तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात...

३० डिसेंबर पर्यंत जुन्या नोटा बदलण्याची मुदत दिलेली, आता सरकारने त्यासाठीपण गोबोगा मारलीय...
आता ५००० रु पेक्षा जास्त रक्कम असेल तर कारण द्या, नंतर दोन बँक ऑफीसर्स ठरवणार ते योग्य की नाही... नंतर पुढची प्रोसेस..!
म्हणजे जर तुम्ही दोन महिने गर्दी नको - कमी होण्याची वाट बघत होतात, आणि निवांतपणे सरकारवर विश्वास ठेऊन असाल - अगर आप वो लेव्हलके भक्त हो...
तर तुम्ही समजून घ्या, तुमची मार्रीगेलीय...
...
तुमच्याकडे जर ५००० पेक्षा जास्त किमतीच्या जुन्या नोटा आहेत तर तुम्ही आज रोजी काळाबाजारी आहात...
अभिनंदन ! मनःपूर्वक अभिनंदन !
.
आपलीच म्याव आपलंच दुध...
आपलाच बांबू... आपलीच...
...
नोटीफिकेशन झेला : https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10784&Mode=0
!..........................................!
(काल्पनिक प्रसंग)
नांव : तेजस विनोद कुळकर्णी
अकां. नं : xxxxxxxx
बँक : xxxxx बँक
रक्कम : १२०००
विवरण : १००० x १०, ५०० x ४
....
(स्थळ : बँक)
हं... बोला - कुठून आणले पैसे ?
मी : चेक मिळाला ना, याच बँकेत डिपॉजिट झाला... नंतर कॅश केला... ८ नोव्हेंबरलाच... पासबूक पण आहे...
ते : ह्म्म्म्.. मग इतक्या दिवसात कां बदलले नाही पैसे... ?
...
कारण १ : मी गर्दी कमी होण्याची वाट बघितली...
पहिला - हे व्हॅलीड आहे कां बघ रे लिस्ट मध्ये... ?
दुसरा - नाही, तुम्हाला दुसरं कारण द्यावं लागेल !
...
कारण २ : मला वाटलं, ३० डिसेंबर पर्यंत मुदत आहे, आजच का घाई करावी ?
पहिला - हे ... ?
दुसरा - हे पण नाही.... !
...
कारण ३ : सरकारच्या पोस्टरवर विश्वास ठेवला...
पहिला : छे हो ! हे तर नाहीच नाही...
...
कारण ४ : मला ४ तास रांगेत उभं राहणं जमत नाही, वेळही नाही... इच्छा तर त्याहून नाही...
पहिला...  the explanations are invalid ! हे पैसे नाही बदलून मिळणार...
...
खरं बोलून पण जाणारे गेले...
....
आणि मी गुणगुणत निघालो...
रामचंद्र कह गये सिया से..
ऐसा कलीयुग आयेगा...
हंस चुनेगा दाना तिनका,
कौवा मोती खायेगा...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved