Posts

Ganesh Visarjan

आज गणपती परत जात नाही, फक्त गणेशोत्सव संपतो... गणपती विसर्जन नव्हे - गणपती प्रतिमा विसर्जन... गणपती चराचरात आहे. .. ॥ त्वंगुणत्रयातीतः ॥ त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः ॥ त्वंमूलाधारस्थितोऽसिनित्यम ॥ त्वशक्तित्रयात्मकः ॥ त्वांयोगिनोध्यायंति नित्यम्‌ ॥ त्वंब्रह्मात्वं विष्णुस्त्वंरुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वंवायुस्त्वंसूर्यस्त्वंचंद्रमास्त्वं ब्रहम्भूर्भुवःस्वरोम्‌ ॥ .. गणपती आपल्या शरीरात मूलाधार चक्रावर स्थिर आहे ! .. आज फक्त उत्सव संपला. त्या पार्थिव मुर्तीचे विधीवत पूजा करुन विसर्जन करणं योग्य. गळे काढून अभद्रासारखं रडणं काय, एखाद्या लहान बाळासारखं जवळ घेऊन पप्प्या घेणं काय... देव आहे तो... सोवळ्यातलं देवत्व आहे त्यात... ! .. त्वंवाङमयस्त्वंचिन्मयः ॥ त्वमानंदमयस्त्वंब्रह्मासि ॥ त्वसच्चिदानंदाद्वितीयोसि ॥ त्वंप्रत्यक्षंब्र्ह्मासि ॥ त्वंज्ञानमयोविज्ञानमयोसि ॥ सर्वजगदिदंत्वत्तोजायते ॥ सर्वजगदिदंत्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वजगदिदंत्वयिलयमेष्यति ॥ सर्वजगदिदंत्वयि प्रत्येति ॥ त्वंभूमिरापोनलीनिलोनभः ॥ त्वंचत्वारिवाक्‌पदानि ॥ . गणपती अग्रदेवता आहे. हे ब्रह्मांड त्यांचं आहे त

शिक्षक दिन Teachers Day

= शिक्षक दिन = एका वळणावर आलो की मागे वळून बघतांना आपल्या आयुष्यातले वेगवेगळे चौक दिसतात. त्या चौकात जर रस्ता बदलला असता तर आज कदाचित Below this or Above this असतं वगैरे गोष्टी उगाच अलंकारिकता आणतात, पण ते होतं, होवू द्यावं... माझ्याबाबतीत सांगायचं तर आजवर आयुष्यात काहीही खास कर्तृत्व नाहीय, पुढचं माहित नाही... पण अगदीच नसल्यापेक्षा जे थोडंफार आहे त्याचं श्रेय शाळेपासून लाभलेल्या शिक्षकांना जातं, जे नाही ते मी माझ्या कर्माने घालवलंय... तरीही शिक्षक दिन हा दिवस केजी टू पीजी नेहमी स्पेशल राहीलाय... शिक्षकच होते ते ज्यांनी हा उधळलेला वारु भरकटू दिला नाही. . माझी आजी स्कूल टिचर होती. घरातल्या घरात तिनं मराठी लिहीणं वाचणं, इंग्लीशची तोंडओळख स्वतःचं नाव लिहीता वाचता येईल इथपर्यंत करून घेतलेलं. त्यामूळे सिनियर केजी मध्ये असतांना मी चंपक वगैरे वाचत होतो... पहिली शिक्षिका... ! आज्जी गेल्यानंतर एक दुसऱ्या आज्जी ट्यूशन करता यायच्या... कॉलनीतल्या तीन मुली आणि मी असा क्लास चालायचा, त्या माऊलीनं केजी, पहिली, दुसरी मध्येच गणिताचे पाढे, गुणाकार वगैरे पक्कं करून घेतलं होतं, गणिताच्या प्रेमात तेव्हा

महागुरुंचं सुवर्णमहोत्सव

म्हाग्रुनी काल दे ढील लै बफाऱ्या सोडल्यात... फुल्ल ऑन मज्जा... गेलेल्या माणसाबद्दल काहीही बरळलं तरी खरं खोटं करायला कुणी येणार नाहीय, या तत्वाचा पूरेपूर लाभ घेत आया मौका मार दिया चौका अशी मस्त बॅटींग केलीय... . हा माणूस कधीही पटलेला नाही. ओव्हरअॅक्टींगमध्ये ऑस्कर मिळावं अशी हूच्च प्रतिभा धारण करतात... संवादफेक तर विचारू नका... नवरा नवसाचा, सातपूते, आयडीयाची कल्पना असले टूकार चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्यात या साठ वर्षांच्या माणसाबरोबर पंचवीशतली एखादी ठूमकतांना दिसली की वाईट्ट कॉम्प्लेक्स येतो. त्यावर उतारा म्हणून हॉलीवूड बघावं लागतं...  .. म्हाग्रु सहकलाकारांना श्रेय देण्यात सॉलीड कंजूषी करतात. स्वतःभोवती दिवे ओवाळतांना त्यांना आपण काय बरळतोय याचं भान हरवतं. बनवाबनवी वेळी अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेंनी भर रस्त्यात पायावर डोकं ठेवलं, ते अमिताभ बच्चन, अमजद खान यांच्या पेक्षा सिनीयर आहे - त्यांना अॅक्टींग शिकवली असं काही काही बरळून त्यांनी स्वतःची किंमत कमी करून घेतलीय. बनवाबनवीचं जास्त श्रेय लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुधीर जोशी यांनाही जातं... पण दरवेळी त्यांन

बाप्पा तू ये...

Image
बाप्पा, कानठळ्या बसवणारी विचित्र गाणी, कर्णकर्कश्श डिजे नसेल, विचित्र हावभाव नसतील, धिंगाणा नसेल, फक्त येतांना मर्मबंधातली ठेव असणारी ती गोड गाणी आठवणीनं घेऊन ये ... अशी चिक मोत्याची माळ, गजानना श्री गणराया ही गाणी तू खूप वर्षांपूर्वीच परत नेलीस. .. बाप्पा, चॉकलेट मोदक, उंदीर मोदक असले प्रकार नसतील... मस्त तळलेले मोदक, उकडीचे मोदक, खिरापत असू देऊ प्रसादात... तूला स्वतःला मोदक आवडतात... एखाद्या लहानग्याच्या साखर खोबऱ्यात अमृत बघणारा तू... ती अमृताची चव येतांना घेऊन ये... .. बाप्पा, मला माहितीय, तुला पैसे भरून व्हिआयपी एंट्री मागणारी भक्ती आवडत नाही, घरी तुझ्या फोटो समोर मनोभावे हात जोडणाऱ्या निरागस भक्तावरही तुझी कृपा राहते... देवा त्या भक्तीनेच तुला प्रार्थना करतील, येतांना ती निरागसता फक्त घेऊन ये... .. बाप्पा, तुझ्या मिरवणुकीत दारू पिऊन झिंगणाऱ्या लोकांचा तुला राग येतो, गणपती बाप्पा मोरया म्हणत उत्साहात चालणाऱ्या भक्तांत तू रमतो... तू भावाचा भुकेला आहेस, बाप्पा येतांना तो भाव फक्त घेऊन ये... . बाप्पा तुझं देवत्व महाकाय मूर्तीचं मिंधं नाही, सुपारीतही प्रगटणारा तू, मोठ्ठ्या म

Sarahah - Be Careful Be Alert

#Sarahah बद्दल उत्सुकता म्हणून ठीक, पण ते अॅप खूप सिरीयसली न घेतलेलं चांगलंय... रॅदर, स्त्रियांनी, मुलींनी तर आधीक सतर्कतेने त्यापासून दूर राहणं योग्य आहे.. Precaution is always better than cure ! फॉर ऑल -  नंतर थोबाड बडवण्यापेक्षा आधीच ती वाट बंद केलेली चांगली... ! .. त्यात Sender कोण ते कळत नाही, रिप्लाय देऊ शकत नाही. त्यामूळे गंमत म्हणून थोडक्यात ठिक, पण एका मर्यादेपलीकडे या अॅपचा धोका निर्माण होईल... कुणीतरी भिंतीपलीकडून अश्लील कमेंटस् पास करू शकतो... (स्त्रियांसाठी विशेषतः ! एकतर्फी मरणारे, प्रेमभंगे वगैरे) कुणीतरी व्यंगावर टिका करू शकतो... धमकी देवू शकतो... नात्यात गैरसमज पसरवू शकतो... ऑफीसमध्ये भांडणं लावू शकतो... वैयक्तीक टिका, दुखरी / हळवी बाजू टोचू शकतो... आपल्यावर जळणारे हजारो असतात, ती माणसं मानसिक खच्चीकरण करू शकतात... ! खूप धोके आहेत. सध्यातरी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर Sarahah ची सिक्यूरीटी ब्रेक होत नाही. .. समजा, - दोन मित्रांत वाद झाले - बदला घेण्यासाठी किंवा टाईमपास करायला एकाने दुसऱ्याच्या बायकोला मेसेज पाठवला - "तुझ्या नवऱ्याचं ऑफीसमधल्या x सोबत लफडं

Independence Day

कचरा डस्टबीन शिवाय इतर कुठेही टाकत नाही... पान-सिगारेट सारख्या फालतू सवयी नाहीत त्यामूळे रस्त्यावर थुंकण्याचा प्रश्न येत नाही... रेड सिग्नलला xमस्ती टाळून गपगूमान उभं राहतो... ट्राफीक रुल्स पाळतो... दर ५ वर्षांनी मतदान करतो.. बापाचा रोड समजून डिजे ठोकत रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि स्वतःबरोबर इतरांचीही आमटवणाऱ्या मिरवणूकांना जात नाही... गरज असेल तितकंच पाणी, विज आणि पेट्रोल वापरतो... पिकनिकला गेल्यावर तिथल्या वास्तूवर स्वतःचं नांव कोरुन येत नाही... गार्डनमध्ये बसल्यावर गवत उखडत नाही ... कॉमन टॉयलेटमध्ये शू केली तर पाणी टाकून प्लश करतो.. .. माझी देशभक्ती १५ ऑगस्टच्या अर्ध्या तासाची मोहताज नाही... ना ती कुणाचं गुणगान गायल्यानं सिद्ध होते... भाषेचं बंधन नाही.. प्रांताचं तर बिलकूल नाही ... ! फॉर मी हिस्ट्री मॅटर्स सिन्स माय बर्थ... देश हातात मिळालाय, तो टिल एंड ऑफ द लाईफ आपल्यापरीनं जपायचाय... दॅटस् ऑल !

कृष्ण

Image
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ देवातलं नेमकं तितकं घ्यावं, ते समजावं, त्यायोगे आपली उत्तरं शोधावी आणि वेळ आली की रस्ता पकडावा... भक्ती म्हणजे इतकंच. कृष्ण पूजण्यासाठी लग्न, घरदार सोडून आजन्म ब्रह्मचारी होवून इस्कॉनच्या नादी लागू नये, किंवा राम पूजण्यासाठी कारसेवक होवून तावतावानं भांडू नये... .. कृष्ण गोकूळातल्या बाललीलांत भेटत नाही ... ना त्या लीलांत तो बघावा... प्रत्येक लहान मूल अपने आप मे त्या लीला दाखवत असतं... कृष्ण द्वारकेचा राजा म्हणूनही बघायची इच्छा नसते... कारण तेव्हा आपापसातले भांडणं, राज्य, सोळा हजार राण्या यांत अडकलेला तो सामान्य माणूस असतो... कृष्ण महाभारतातल्या राजकारणात कपट करतांनाही पटत नाही... मग त्याचं देवत्व कुठे ? का पूजा करावी ? ... कृष्णाची पूजा दही दुध चढवून होत नाही... कृष्णाची पूजा भजन करून होत नाही, ना कृष्णाची पूजा चार धाम यात्रा करून होते - कृष्णाचं देवत्व गोकूळात नाही, कृष्णाचं देवत्व द्वारकेत नाही... हस्तीनापूरातल्या राजकारणात तर बिलकूल नाही... कृष्णाचं देवत्व कुठाय ?

SEO and Google Policy

गुगल आजच्या घडीतले सर्वोत्तम सर्च इंजिन आहे. गुगल शिवाय काही सर्च करणे हा पर्यायच आता सहन होत नाही.  तुम्ही एखादे प्रॉडक्ट लॉन्च केले असेल तर ते इतरांना दिसण्यासाठी तुम्हाला paid services वापराव्या लागतात. त्याला SEO म्हणजेच Search Engine Optimization म्हणतात. झोल हा आहे की तुमचे प्रॉडक्ट कितीही दमदार असले तरीही तुम्ही SEO techniques वापरत नसाल तर google search results च्या पहिल्या काही पानात तुमचे प्रॉडक्ट दिसतच नाही. धोका हा आहे की याच्यात सर्वांना समान संधी मिळत नाही. जे google paid services वापरतात त्यांनाच मान मिळतो, भले प्रॉडक्ट भिकार असेल तरी चालेल. याचा अर्थ तुम्हाला काय शोधायचे आहे ते महत्वाचे नसून googleला जे दाखवायचे आहे तेच दाखवणार. Europe Union मध्ये Antitrust नियमानुसार सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, google ने monopoly करत बरेच सर्च रिझल्ट्स बदलले ते कायद्याविरोधात होते. म्हणून EU ने तब्बल 2.7 बिलियन्स पाउंडचा गुगलला दंड ठोठावला आहे आणि गुगलला झक मारत तो भरावा लागणारच. Google India पण हेच करत असते पण भारताच्या कायद्यांना काहीही पडलेली नाहीये, किंबहुना असा कुठला कायद

Career Vs. Family

Image
मुंबईतला एक माणूस यूएसला गेला, २० वर्ष तिथे राहीला... मुंबईतल्या घरी एकटी आई होती. दिड वर्ष तिला साधा फोन करायला त्याला वेळ मिळाला नाही... ती मेली की जिवंत आहे हे बघायलाही वेळ  नव्हता आणि मुंबईत आल्यानंतर त्याला घरात त्या वृद्धेचा सांगाडा दिसला... एबीपीवर न्यूज सुरूय. .. आयटीतली - माझ्या ओळखीतली करीअर ओरीएंटेड मुलगी फक्त हाय क्लास लाईफस्टाईलकरता घरापासून दूर ४०० किमी वर पुण्यात राहते... आणि १५-१५ दिवस तिच्या आईवडीलांना फोनही करत नाही... ६-६ महिने भेटही नसते... तिची आई पोरीशी बोलायला तडफडते... .. ज्या आईवडीलांनी जीव तोडून सांभाळलं त्यांना जर आपल्याशी बोलायला तरसावं लागेल, त्यांना इमोशनल सपोर्ट देऊ शकणार नाही तर लाथ मारावी अश्या आयुष्याला... दोन चार लाख कमी मिळाले तर चालतील पण आई-पप्पा-आजी-आजोबा-भाऊ-बहिणी रिलॅक्स / समाधानात हवे... एक तर एकत्रच रहायचं, नसेल शक्य तर इच्छा झाली की दोन-चार तासात त्यांच्यापर्यंत येता येईल असं रहायचं... ते पण त्यांना आपल्याला भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वाट बघावी लागणार नाही असं. .. समजा, वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत घरापासून, कुटूंबापासून दूर राहत / न भेट

Interest Down By Reserve Bank

व्याजदर ६.२५ % वरून ६% झाला... उर्जित पटेल हा व्याजदर जोपर्यंत ५% वर येत नाही तोपर्यंत झक मारणार... एकदा ५% झाला की म्हातारीच्या "आता मी डोळे मिटायला मोकळी"च्या धर्तीवर चैन की साँस वगैरे घेणार... हमारे जमाने मे - ७.५% हूवा करता था... वगैरे डायलॉग ऐकले आजच. रिजर्व बँकेचं पतधोरण जाहीर झालं, उर्जित पटेल राहिला बाजूला बँकेत मोदी-जेटलींच्या नावे ऐन श्रावणात शिमगा झाला... ! .. रघुराम राजन अॅटलिस्ट स्वयंभू होते, सांभाळून घ्यायचे. उर्जित पटेल साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणा होता होता दिडशहाणा झालाय.. वाजपेयी सरकारचीच  चूक पुन्हा मोदी सरकार का करतंय कळत नाही. व्याजदर कमी केल्याने कागदावर इन्फ्लेशन कमी झालेले दिसते पण बाजारात त्याचा दृष्य परिणाम कधीही दिसत नाही हा आजवरचा अनुभव आहे . बाजारातून खेळता पैसा काढून घेण्याची पुस्तकी आहे . किंवा हाच पैसा लोकांनी शेअरबाजारात अधिकाधिक गुंतवावा म्हणून . विकसित देशात व्याजदर ०.५% ते १.५% असतात . आपली अर्थव्यवस्था विकसित नाही . म्हातारी वयोवृद्ध सत्तरी पंचाहत्तरीतील माणसं ठेवीच्या व्याजावर तर अवलंबून असतात. ती कुठे जाऊन कामधंदाही क

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved