Posts

मोदीजींच्या भाषणातले मुद्दे !

मोदीजींच्या भाषणातले मुद्दे ! दि. ३१ डिसेंबर २०१६ : सायं १९ : ३० ते २० : १४  ... १. देश शुद्धी यज्ञाकडे जातोय. २. लोकांना वाईट काळ सहन करावा लागत होता. पण वाईटावर विजय मिळवण्यासाठी देश लढला ! प्रत्येक भारतीय चांगल्यासाठी प्रयत्नशील आहे. इतिहासात पहिल्यांदाच जनता आणि सरकार एकत्र आहेत. ३. लवकरात लवकर बँक सामान्य स्थितीत येण्यासाठी प्रयत्न करणार.  ४. १०००-५०० च्या नोटा काळ्याबाजारात, parallel economy मध्ये जास्त होत्या. ज्यामुळे महागाई वाढली. ते संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय. भारताच्या समकक्ष अर्थव्यवस्थेत सुद्धा इतका पैसा नाही. ५. मोदींकडून नागरीकांचं भरभरुन कौतुक. जर शास्त्रीजी, जे पी असते तर त्यांचे भरभरून आशिर्वाद मिळाले असते. ६. फक्त २४ लाख लोकं १o लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे हे प्रामाणिकपणे स्विकारतात. पण चतुराईने भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे रस्ते बंद. ७. बँक कर्मचाऱ्यांचं, पोस्ट ऑफीसच्या लोकांचं कौतूक. पण त्यातही काळाबाजार करणाऱ्यांना सोडणार नाही. बँकांना आवाहन. गरीब कल्याण वर्षात गरीब आणि मध्यमवर्गासाठी धोरणं आखा.  ८. योजना १ : प्र. आ. यो. अंतर्ग...

सजल नयन नीत धार बरसती

अजित कडकडे समोर गात असावे... त्या मैफीलीत त्यांना "सजल नयन नीत धार" ची फर्माईश करावी... त्यांनी ती स्विकारावी आणि, षडज् लाऊन, आलाप घेत - मखमली आवाजात "सजsल नयनs नीsतs धाssर बरसती..." सुरु करावं... ... ऐकणाऱ्याचे कान - गाणाऱ्याचा गळा तृप्त व्हावा... त्यांना वन्समोअर द्यावा... आणि "वीणेचे स्वर अबोल झाले..." पासून पुन्हा त्या स्वर्गात रममाण व्हावं... ... ही इच्छा पूर्ण होण्यासाठी सात जन्माची पुण्य हवी... :-) :-) #इच्छा #ख्वाब वगैरे

Yeshu Christ

Image
येशूचा जन्म ही त्याकाळातली अतिशय महत्वाची घटना होती. आपला कृष्ण जसा ‘माणूस’ म्हणून ‘आपला’ वाटतो, तसाच येशूही त्याच्या आयुष्यातल्या मानवी दु:खांमुळे ‘आपला’ वाटतो.. एकाचा जन्म कारावासात झाला, दुसऱ्याचा गोठ्यात.. दोघांच्या जीवावर राज्यकर्ते उठलेले.. दोघांनी मनुष्य समाजाला वागणुकीचे आदर्श घालून दिले. फक्त कृष्णाच्या आयुष्यात जे भरजरी रंग होते, ते येशूच्या आयुष्यात नव्हते.. तरीही, ‘प्रत्येकाला आपला क्रूस आपणच वाहून न्यायचा असतो,’ हा त्याने दिलेला मोठ्ठा धडा..! येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी सगळं जगच रानटीपणाच्या आधीन होतं. मग ते कुणीही असोत. तोच हिंस्त्र रानटीपणा येशूच्या वाट्यालाही भरपूर आला. कदाचित त्यामुळेच त्याच्यातली करुणा अधिक लखलखीतपणे झळाळून उठली. येशूची धर्मस्थापना आणि त्याच्या प्रसार, प्रचाराशी मला काही घेणं नाही. तसंही ख्रिस्ती धर्मासाठी येशूपेक्षा जास्त काम त्याच्यानंतर आणि त्याच्या हयातीतही त्याच्या शिष्यांनीच जास्त केलंय. मला येशू ख्रिस्ताबद्दल जे प्रेम, माया आहे, ती ‘माणूस’ म्हणून आहे.  आज त्याचा वाढदिवस..!! त्याने ज्या करुणेचा कायम पुरस्कार केला, त्या करुणेचा स्पर्श ...

कट्टर हिँदूत्वईद किँवा नाताळ

ख्रीसमास, सेंटाक्लॉस या गोष्टीतून मिळणारी मज्जा महत्वाची... ते म्यूजिक, केक्स्, चॉकलेट्स, डान्स हे सगळं करण्यासाठी कुठल्याही धर्माचं, पंथाचं बंधन नाही... ... प्रत्येकच गोष्टीला विरोध नै रे भो... गुढीपाडव्याला डोक्याला फेटा बांधून श्रीखंड खाऊन ऐटीत मिरवणूकीत चालावं, तिथे अभिमान मिरवावा... तर ख्रीसमासला मस्तपैकी सेंटाची टोपी घालून केक खात  डान्स करावा... कधी कधी हाजीअलीला जाऊन समुद्राचे तुषार झेलत शांतता मिळवावी... गुरुद्वारात मिळणारा शिरा दुसरीकडे कुठे मिळेल ? आपल्याला मिळणारा आनंद महत्वाचा... श्रद्धा-अंधश्रद्धा सब झूठ... सगळे करतात म्हणून विरोध नकोच ! ... ते कुठे आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात ? बरं - तुमच्या ओळखीत "ते" किती ? तुम्ही त्यांना दिवाळीला फराळाला तरी बोलावतात ? ... ख्रीश्चन मित्रांकडे जाऊन आज फूल टू मज्जा करणार... दिवसभर ! केक हादडणार, डान्स करणार, अगदी चर्चमध्ये जाऊन कॅन्डल पण लावणार...! आज तर एका सात आठ वर्षांच्या छोट्या मैत्रीणीने चार चार वेळा फोन करुन बोलावलंय... तिने ख्रिसमास ट्री वगैरे सजवलाय... भैया - सेंटाक्लॉस बनके आना, गिफ्टस् ला...

सांताक्लाॅज

Image
सांताक्लाॅज  !! ख्रिसमसच्या दिवसांत एक काल्पनिक पात्र सर्वांच्या नजरेसमोर येते आणि ते म्हणजे सांताक्लाॅज होय ! लाल गोंडा असलेली टोपी , हिमासारखी शुभ्र दाढी , घेर वाढलेले पोट , पाठीवर बक्षिसांनी भरलेली झोळी व लाल रंगाचा अंगरखा घातलेले हे आजोबा लहान मुलांमध्ये तुफानी लोकप्रिय आहेत . ते आठ रेनडिअरने ओढलेल्या गाडीवर बसून येतात , मुलांनी दिलेल्या यादीप्रमाणे बक्षिसांचे वाटप करतात व कुणाला कानोकान खबर न देता गुपचूप अंधारात गडप होतात असा सर्व बच्चाकंपनीत समज आहे . जगभरातून कितीतरी लाखो करोडो पत्रे डिसेंबर महिन्यात  सांताबाबांसाठी त्यांच्या फिनलंड येथील घरच्या पत्त्यावर पाठवली जातात व लहान मुले मोठ्या आशेने रात्री आपल्या थैल्या , पिशव्या,  साॅक्स खुंटिला अडकवून सांताबाबांच्या येण्याची वाट पाहत झोपी जातात . . सांताक्लाॅज ची कल्पना कशी ऊदयास आली , ह्याची एक कथा सांगितली जाते . एकदा एका गरीब माणसाला आपल्या तीन मुलींच्या लग्नासाठी पैशाची अत्यंत चणचण भासली होती . वेळेवर पैसे मिळाले नसते तर कदाचित त्याच्या तीनही मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या असत्या. त्या वेळी निकोलस नावाच्य...

व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव...

