"लग्न कधी करतोएस?"
"लग्न कधी करतोएस?"
एक शाळकरी मित्र अनपेक्षित ठिकाणी भेटला आणि hi-hello झाल्याझाल्या त्याने पहिला प्रश्न हाच विचारला. काय करतोएस, कुठल्या क्षेत्रात करिअर घडवत आहेस, पुढे काय प्लॅन्स आहेत...हे काहीच नाही. सर्वप्रथम "लग्न कधी?!" हा प्रश्न.
तेव्हापासून हा प्रसंग डोक्यात घट्ट बसलाय.
२४-२५ वर्ष वयाच्या भारतीय/मराठी मुलामुलींमधे "लग्न" हा विषय प्रायोरिटीचा असू नये, असं अर्थातच नाही - पण "टॉप" प्रायोरिटी करिअर, आपली पॅशन, भविष्य...ह्यालाच असायला हवं. मुद्दा पैश्याचा नसून कर्तृत्वाचा आहे.
ऐन उमेदीच्या काळात चहूकडे उभ्या असलेल्या संधी हुडकून काढण्यात सर्वाधिक ऊर्जा खर्च व्हायला हवी. आपली आवड-छंद-पॅशन ओळखण्यावर आणि त्यातील कौशल्य प्राप्त करण्यावर आपण भर द्यायला हवा. जे करतोय - बोलतोय, लिहितोय - ज्याची सर्वाधिक चर्चा करतोय - त्यातून सतत स्वतःत value addition व्हायला हवी. आणि हे, खरंतर, आपोआप व्हायला हवं. पण तसं घडताना दिसत नाही.
"भारत हा तरुणांचा देश आहे" हे भारताचं बलस्थान नाही. जो पर्यंत तरुणांच्या priorities योग्य नसतील, तो पर्यंत अजिबात नाही. आणि हे फक्त लग्नापुरतं सीमित नाही.
शिक्षण झालं की "कुठलातरी" जॉब पकडायचा आणि "सेटल" व्हायचं, एवढाच विचार करणारी तरुणाई देश घडवू शकणार नाही. तरुणाईने आपल्याला जीवापाड आवडणाऱ्या क्षेत्रातच उतरायला हवं. तसं घडलं तरच त्यांच्याकडून amazing output मिळेल आणि त्यातूनच त्यांचा आणि समाजाचा उत्कर्ष होईल.
हे घडून येण्यासाठी उत्तम वातावरण (इन्फ्रा, मेन्टॉरिन्ग इत्यादी) तर हवंच - पण योग्य टेम्परामेन्ट देखील हवं. त्यासाठी प्रायोरिटी पक्क्या हव्यात - ते होण्यासाठी तसं प्रबोधन हवं.
कुटुंबाबरोबर होणारा सकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण - इथे हे प्रबोधन घडत असतं. तिथे ज्या गोष्टी डिस्कस होतात, त्यातून पिढी घडते.
(साभार)
(साभार)