगळं इतक्यात सुरु होईल असं वाटत नाही... (Off the record : किमान ३१ जुलै पर्यंत सगळं  सुरळीत होईल असं वाटत नाहीय... त्यानंतरही उभं राहतांना दिवाळी उजाडेल...) वर्क फ्रॉम होम मूळे प्रॉडक्टीविटी निम्म्यावर येते, पेमेंट टर्मस् ९० दिवस - त्यामूळे हे पेमेंटही जुलैत मिळेल... आणि सध्या प्रत्येक कंपनी कठीण काळातून जात असल्याने आधीच्या इनव्हॉईस क्लियर होत नाहीय...

Meanwhile...

Meanwhile... ... १. बाळ झाल्यानंतर तेजूला आणि बाळाला तिच्या माहेरून घरी परत आणायची तयारी होत होती, तेव्हा फेब्रुवारी एन्डला ती गमतीत बोललेली "मी आता मे शिवाय येणार नाही"... बहूतेक कोणतातरी पक्षी सुमडीत तथास्तू बोलला आणि अडकली... सॉलीड खोड मोडली गेली... आता अर्धा जूनही तिथे काढावा लागतो की काय असं झालंय... ! ... २. यूएसएची अति क्रेझ होती... तिथले प्रोजेक्टस् घेण्यासाठी - जाण्यासाठी जीव तोडायचो... यूएसए भिनलं होतं... तेच ते डोक्यात... २०१९ जानेवारीत एक प्रोजेक्ट मिळाला, २०१९ डि सेंबरपासूनच जाण्याची तयारी सुरू केली - २०२० मे मध्ये जायचं ठरलं... पुर्ण तयारी झाली आणि कोरोनाने यूएसची काशी केलीय... आता धास्ती बसलीय... जायची इच्छा आणि क्रेझ संपली... कुणी फुकटही नेलं तरी किमान तीन वर्ष जायची हिंमत होणार नाही... ... ३. १६-१७ ला मुंबईहून पुतणीला भेटण्यासाठी धुळ्याला आलो, २२ ला लॉकडाऊन लागलं... वाचलो... तिथे एकटा असतो तर "हाल"चा लाईफटाईम अनुभव मिळाला असता... मला चहा येतो फक्त, तो पण धड बनत नाही... बाकी कामाची बोंब... जे होतं चांगल्यासाठी होतं...! ... ४. फार डोकं उठलं तर दवंडी

Maharashtra Police's Shameful Behavior

एबीपी वर व्हिज्युअल्स दाखवतायेत औरंगाबाद, ठाणे वगैरेचे... साध्या वेषातले पोलीस जो दिसेल त्याला काठीने मारताय... कुणी लेडीज असेल, भाजी घेवून जाणारा माणूस, वयस्कर माणूस कुणालाही सोडत नाहीयेत... एक ४०७ मालवाहू गाडी होती, ज्यात कुठलंतरी आवश्यक सामान असेल... चालू गाडीची काच एका पोलीसाने काठीने फोडली... तो गाडीवाला जखमी होवू शकतो... कशाचीच पर्वा नाही... ... जो खरा टवाळखोर असेल तो ठीक, पण जो माणूस Genuine असेल, भाजी-दुध-किराणा-औषधं घेवून जाणारा असेल, पुणे-मुंबईत जे एकटे राहणारे अडकले ते काही सामान घ्यायला जाणारे असतील, ज्यांना ताप-सर्दी सोडून इतर आजारासाठी हॉस्पिटलला जावं लागणार असेल, एखाद्या माणसाचे जवळचे वृद्ध नातेवाईक आजारी असतील, काहीही इमरजन्सी असू शकते त्यासाठी बाहेर पडणं अत्यावश्यक असेल, त्यांना अडवण्यासारखं काय आहे ? आणि अडवलं तरी कारण ऐकून फक्त पॉवर आहे म्हणून काठीने मारायचं ? ... मूळात मुमंनी पोलीसांना प्रॉपर गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत. संचारबंदी-जमावबंदी यात ते स्वतः कन्फ्यूज्ड वाटतात, लोकं गोंधळलेली आहेत... आजारापेक्षा या तुघलकी गोंधळानेच उत आणलाय... ... कोरोना जाईल, सगळं ठीक होईल

Lockdown Advice

लॉक डाऊनचा पहिला दिवस आहे... त्यात रविवार ! पुढे किमान १० ते १५ दिवस असेच काढायचे हे डोक्यात ठेवा - घरातल्या हिटलर समोर एखादा इकडचा तिकडचा शब्द सुटणार नाही याची काळजी घ्या, चुकूनही - अगदी चु-कू-न-ही कुठलाही पंगा घेवू नका... घाबरून घाबरून रहा...! सतर्क रहा !... ... त्यावर पुढचा लॉकडावून काळ सुसह्य राहणार की असह्य होणार हे ठरणार आहे...! ... एखादं प्रकरण अंगाशी आलं तर ते सोडवायला सरकार येणार नाही...! ... अजून सुसह्य करण्याची ट्रिक सांगू ? घरातलं एखादं काम हाताशी घ्या, आणि आपली कीव येईपर्यंत तेच तेच काम करा... उदा. जाळं काढा, भांडी घासा... थोडंच करायचं - पण स्लो मोशन मध्ये करायचं, दाखवून दाखवून करायचं...! खुप केलं असं वाटायला हवं ...! दोन-अडीच तास त्यात इन्व्हेस्ट करायचे... कीव येईपर्यंत...! या दोन तासांच्या इन्वेस्टमेंटवर पुढचे पंधरा दिवस राजा सारखं राहता येईल ! .. (काय केलं याचे फोटो टाकू नका, आपलं सुसह्य करण्याच्या नादात दुसऱ्याचं असह्य करू नका ! .... आणि... . . थँक यू वगैरे म्हणायची गरज नाही... खुश रहो !...) ... - तेजस कुळकर्णी

#MaharashtraNeedsDevendra

# MaharashtraNeedsDevendra ... देवेंद्रजी मुख्यमंत्री असतांना कुठल्याही संकटात स्वतःच्या जबाबदारीने, स्वतः वॉर रुम मध्ये बसून परिस्थिती हाताळत... आणि दुसरीकडे आत्ताचे मुख्यमंत्री हुजरेगिरी करणाऱ्या पत्रकार, कार्यकर्त्यांची खुषमस्करी गर्दी घेवून गर्दी करू नका सांगताय... ! ... देवेंद्रजी सीएम असतांनाही अनेक अस्मानी संकटं आली, पण कधी भिती वाटली नाही... कारण त्यांची डिसिजन मेकींग पॉवर... आणि त्याच निर्णयावर ठाम राहण्याची धडाडी... कोरोना सारख्या गंभीर संकटात देवेंद्रजींनी योग्य निर्णय घेतले असते... तिघाडी सरकारमध्ये जिथे मंत्र्यामंत्र्यात ताळमेळ नाही, गोंधळ घालतंय - तिथे देवेंद्रजींनी एकहाती यंत्रणा सांभाळली असती. ... रुग्ण-संशयित पळून जाताय, त्यांना धीर नाहीय, लोकांमध्ये भिती आहे, व्यवहार ठप्प होताय त्या परिस्थितीत देवेंद्रजींनी धीर दिला असता, पण रुग्ण वाढू नये यासाठी जनतेला विश्वासात घेवून लोकल सेवा बंद कठोर पावलं उचलली असती... गावी जाणाऱ्यांसाठी बसेस, मदतीसाठी जागोजागी बूथ आणि योगी सरकारने जशी मदत केली तशी मदतही देवेंद्रजींच्या सरकारने केली असती. ... आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजि

खाSSरे

#गोड_गोष्टी ... तेजू आणि माझं लेकरु तिच्या माहेरी सेलूला आहे... ते पुढच्या महिन्यात येतील... त्याला मी पंधरा - वीस दिवसांत भेटायला जातो... आणि कधी कधी माझे मम्मी पप्पा सुद्धा सोबत असतात...  लेकराला माझ्या पप्पांचा आवाज, स्पर्श खूप कळतो...  आणि कितीही रडत असला तरीही पप्पांनी त्याला एकदा हाक मारली की गप्प बसतो... हसतो...! रडत असला तर पप्पा त्याला "का रे बाळा ... का रडतोय ?'' हे म्हणतात... त्याला ते "का रे बाळा" एकदम ओळखीचं झालंय...! पप्पा बोलले की तो हाताने ये ये करतो..! ... आज लस देवून आणलेली तर एकदम गाढ झोपला होता - तेजूच्या कॉलनीत खारे शेंगदाणे वगैरे विकणारी गाडी आली, तो माणूस "खाsssरे" म्हणत ओरडत होता... ते "खाsssरे" गाढ झोपलेल्या लेकराच्या कानावर आलं... त्याला ते "का रे - का रे" ऐकू आलं, आणि वाटलं पप्पा आले... लेकरु खुश होवून हसायला लागलं... हाताने ये ये सुरु केलं ... तो आवाज जसा जसा कमी होत गेला तसं त्याला कळलं आणि चेहऱ्यावरचं हसू सुद्धा कमी झालं... आवाज बंद झाला आणि लेकराने जोरदार भोंगा पसरला... ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved