मोदीजींच्या भाषणातले मुद्दे !
मोदीजींच्या भाषणातले मुद्दे !
दि. ३१ डिसेंबर २०१६ : सायं १९ : ३० ते २० : १४
...
१. देश शुद्धी यज्ञाकडे जातोय.
२. लोकांना वाईट काळ सहन करावा लागत होता. पण वाईटावर विजय मिळवण्यासाठी देश लढला ! प्रत्येक भारतीय चांगल्यासाठी प्रयत्नशील आहे. इतिहासात पहिल्यांदाच जनता आणि सरकार एकत्र आहेत.
३. लवकरात लवकर बँक सामान्य स्थितीत येण्यासाठी प्रयत्न करणार.
४. १०००-५०० च्या नोटा काळ्याबाजारात, parallel economy मध्ये जास्त होत्या. ज्यामुळे महागाई वाढली. ते संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय. भारताच्या समकक्ष अर्थव्यवस्थेत सुद्धा इतका पैसा नाही.
५. मोदींकडून नागरीकांचं भरभरुन कौतुक. जर शास्त्रीजी, जे पी असते तर त्यांचे भरभरून आशिर्वाद मिळाले असते.
६. फक्त २४ लाख लोकं १o लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे हे प्रामाणिकपणे स्विकारतात. पण चतुराईने भ्रष्ट्राचार करणाऱ्यांचे रस्ते बंद.
७. बँक कर्मचाऱ्यांचं, पोस्ट ऑफीसच्या लोकांचं कौतूक. पण त्यातही काळाबाजार करणाऱ्यांना सोडणार नाही. बँकांना आवाहन. गरीब कल्याण वर्षात गरीब आणि मध्यमवर्गासाठी धोरणं आखा.
८. योजना १ : प्र. आ. यो. अंतर्गत मध्यमवर्गासाठी ९ लाख कर्जावर ४ % आणि १२ लाखावर ३% सुट. गावात ३३ % घरे वाढवली. गावातल्या लोकांना घरासाठी २ लाखापर्यंत ३ % सूट.
९. योजना २ : खरीब रब्बीच्या कर्जावर शेतकऱ्यांचं २ महिन्यांचं व्याज सरकार भरणार. ३ महिन्यांत किसान क्रेडीट चं RuPay होणार.
१०. योजना ३ : लघुमध्यम उद्योगांसाठी क्रेडीट गॅरंटी २ कोटी रुपये केली. एनबीएफसीचं लोन सुद्धा कव्हर करणार. कॅश क्रेडीट लिमीट २५ %, डिजीटल बँकींगचं कॅश क्रेडीट लिमीट ३० %
११. योजना ४ : २ कोटी टर्नओव्हरचं आय ६ % होणार.
१२. योजना ५ : गर्भवती स्त्रियांचे उपचारासाठी ६ हजार रुपये मिळणार. खात्यात जमा होणार.
१३. योजना ६ : वरीष्ठ नागरीकांसाठी व्याजदर आता स्थिर राहणार. ७.५ लाखावर १० वर्षांपर्यंत ८% व्याज देणार. ते दरमहा मिळणार.
१४. राजकारणी आणि पक्षांना पारदर्शक व्यवहारासाठी आवाहन.
१५. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न करणार. त्यावर विचार करणार...!
...
५०-५०..
पण दम नाही...
२०१६ च्या फेअरवेलला २०१७ चा मिनी वेलफेअर प्लान दिला...!
इतकंच
...
(तटस्थ) - तेजस कुळकर्णी !