व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव... ... मी व्यवसायात जवळपास प्रत्येक व्यक्तीशी व्यवसायापल्याड नातं जोडतो. त्याचे गोड अनुभव येतात. आजची गोष्ट... ... एका प्रोजेक्टच्या पेमेंटचा चेक देण्यासाठी काल क्लायंटचा फोन आला... इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर.. . क्लायंट - मि. कुलकर्णी... कितना पेमेंट है आपका ? और चेक कब का करु ? मी - सर, Thirty Two Thousand आपका बिल अमाऊंट है, और ड्यू 10th January का है... क्लायंट - हमारा तो ऑलमोस्ट काम हो गया है... तो 10th January तक वेट क्यो ? . काम पूर्ण झाल्याशिवाय आणि ठरलेल्या स्लॅबशिवाय पैसे घ्यायचे नाही हे तत्व मी पाळतो... पारदर्शकता टिकवण्यासाठी... आणि सगळं सुरळीत राहतं... त्यामुळे १० जानेवारीच्या आधी पेमेंट नको हे फिक्स होतं... हे या वर्षातलं शेवटचं पेमेंट...! .. मी - सर, ऐसा करो ना, 16th January का बनाओ... नये साल ही बोहनी आपके हाथ से... क्लायंट - (हसत...) क्यो ? आपका नया साल १५ दिन बाद आता है ! मी - जी हॉं... मेरा बर्थडे है उस दिन... और कंपनी की फर्स्ट एनिवर्सरी... उस दिन पेमेंट मिलेगा तो पहला दिनही बढिया होगा... क्लायंट... :...

"लग्न कधी करतोएस?"

"लग्न कधी करतोएस?" एक शाळकरी मित्र अनपेक्षित ठिकाणी भेटला आणि hi-hello झाल्याझाल्या त्याने पहिला प्रश्न हाच विचारला. काय करतोएस, कुठल्या क्षेत्रात करिअर घडवत आहेस, पुढे काय प्लॅन्स आहेत...हे काहीच नाही. सर्वप्रथम "लग्न कधी?!" हा प्रश्न. तेव्हापासून हा प्रसंग डोक्यात घट्ट बसलाय. २४-२५ वर्ष वयाच्या भारतीय/मराठी मुलामुलींमधे "लग्न" हा विषय प्रायोरिटीचा असू नये, असं अर्थातच नाही - पण "टॉप" प्रायोरिटी करिअर, आपली पॅशन, भविष्य...ह्यालाच असायला हवं. मुद्दा पैश्याचा नसून कर्तृत्वाचा आहे. ऐन उमेदीच्या काळात चहूकडे उभ्या असलेल्या संधी हुडकून काढण्यात सर्वाधिक ऊर्जा खर्च व्हायला हवी. आपली आवड-छंद-पॅशन ओळखण्यावर आणि त्यातील कौशल्य प्राप्त करण्यावर आपण भर द्यायला हवा. जे करतोय - बोलतोय, लिहितोय - ज्याची सर्वाधिक चर्चा करतोय - त्यातून सतत स्वतःत value addition व्हायला हवी. आणि हे, खरंतर, आपोआप व्हायला हवं. पण तसं घडताना दिसत नाही. "भारत हा तरुणांचा देश आहे" हे भारताचं बलस्थान नाही. जो पर्यंत तरुणांच्या priorities योग्य नसतील, तो पर्यंत अज...

लाईव्ह लतादिदी

इतक्यातच, लोकल टिव्हीवर लतादिदींचा जुना लाईव्ह परफॉर्मन्स दाखवत होते... सर्फ करता करता लतादिदी कभी खुशी कभी गमचा आलाप घेतांना दिसल्या.... हात तिथेच थांबले... धडधड वाढली... . समोर हजारो लोक... पिन ड्रॉप सायलेंस... मागे दिडशेचा वाद्यवृंद-कोरस अग्रभागी लतादिदी... आणि त्यांच्या उपमा देऊ शकत नाही अश्या गळ्यातून वाहणारं गाणं... ... ते पाच मिनिट... लतामय... पुर्णपणे...  कभी खुशी कभी गम गाणं... मी सोफ्यावरुन उतरुन जमीनीवर बसलो... त्यांचा एक एक स्वर अक्षरशः अनूभवत होतो... ... लतादिदींचा आवाज ऐकला तरी त्यांच्या भेटीतले ते साडेअठरा मिनिट समोर उभे राहतात... ते साठेअठरा मिनिट मी पुन्हा पुन्हा जगतो... क्षण न क्षण... ... मी भान हरवलेला... त्या ठिकाणी जाऊन पोहचलो...  गाणं संपलं... त्याच क्षणी ताडकन उठून उभा... हात जोडलेले... डोळे भरलेले... .. लता मंगेशकर प्रत्यक्ष्य ऐकणं साधं काम नाही, टिव्हीवर बघून हे होतं... प्रत्यक्ष्य ऐकतांना स्वर्ग असेल... काही लोकं जादू करतात... - तेजस कुळकर्णी

तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात...

३० डिसेंबर पर्यंत जुन्या नोटा बदलण्याची मुदत दिलेली, आता सरकारने त्यासाठीपण गोबोगा मारलीय... आता ५००० रु पेक्षा जास्त रक्कम असेल तर कारण द्या, नंतर दोन बँक ऑफीसर्स ठरवणार ते योग्य की नाही... नंतर पुढची प्रोसेस..! म्हणजे जर तुम्ही दोन महिने गर्दी नको - कमी होण्याची वाट बघत होतात, आणि निवांतपणे सरकारवर विश्वास ठेऊन असाल - अगर आप वो लेव्हलके भक्त हो... तर तुम्ही समजून घ्या, तुमची मार्रीगेलीय... ... तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात... अभिनंदन ! मनःपूर्वक अभिनंदन ! . आपलीच म्याव आपलंच दुध... आपलाच बांबू... आपलीच... ... नोटीफिकेशन झेला : https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10784&Mode=0 !..........................................! (काल्पनिक प्रसंग) नांव : तेजस विनोद कुळकर्णी अकां. नं : xxxxxxxx बँक : xxxxx बँक रक्कम : १२००० विवरण : १००० x १०, ५०० x ४ .... (स्थळ : बँक) हं... बोला - कुठून आणले पैसे ? मी : चेक मिळाला ना, याच बँकेत डिपॉजिट झाला... नंतर कॅश केला... ८ नोव्हेंबरलाच... पासबूक पण ...

२००० च्या नोटेतली चीप

Image
गेल्या महिन्यात चलनात आलेल्या दोन हजारच्या नोटेमध्ये ‘चीप’ बसवण्यात आली असून, पाताळात ती पुरून ठेवली तरी तिचा माग काढणे शक्य होईल, अशा वावडय़ा समाजमाध्यमांतून उठल्या. मग रिझव्‍‌र्ह बॅँकेने नोटेमध्ये असे काही नसल्याचा खुलासाही केला. गेल्या काही दिवसांत सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आणत आहे, त्यातील बऱ्याच नोटा साठवणुकीमुळे बाजारातून गायब होत आहेत. त्या नोटा छापे घालून पकडण्याचे आणि जप्त करण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे.  त्यामुळे  अशा सूक्ष्म ‘चीप’ची चर्चा पुन्हा सुरू झाली. या पाश्र्वभूमीवर या छापेसत्रामागची आधुनिक व तांत्रिक बाजू विशद करणारा हा लेख... . ८ नोव्हेंबर रोजी सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या. या निर्णयाचे स्वागत काही लोकांनी केले तर विरोधकांनी त्याचा निषेध केला. दोन हजारची नवीन नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेने आधीच केली होती. तेव्हा काही तरी वेगळे घडणार आहे याची पुसटशी शंका अर्थतज्ज्ञांना, पत्रकारांना आली होती आणि तसे घडलेही. मात्र आता आलेल्या अनुभवानुसार सरकार दोन हजार रुपयांच्या जेवढय़ा नोटा बाजारात आण...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved