लाईव्ह लतादिदी

इतक्यातच,
लोकल टिव्हीवर लतादिदींचा जुना लाईव्ह परफॉर्मन्स दाखवत होते... सर्फ करता करता लतादिदी कभी खुशी कभी गमचा आलाप घेतांना दिसल्या.... हात तिथेच थांबले... धडधड वाढली...
.
समोर हजारो लोक... पिन ड्रॉप सायलेंस...
मागे दिडशेचा वाद्यवृंद-कोरस
अग्रभागी लतादिदी...
आणि त्यांच्या उपमा देऊ शकत नाही अश्या गळ्यातून वाहणारं गाणं...
...
ते पाच मिनिट... लतामय... पुर्णपणे... 
कभी खुशी कभी गम गाणं...
मी सोफ्यावरुन उतरुन जमीनीवर बसलो...
त्यांचा एक एक स्वर अक्षरशः अनूभवत होतो...
...
लतादिदींचा आवाज ऐकला तरी त्यांच्या भेटीतले ते साडेअठरा मिनिट समोर उभे राहतात... ते साठेअठरा मिनिट मी पुन्हा पुन्हा जगतो... क्षण न क्षण...
...
मी भान हरवलेला... त्या ठिकाणी जाऊन पोहचलो...  गाणं संपलं... त्याच क्षणी ताडकन उठून उभा... हात जोडलेले... डोळे भरलेले...
..
लता मंगेशकर प्रत्यक्ष्य ऐकणं साधं काम नाही, टिव्हीवर बघून हे होतं... प्रत्यक्ष्य ऐकतांना स्वर्ग असेल... काही लोकं जादू करतात...
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved