Posts

मराठी भाषा दिन २०१८

जोपर्यंत ठेच लागल्यावर "आई गं" आणि ट्रक समोर आल्यावर "बाप रे" च मनात येईल तोपर्यंत मराठीची काळजी नाही...! .. इंग्रजी पुस्तकं वाचतो, इंग्रजी सिनेमे बघतो, उर्दु शायरी - हिंदी गाणी ऐकतो... बोलतांना माझे बरेच शब्द गुजराथीत येतात, तरीही त्या इंग्रजी-हिंदी-उर्दू-संस्कृत-आहिराणी-गुजराथीचं आकलन मराठीतच होतं, मनात प्रतिक्रीया मराठीतच येते ... . मराठी लिहीता - बोलता येणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा ... न आणि ण, ळ आणि ल, ट/त्र आणि ञ, श आणि ष, जगातला ज - जनावरातला ज, बषणार आणि बसणार, नाही आणि नाय यांतला फरक कळणाऱ्यांना विशेष शुभेच्छा... .. हिंदी - उर्दू - मोडी - संस्कृत - इंग्रजी आणि इतर प्रांतिक भाषांत प्रचंड साहित्य आहे, ते मराठीत भाषांतरीत करण्यासारखं बरंच मोठं कामही आहे ... इतर लफड्यांत वेळ घालवण्यापेक्षा ते काम केलं तर दर्जा सुधारेल... आपलाच... भरपूर वाव आहे... .. मराठीची सुरुवात स्वतःपासूनच व्हावी... जानू - बाबू - डार्लींग - स्विटहार्ट - मायलव्ह पेक्षा प्रिये, प्राणप्रिये, माझी ऋदयसम्राज्ञी वगैरे शब्द रुळायला हवेत... .. आलू पराठा आणि बटाट्याचा पराठा, नऊवारी आणि नऊ

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

पवार ठाकरे मुलाखत

Image
त्या दोघांची राजकीय मतं पटत नाहीत, त्यासाठी आदर - आदर्श वगैरेही ते नाहीत, पण आजची मुलाखत ज्या पद्धतीनं झाली त्यासाठी खरंच हॅटस् ऑफ ! पवारांच्या वयाचा, मानाचा आदर ठेवून राज ठाकरेंनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना शरद पवारांनी दिलेलं संयमी उत्तर नक्कीच आवडलं... कधी मिश्किल, कधी बचावात्मक - पण आक्रस्ताळपणा, फालतूपणा नसलेली आजची मुलाखत पुढची अनेक वर्ष चांगल्या मुलाखतीचं उदाहरण म्हणून अभ्यासलं जाईल. ! .. काहीतरी चांगलं बघायला मिळालं ! ..

Valantines... Sansaar

= Valentines Day = गाडी, मोबाईल बदलवण्यापेक्षा हल्ली घरातला सोफा, कपाटं वगैरे बदलवण्याचे विचार येताय, कधी नव्हे ते किचनमध्ये घुसून काय कमी काय जास्त याची चाचपणी सुरुय, डिनर सेट्स घेवूयात कां अजून ? इथला फ्रिजपण जरा मोठा घ्यावा लागणारे, आत्तापर्यंत वनबीएचके खूप वाटायचा, एकट्याला मेंटेन करणं - आता पुढच्या वर्षापर्यंत थ्रीबीएचके कसा घेवू शकतो याचं प्लानिंग सुरुय, घरात लाईटबिल असतं, महिन्याचं फूड वगैरे आणावं लागतं, शॉपींग करावी लागते, हे ही हायलाईट होतंय... हल्ली आम्ही फोनवर बोलतांना, सेविंग्स - घर यावरच बोलतो... हातातल्या पैशांची मुक्तहस्ते उधळण करणारा मी, आता एक एक रुपया वाचवतोय - .. काल तिला विचारलं - काय घेऊ तुला व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट ? मला वाटलं एखादा नेकलेस, परफ्यूम्स, मोबाईल किंवा अजून वेगळं काहीतरी मागेल.. तिने तिला आवडलेलं Wind Chain मागितलं.. ते आपण आपल्या घरात लावू ... त्यानी पॉजिटीव्ह वेवस् येतात... .. हल्ली ती - मी नाही, "आम्ही" म्हणून विचार करतो. .. तेजू, यालाच तर संसार म्हणतात... पोटाच्या वर डावीकडे वेवस् आणणारी फिलींग... ! त्यातला क्षण न क्षण,

रामदास समर्थ : दासनवमी

Image
छत्रपती शिवाजी राजेंच्या मृत्यू नंतर समर्थ हेलावून गेले सर्व धातू पात्रांचा वापर बंद केला मृत्तिका पात्र  आणि फक्त दूध घेऊ लागले चाफळला होते. गडावर जाण्याचा संकल्प केला कारण चाफळला काही झाले तर स्वामींच्या नादात भक्तगण रामाचे वैभव विसरतील राघुपती पेक्षा लोक माझे महत्व वाढवतील म्हणून गडच ठीक रामाचा निरोप घेतला मागणे मागितले या देहा कडून सेवा घेतलीस मीही ती केली आता एक मागणे आहे आहे एकचि मागणे। कृपा करोनि देणे ।ज्यासी दर्शनाची इच्छा ।त्याची पुरवावी ।आस्था  ।  बरोबर उद्धव स्वामी होते स्वतःसाठी काही नाही राघवाने मागणे मान्य केले पण अट घातली तेरा अक्षरीया मंत्राचा। जप करील जो साचा ।त्याची संख्या तेरा कोटी । होता भेटेन मी जगजेठी । समर्थ चफळकरांचा निरोप घेऊन गडावर आले. कल्याण डोम गावाला परत गेले जवळची माणसे जवळ असली कि जाण्यात अडचण येते चाफळ मठाची व्यवस्था लावून दिली उद्भवला वाटले नंतर भांडणे नको पण ही निर्वा निरव लक्षात आली नाही अक्का अस्वस्थ होत्या काही विचारले तरी राघुरायची इच्छा म्हणत माघ पौर्णिमा नवान्न पौर्णिमा पण पुरण वरण गव्हाची खीर सुधा नाकारली. मार्गशीर्षात कल्याणा

Rahul Dravid

Image
अंडर१९ च्या विजयाचा शिल्पकार राहूल द्रविड.. दरवेळी ठरवतो, या माणसाबद्दल लिहूयात कधीतरी, पण कौतूक आणि श्रेय एखाद्याच्या नशीबात असावं लागतं - राहूल द्रविडचं नशीब याबाबतीत दोन नव्हे तर तब्बल चार पावलं पुढे असावं... ! द वॉल राहूल द्रविड... कितीही चांगलं केलं तरी श्रेय, कौतूक या माणसापासून दूरच राहील्या.. समोरच्या टिममध्ये बॉलर्स याच्या चिकटपणाला मनात शिव्या घालू देत, पण माणूस म्हणून हा देवमाणूस आहे... शांत... संयमी. योग्य निर्णय घेणारा. ! .. २००७ ला वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशनी हरवल्यावर हा कोण ठोंब्या आणून बसवलाय कॅप्टन म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रीया देशाची उमटली होती... सगळीकडून शिव्याशाप खातांनाही तो शांत होता... अबकी बार... म्हणत हारला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्याने मोट बांधली... जायला सांगितलं, उमगलं तेव्हा धोनीच्या हाती धुरा देऊन शांतपणे निघाला.. त्याने कधी स्वतःला क्रिकेटचा देव म्हणलं नाही, ना अवार्डस् करता याचक झालेला दिसला... निवृत्तीनंतर तो एक दोनदा दिसला, पण चर्चेत आला नाही... एकदा डॉक्टरेट नाकारतांना, एकदा रांगेत उभा असलेला... ! त्याच्यात टॅलेंट आहे, स्कील्स आहेत..

वध वि. हत्या

गांधी की नथुराम ? वध की हत्या ? याचं उत्तर जेव्हा न्यूट्रल होतं - गांधींचा विरोध आणि नथूरामांचं समर्थनही करावंसं वाटत नाही ... ना गांधी पूजनीय वाटतात, ना गोडसे ... ३० जानेवारी १९४८ रोजी झालेला गांधींचा अनैसर्गिक मृत्यू ही केवळ तत्कालिन राजकीय घडामोड म्हणून अभ्यासली जाते, वाचली जाते... ना नथुराम चुकीचे वाटतात, ना गांधी... आणि कुठलंही राजकीय मत यावर तयार होत नाही, तेव्हा कट्टरता संपून, राजकीय-वैचारीक परीपक्वतेकडे आपला सकारात्मक प्रवास सुरु झालेला असतो... ! .. एकेकाळी कट्टर नथुराम समर्थक असलेला मी, आज सांगतोय - गांधीही वाचले ... नथुरामही वाचले ... ना कुणाची भक्ती करावी असं वाटतं, ना कुणाचा विरोध... ! दोघांचा मुद्दा कळला - विषय संपला ! दोघांची पुस्तकं एकाच कप्प्यात शेजारी शेजारी बसून हल्ली माझ्या पर्सनल लाएब्ररीची शोभा वाढवताय...!

दिपःज्योती नमोस्तूते

मुंबईत या फ्लॅट आधी मी ज्या फ्लॅटमध्ये रहायचो तिथली ही गोष्ट... आता मी हल्ली एक महिन्यापूर्वीच इथे शिफ्ट केलंय. हा फ्लॅट मोठा आणि बऱ्यापैकी वरच्या मजल्यावर आहे... पण इथे सेफ वाटतं... ! आधी ज्या फ्लॅटमध्ये होतो तिथे गडबड होती... ! . मी सात वर्षांपासून धुळ्याबाहेर एकटा राहतोय, आधी पुण्यात - मग मुंबईत आधीच्या फ्लॅट मध्ये... आणि आता या ! भिती वाटणं, दडपण येणं या गोष्टी कधीच जाणवल्या नाहीत... घरात रोज देवपूजा करतो, गणपती अथर्वशीर्ष - व्यंकटेश स्त्रोत्र - गायत्री मंत्र - महालक्ष्मी अष्टक - रामरक्षा आणि हनुमान वडवानल स्त्रोस्त्र हे नित्यनियमाने करुन मगच ऑफीस करता घराबाहेर पडतो ... देवघरात देवांसह गुरूचरीत्र ग्रंथ, गजानन महाराजांची मुर्ती आहे... ! अंगावर यज्ञोपवित आहे... भिती तशी नसतेच... एकटा असलो तरी मस्त रिलॅक्स राहतो... ! .. पण साधारण ऑगस्ट पासून त्या घरात रात्री झोपतांना काहीतरी स्ट्रेस जाणवायचा.... दडपण... उगाच काहीतरी टेंशन असल्यासारखं ! ... आधी वाटलं बिजनेस टेंशन मुळे असेल, दिवसभराच्या कामाचा ताण वगैरे, पण सगळं आलबेल असतांनाही झोप उडालेली असायची... भलते सलते भास व्हायचे, अभद्र विचा

Rafi

Image
१९६२ - १९६३ मध्ये लता मंगेशकरांनी गायकाला मिळणाऱ्या मानधनाचा वाद काढला. चित्रपटातून निर्मात्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून गायकालाही रॉयल्टी मिळावी यासाठी ती धडपड होती... त्याकाळचे आघाडीचे अनेक गायक - गायिका या वादात मंगेशकरांबरोबर होते... पण या सगळ्या गराड्यात एक आवाज मात्र वेगळा होता. "गायकाला गाण्यासाठी ठरवलेल्या कराराप्रमाणे मानधनाइतकी रक्कम मिळाली, की त्याचा संबंध संपतो..., मग तो चित्रपट हिट होवो किंवा न होवो..." ... मोहम्मद रफी ... ! ... या माणसाची कला पैशांपुढे झुकली नाही ... . "माया" चित्रपटातल्या "तस्वीर तेरी दिल मे" च्या रेकॉर्डींगवेळी हा वाद झाला. पण रफींच्या स्टँडमूळे केवळ श्रेयनामावलीत गायकाचं नांव द्यावं या मुद्यावर नाईलाजाने एकमत झालं ... या विरोधाचा परीणाम म्हणजे रफींबरोबर एकही गाणं गाणार नाही हे लता मंगेशकरांनी जाहीर केलं... दोन दिग्दजांच्या या वादात जयकिशन यांनी मध्यस्थी केली... पण आयुष्यभर मनोमनी राहीलंच... ! २०१२ मध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद रफींनी आपल्याला माफीपत्र दिल्याचा दावा लता मंगेशकरांनी केला, पण रफींच्या मुल

मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग ३

Image
#अनुभूती #मी_अनुभवलेले_गजानन_महाराज - भाग ३ हाजीअली मागच्या चार वर्षांत शेगांवला जाण्यासाठी खूप मोठ्ठा गॅप पडला. अनेक अडचणी येत गेल्या. अपघात, आत्याच्या संपुर्ण कुटूंबाचं निधन, घराचं बांधकाम... जावू जावू होत होतं, पण जाता येत नव्हतं... मनात विचार आला की "महाराज बोलावतील तेव्हाच आपल्याला जायला मिळेल" हेच असायचं... त्यांनी ऐकलं - आणि एक दिवस मुंबईत महाराजांची अनुभूती मिळाली... ते सर्वत्र आहेत, सोबत आहेत, आणि वेळोवेळी ते सिद्ध करतात. .. पुणे सोडून काही स्वप्न घेवून मुंबईत येण्याची ती वेळ. स्टार्टअप वर उभा, मनात नाही म्हणलं तरी धडकं असतंच... सुरुवात होण्याआधी शेगांवला जायची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने शक्य होत नव्हतं... टाईमलाईन फास्ट पळत होती, शेगांवला जाणं शक्य झालं नाही... मुंबईत आलो. .. ऑफीसच्या पहिल्या दिवशी महाराजांच्या फोटोसमोर उभा राहून प्रार्थना केली, "तुम्ही बोलवाल तेव्हाच दर्शन होईल, पण हा व्यवसाय तुमच्यावर सोपवलाय... लक्ष असु द्या..."... !  त्याच दिवशी दुपारी हाजीअली दर्ग्यावरून जातांना दर्शन घेतलं... आणि एक चादर चढवली... दिवस मावळला, रात्र झा

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved