व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव...

व्यवसायतल्या गोड नात्यातला अजून एक सुंदर अनुभव...
...
मी व्यवसायात जवळपास प्रत्येक व्यक्तीशी व्यवसायापल्याड नातं जोडतो. त्याचे गोड अनुभव येतात. आजची गोष्ट...
... एका प्रोजेक्टच्या पेमेंटचा चेक देण्यासाठी काल क्लायंटचा फोन आला...
इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर..
.
क्लायंट - मि. कुलकर्णी... कितना पेमेंट है आपका ? और चेक कब का करु ?
मी - सर, Thirty Two Thousand आपका बिल अमाऊंट है, और ड्यू 10th January का है...
क्लायंट - हमारा तो ऑलमोस्ट काम हो गया है... तो 10th January तक वेट क्यो ?
.
काम पूर्ण झाल्याशिवाय आणि ठरलेल्या स्लॅबशिवाय पैसे घ्यायचे नाही हे तत्व मी पाळतो... पारदर्शकता टिकवण्यासाठी... आणि सगळं सुरळीत राहतं... त्यामुळे १० जानेवारीच्या आधी पेमेंट नको हे फिक्स होतं...
हे या वर्षातलं शेवटचं पेमेंट...!
..
मी - सर, ऐसा करो ना, 16th January का बनाओ... नये साल ही बोहनी आपके हाथ से...
क्लायंट - (हसत...) क्यो ? आपका नया साल १५ दिन बाद आता है !
मी - जी हॉं... मेरा बर्थडे है उस दिन... और कंपनी की फर्स्ट एनिवर्सरी... उस दिन पेमेंट मिलेगा तो पहला दिनही बढिया होगा...
क्लायंट... : ओहss... ऐसा है तो... સરસ...! १६ का बनाता हू मै चेक... ત્રીસ બે હજાર... ओके !..
...
आत्ता चेक मिळाला... १६ जानेवारी २०१७
बत्तीस हजार एकशे एक... !
.
जास्त अमाऊंट आली,...
मी परत फोन केला...
सरजी, आपने ज्यादा अमाऊंट का भेजा... એક સો એક रुप्या...
...
अरे नही कुलकर्णीजी... कुछ गलत नही,
१६ तारीखको आपका बर्थडे है भाईसाब,
उपरका એક સો એક मेरी तरफसे ભેટ स्वरुप दिया है...
...
एक मिनिट लागला अर्थ लागायला,
पण नंतर चेहऱ्यावर भलं मोठ्ठ स्माईल आलंय...
मी पण तोडक्या मोडक्या गुजरातीत आभार मानून फोन ठेवला... !
...
व्यवसायापल्याड असं जपतात तेजा... मला मिळालेला मोठ्ठा धडा !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved