Posts

Showing posts from 2017

Rafi

Image
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ... . "माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुल

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात. .. पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो. .. ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... !  त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झा

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग २

Image
गेल्यावर्षापर्यंत आयुष्यात सगळ्यांच लेव्हलवर परीक्षा सुरु होती. साडेसातीचा अति जास्त प्रभाव पडला. कंपनी सुरु केली, पण प्रोजेक्ट नव्हते. पगार देणं दूर माझा स्वतःचा खर्च काढणं कठीण झालं होतं. रडकुंडीला येणं काय असतं ते या दे या डो अनुभवत होतो. अश्या अवस्थेत सगळ्यांत वाईट काय होत असेल तर ते म्हणजे देवधर्म गुंडाळून नास्तिकता वरचढते... त्याच सर्वोच्च बिंदूवर पोहचलेलो... . घरी सगळे महाराजांवर विश्वास ठेवून कामं करतात. आणि दर दोन - तीन महिन्यांत शेगांवला जातोच जातो. पण तो एक फेज होता जेव्हा तीन वर्ष आम्ही या ना त्या कारणाने तिथे जावू शकलो नाही... जायचं ठरलं की काहीतरी अडकायचं... एक दिवस ठरवलं आणि गेलोच... महाराजांनी बोलावलंय म्हणजे काहीतरी चांगलं होणार हा विश्वास होता. तिथे गेलो, दोन दिवस त्यांच्या सानिध्यात राहीलो. "बाबा थोडी दया येवू द्या..." मनापासून सारखी प्रार्थना केली... खरं सांगायचं तर त्या वेळी एक रुपयाही हातात नव्हता, चेहऱ्यावर बारा वाजलेले... महाराजांजवळ समाधी मंदिर परीसरात बसलेलो, डोळे डबडबलेले... मन शांत झालं, पुढच्या वेळी येतांना काहीतरी चांगलं होईल मनात वाटत होतं. आण

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग १

Image
दैवी म्हणाल तर माझी गजानन महाराजांवर प्रचंड - infinite - आभाळाएवढी श्रद्धा आहे... कितीही मोठे प्रश्न असू देत ज्यांच्यापुढे गेल्यावर माझं अंतर्मन खऱ्या अर्थानं शांत होतं, शक्ती मिळते... त्यांचं मंदिर माझं घर असल्यासारखं वाटतं, ते प्रश्न मनात घेऊन त्यांच्यासमोर जातांना कधीच रिकाम्या हातानं परत येणार नाही हा विश्वास असतो. माझं सगळं काम त्यांच्यावर विश्वास ठेवूनच करतो, गजानन महाराज जळी स्थळी काष्टी पाषाणी सदैव माझ्या सोबत असतात... त्यांचं माझ्यावर पूर्ण लक्ष असतं याची जाणीव असते. कधी जर माझ्या मनातली नकारात्मकता वरचढ होत असेल तर महाराज त्यांचं अस्तित्व तिथे दाखवतात... दर्शन देतात - ते माझ्या सोबत असल्याची जाणीव करुन देतात... कधी प्रेमाने, चुकलं तर तडाखा देऊन, कधी कुठल्या ना कुठल्या रुपानं दर्शन देऊन... त्यांनी बोलावलं तर क्षणाचीही विसंब न घेता शेगांवला जायची ओढ लागते, कधी ती ओढ समजून घेत ते स्वतः बोलावणं पाठवतात... "अशक्य ही शक्य करतील स्वामी" या उक्तीचा ते प्रत्यय देतात... अशीच एक अनुभूती काल मिळाली, "मी आहे ना" त्यांनी ही जाणीव करुन दिली... एकदा नव्हे - अनेकदा... ! कध

Year To Demonetization

प्रथेप्रमाणे नोटबंदीची आठवण काढतोय... फाऊल धरण्यात येवू नये ही विनंती... ! १०००-५०० च्या नोटा गेल्यावर्षी याच तारखेला बंद झाल्या... त्याच्या मोजून सहा तास आधी ; चार पाच जन्म मिळून काहीतरी पुण्य केलेलं आडवं आलेलं, आणि हातातली कॅश घरात नको म्हणून अवघी रक्कम बँकेत भरण्याची सुबुद्धी अस्मादिकास झाली... ! दोन दिवस शेगांवला जायचं होतं, त्यामूळे तिथे लागले तर एटीएम मधून काढता येतील असंही डोक्यात होतं. . त्यामागच्या जन्माचंही पुर्ण पुण्य बॅलेन्स होतं की काय म्हणून वरखर्चासाठी १५०० रुपये पन्नास-शंभराच्या नोटा ठेवलेल्या. एकुण पुण्यावर व्याज मिळावं तसं बँकेतून येतांनाच पेट्रोल भरायचं आठवलं म्हणून १००० रुपये बँकेतूनच काढले - १००चं पेट्रोल भरून ९०० रुपये १००च्या नोटांत मिळाले... ! - सबब ८ नोव्हे. सायं ६ वाजता ५०-१०० च्या नोटांत २४०० रुपये हातात होते... .. अचानक नोटबंदी झाली - आनंदाची उकाळी फुटली - कारण १ : ओव्हरऑल गोंधळ बघायला मज्जा येणार... कारण २ : काहीतरी जबराट घडतंय सो, It's an honor to be a witness of big change... कारण ३ : पैसे होते, बाकी सबकुछ ऑन पेपर - टेंशन नाथी... .. कॅशलेस

DSK डिएसके

डिएसके... ! काल एका गृपवर चर्चा रंगली होती. डिएसके संपवण्यामागे राजकीय आणि प्रतिस्पर्धी गटाचा हात आहे, डिएसके गरीबीतून वर आले, मोदींच्या नोटबंदीने पहिली विकेट घेतली, डिएसके ब्राह्मण आहेत / सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून काहीही झालं तरी त्यांचं समर्थन करायलाच हवं, डिएसकेनी बँकेकडे हात पसरले नाही, पुण्यात मध्यमवर्गीयांना घरं दिली - आणि लास्ट बट नॉट लिस्ट - डिएसके गोत्यात आणून पुण्यानं पायावर कुऱ्हाड मारुन घेतली ! .. बाजू १ : ज्या गुंतवणूकदारांनी दहा लाख - तीस लाख - पन्नास लाख गुंतवले त्यांनी ही कुऱ्हाड मारून नाही, तर स्वतःच्या हातानं घालून घेतलीय. हावरटपणा नडला. एमएफ, एफडी, स्टॉक्स सारखे भरभक्कम पर्याय असतांना जास्त व्याज मिळवण्यासाठी बेभरवश्याच्या म्हशीवर बसले - आणि आपटले. त्यामुळे "सहानुभूती" वगैरे बिलकूल नाही. रोज अश्या स्किम्स येतात - जातात, पतपेढ्या बंद पडतात, सरकार रोज सावधानीचं आवाहन करतं - तरीही - आत्महत्या करणाऱ्याची मानसिकता बदलू शकत नाही. - पाणी पण फुंकून प्यायच्या युगात पेट्रोलचा वास येवू नाही हे लोभ / हावरटपणा डोक्यावर गेल्याचं लक्षण आहे !  ... बाजू २ : डिएसके : व्

Diamond Set and Saree

प्रसंग १ : स्थळ : घरी पात्र : मी आणि आई... मी मुंबईहून सकाळीच आलो, चहा घेता घेता - मातोश्रींनी स्वतःच्याच दुकानातून चार - पाच साड्या आणलेल्या. त्यापैकी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली नेसायची याचा सल्ला घेणं तिचं सुरु होतं... साड्या वगैरे बाबतीत मला अक्कल नाहीय हे माहीत असुनही माझा सल्ला मागितला याचं विशेष कौतूक वाटत होतं... आलेल्या संधीचा फायदा घेत, उगाच भाव खाण्यासाठी अनुकमे तीन साड्यांवर विस्तृत चर्चा केल्यावर - आणि त्या का नको याचं विशेष वर्णन ऐकून कंटाळलो... मी - तुझी यापैकी कुठली ठरलीय ? मातोश्री : ही ग्रीन कलरची. मी - (मूळ मुद्दा लक्षात आला) "छान आहे ! " कर फायनल ! सेम सिन पप्पा आणि तुषारबरोबरही झाला... . प्रसंग २ : स्थळ : फोन + व्हॉटस्अॅपवर पात्र : मी आणि ती.. (फोनवर) ती : तेजा, मी तुला काही डायमंड सेटस् चे फोटो पाठवतेय. त्यातला छान असेल तो सजेस्ट कर... मी : मला काय कळतंय त्यातलं. जो आवडेल तो घे... ती : सजेस्ट कर म्हणतेय ना तर कर... व्हॉटस्अॅपला तीन फोटो आले. त्यातल्या एकावर कॅप्शन "हा बघ किती छान आहे...." (फोनवर) ती : कुठला छान वाटतोय ? मी

जगजितसिंह

Image
दुःख, विरह हे सुद्धा अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांनी पटवून दिलं... त्यांनी प्रेमात पडलेल्या काळजाची तार छेडली तसंच प्रेमभंगातल्या दुःखातून पाझरणाऱ्या अश्रूंचं गीत केलं... एकीकडे प्रेमाची थंडगार वाऱ्याची झुळूक दाखवली, दुसरीकडे विरहातली हूरहूर ... "सॉंसे देकर अपनी संगीत अमर कर दो"... म्हणत या माणसानं गझल अमर केली... .. संध्याकाळ पासून चढत जाणारी रात्र, थंडगार वारा, मंद प्रकाश - आणि जगजितसिंगांची गझल... हि अनुभवण्याची गोष्ट आहे... "प्यार का पहला खत" पासून सुरुवात करायची, तुम को देखा तो ये खयाल आया, झुकी झुकी सी नजर, सरफरोश मधलं होशवालोको खबर है क्या, तेरी खुशबू मे बसे खत, तुम इतना जो मुस्कूरा रहे हो" ही गाणी करत करत संध्याकाळ संपता संपता - "कही दूर जब दिन ढल जाऐ" वर यायचं... गझल ही नशा आहे... रात्र चढते तशी गझल चढणार... जगजितसिंगांचा गंभीर आवाज - आणि रात्र... हा एकांत हवाहवासा वाटणारा, अनुभवण्यासारखा असतो... चढत्या रात्रीसोबत "होठो से छू लो तूम...." ऐकायचं. कुठलीही गझल एकदाच ऐकून मन भरणार नाही - पून्हा पून्हा ऐकायचं... "होठो से" तर

Guilt for forever

= Guilt for forever = माझी पणजी, माईआजी गेल्या तेव्हा मी ८ - ९ वर्षांचा असेन. त्या गेल्या, पण जन्मभराचा एक अपराध माझा जीव घेतो. दसरा आणि त्यानंतरचा हा दिवस आला की माझं मन सैरभैर होतं, बेचैन होतं. कधीही न भरून निघणारी, प्रायश्चित्त घेता न येणारी हूरहूर दाटते... . माईआजी वर्षभर बेडवरच झोपून होत्या, पण त्यांचं बोलणं व्यवस्थित होतं... दसऱ्यालाही दुपारी १२-१२:३० पर्यंत सगळं चांगलं होतं... दसऱ्याचा दिवस म्हणजे आमच्याकडे नवरात्राचे उपवास संपून कुळधर्म असतो. आईनं माईआजींना सकाळी चहा, नाश्ता दिला... दुपारी १ वाजता त्यांना मी पाणी दिलं... पाणी देतांनाच "भूक लागलीय, जेवायला वाढायला सांग" असं अडखळत बोल्ल्या... त्यांना दुसऱ्या मजल्यावर एका रुम मध्ये ठेवलेलं. तिथून खाली किचनमध्ये आलो... आई त्यांचंच ताट वाढत होती, माईआजींच्या जेवणाकरता आम्ही तेव्हा  सोवळं, नैवेद्य हा विचार करत नव्हतो... त्यांना देणं नेहमीच महत्वाचं होतं... मी आईला सांगणं ते तिचं वाढणं यात पंधरा मिनिटं गेले, त्यांचं ताट घेऊन आई वर आली तोवर माईआजी कोमात गेलेल्या... हाका मारल्या, डॉक्टर्स बोलावले, प्रार्थना केली पण ती घटीका

Mumbai Elfisten Station Accident

मुंबईत आल्यानंतर वर्षभरात मी महत्वाचं शिकलोय ते म्हणजे भावनाशून्य राहणं... इथे भावनांना काडीचीही किंमत नाही, तुमच्याभोवती लोकं मरताय, महापूर आलेय, कुणीही येऊन शहराची वाजवून जातंय ... "स्साला रोज का यह्हीच लफडा है यहाँका"... म्हणून  सोयीस्करपणे डोळे झाकून जगणं म्हणजे मुंबई स्पिरीट... यात जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत रोजची जी झक मारायची ती मारावी लागणार आहे... कुणी हात धरणारं नाही - आपलं ओझं आपणंच वाहणार... . मुंबई म्हणजे कुठलं शहर नाही, रस्ता नाही, इमारत नाही - संवेदना मेलेला इथला एक एक माणूस म्हणजे मुंबई. त्याचं स्पिरीट त्याचं जगणं आहे. ना कुठल्या कौतूकाचं मोहताज - ना टिकेचं मिंधं... !... ... एल्फिस्टन परेल रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली !

World's Daughter Day जागतिक कन्या दिन

Image
मुलगी असणं भाग्य समजलं जातं. मुलगी खरं तर घरातली पाहुणी समजावी अशी आपली समाजव्यवस्था, पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, माणसं यांना ती असते तोपर्यंत समजूतदारपणे, मायेने जपते, सांभाळते.. जीव लावते... दुखण्यावर तिची एक फुंकर पुरेशी असते... मुलगी घराचा आत्मा असते. स्त्रीरुपाला निसर्गाने उपजत काळजीचं काळीज दिलेलं असतं, त्या काळजीनं घरातली मुलगी आई-वडील-बहिण-भाऊ यांच्यासाठी अदृष्य आधार असते, ती आईला घरात मदत करते - वडिलांच्या मागेही तितकंच खंबीरपणे उभं राहते... मुलगी खरा आधार असते... जिच्यावर घर सोपवून आईवडील निश्चिंत होतात... तिला जबाबदारीचं कोंदण असतं, आई - बाबा दोघंही तिच्याजवळ मनमोकळं रडू शकतात... त्या दोघांनाही समजून घेण्याचं मन तिच्याजवळ असतं... ती पाझरणारं मातृत्व असते - त्या मुलीला कधी आई-बाबांची आई व्हावं लागतं, कधी घरातल्या बाबांची जागा घ्यावी लागते... .. "त्याग" या शब्दाला पूरेपूर जागण्याऱ्या मुली असतात... आईबाबांच्या मुली... ! एक दिवस त्यांचं घर, आईबाबा यांना सोडून कायमचं दुसऱ्या घरी, दुसऱ्या माणसांत जायचं... ज्या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत मायेनं जपली, सांभ

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved