Posts

Financial Year 2018-2019

Image
३१ मार्च २०१८... आर्थिक वर्ष २०१७ - २०१८ चा शेवटचा दिवस... उद्यापासून नवीन आर्थिक वर्ष... ! .. या वर्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत क्रांती केली, आणि नवी अर्थव्यवस्था जीएसटीच्या रुपाने लागु झाली... बहुमत असल्याने विनाअडथळा संसदेच्या दोन्ही सभागृहात मान्यता मिळवून १ जुलै २०१७ च्या मध्यरात्रीपासून जीएसटी सिस्टीम आली - आणि अभूतपूर्व गोंधळाच्या दोन- तीन महिन्यांनंतर रुळली... अजूनही लोकं शिकताय... ! नोटबंदीनंतर अवघ्या सात महिन्यांतच सरकारने जीएसटीच्या रुपाने दुसऱ्या गालात मारली असं वाटत असतांना - "जरी आता जोरात लागली वाटत असलं, तरी रुळल्यानंतर नाजूक हातांनी गाल ओढल्याचा -  :-* केल्याच्या फिल येईल", हा युक्तीवाद वर्षाखेरीस खरा होतांना दिसतोय... त्यामुळे - जीएसटी समजावं, रुळावं आणि पटावं ही येत्या आर्थिक वर्षासाठी महत्वाची शुभेच्छा क्र. एक. .. नीरव मोदी, विजय मल्या यांसारख्या अनेकांनी पीएनबी, एसबीआयसारख्या तगड्या बॅंकांना गंडवलं... बँक अजुनही धक्क्यात आहेत... - झालं गेलं गंगेला मिळालं ... जे गेले ते गेलेच ... यावर्षी कुणी तसा नवा हत्ती न लागो, ही आर्थिक वर्षासाठी महत्वाची शुभ

राम आणि गाणी...

Image
राम आणि गाणी... कृष्ण, राम, गणपती, शंकर, विठ्ठल, देवी यां देवतांवरची गाणी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे... एकेका देवतेवर शंभर शंभर गाणी, एकापेक्षा एक आरत्या आणि ते संगीत ऐकतांना दोन भुवयांच्या मध्ये मन स्थिर व्हावं अशी नितांत शांतता... ! त्यांना फक्त माहौल हवा, राग - त्याचे समयचाक्राचे नियम त्या गाण्यांपाशी गप्प उभे राहतात, आणि केवळ ती गाणी - शब्द, संगीत, भाव निखळ आनंद देऊन जातात... ! .. राम ! गोंदवलेकर महाराजांचं मंदीर, गजानन महाराजांचं मंदिर... कुठेही जा - "श्रीराम" हा त्रयाक्षरी जप एक लयीत दिर्घ आवाजात सुरु असतो... ना चाल, ना वाद्य... तरीही आपण त्या शांततेशी क्षणात एकरूप होतो... श्रीराम जयराम जय जय राम ... किती शक्ती देतं ... .. गीत रामायण तर रत्न म्हणावं... रामाचं जीवन गदिमांनी गीतात बांधलं, बाबुजींनी तितकंच ताकदीचं संगीत दिलं... आजही दुपारी १२ वाजता प्रत्येक मंदिरात "राम जन्मला गं सखे" सुरु असेल... लग्नात स्वयंवर झाले सितेचे... किंवा दिवाळी पहाट मध्ये राम अयोध्येचा राजा ... ही गाणी आजही मानबिंदू आहेत... .. रामावरची मराठी भावगीतंही साखरेसारखी गोड

Anna Hajare Protest Rally

अण्णा आंदोलन मागच्या वेळी मिडीयानं उचलून धरलं ... कारण देशात काँग्रेसविरोधी लाट होती, भयाण परीस्थिती होती... भ्रष्टाचाराला लोकं कंटाळले होते... त्यामुळे - देशभर समर्थनाचे मोर्चे निघाले - अण्णा हिरो झाले आंदोलन हिट झालं - टाईम्सवर फोटो झळकला... - व्हाईट हाऊस फिरून आले... पद्मची सोय झाली... पण त्यातून केजरीवाल / आप / जन्माला आलं... पाटकर-बेदीचं दुकान बसलं.. तो दिल्लीचा मु मं, अण्णा बॅक टू राळेगण ! त्या आंदोलनावर अण्णांनी व्हिआयपी पाच वर्ष काढली... ! .. मोदीलाटेवर कॉंग्रेस पडलं... भाजपा आलं... अण्णांना वाटलं आपलंच कर्तुत्व सिद्ध झालं, अण्णा स्वतःला आधुनिक राष्ट्रपिता वगैरे समजू लागले... सरकारला सल्ले देणं, लूडबूड करणं सुरु झालं... पहिलं वर्ष सरलं, सरकारने कोललं... आता परत लोकांसमोर यावं, विसरलेल्या लोकांनी ओळखावं, दबदबा तयार व्हावा अशी इच्छा होणारंच... अण्णा परत आले दिल्लीला ... .. पण... यावेळी पत्रकारही फिरकले नाही... ना मोठ्ठ्या मंडपात गर्दी दिसतेय... ना लोकांना इंटरेस्ट आहे... .. ओव्हरऑल आंदोलन फ्लॉप झालं... कारण मोदी सरकारबद्दल लोकांमध्ये रोष नाही. उलट स

Test Cricket Anniversary

क्रिकेटची पहिली टेस्ट मॅच १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान मेलबर्नला इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया खेळवण्यात आली होती... टेस्ट क्रिकेटचा आज विशयूहॅपीबड्डे. .. पाच दिवस, ४० विकेट... लाल रंगाचा टणक सिजन बॉल आणि पांढरी जर्सी... ! घाम फोडणाऱ्या या फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडू घडले... खेळपट्टीवर टिकून राहणं, डिफेन्स मोड मध्ये विकेट टिकवणं किंवा अचुक टप्पा साधुन / फिरवून विकेट घेणं हे तंत्र आहे...  ते बघणंही तितकंच नजाकतीचं... ! क्रिकेट हा तंत्रशुद्ध खेळ आहे हे टेस्टमध्येच दिसतं... .. पूर्वीचं क्रिकेट बॅलेन्स्ड होतं... बॉलर्सची पिसं निघतील असा बॅटींग ओरीएंटेड फॉरमॅट नव्हता. त्यामुळे ५ दिवसाच्या मॅच निकाल देवून जायच्या ! ... कधीतरी शतक व्हायचं... कधीतरी ५ विकेट... ! साधं नव्हतं ते !  प्रचंड दडपण खेळण्यात मजा आणायचे... त्यातूनच खेळाडू घडले ! ब्रॅडमन टू झहीर खान... फेरवेट लोक्स फक्त टेस्टमध्येच बघतो... ! .. पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने ४५ रन्सनी जिंकली... टेस्टचा शंभरावा वर्धापनदिन त्याच मैदानावर खेळला गेला - तो इंग्लंडनं ४५ रन्सने जिंकला... ! सध्या भारतीय क्रिकेट टिम प्रथम स्थानी आहे...! .. वनडे - टि

मला भेटलेले नग : १

तीन महीने काम केल्यानंतर काय डोकं फिरलं माहित नाही, एक मुलगा काम सोडून गेला... जातांना राजीनामा व्हॉटस् अॅप वर पाठवला... तो पण सेंटी ... पे रोल वर असलेला माणूस.. अचानक काय झालं ? तर तोंड दाखवायलाही तयार नाही ... "सर या महिन्याची सॅलरी पाठवा ना..." म्हणुन त्याने दहा - बारा फोन मेसेज केले... ! "चार्ज हॅन्डओव्हर कर, नीट राजीनामा दे...'' तर इग्नोर... ! मग ब्रह्मास्त्र काढलं... एचआरला बोललो - त्याने चार्ज हॅन्डओव्हर केल्याशिवाय एनओसी द्यायची नाही, एनओसी शिवाय चेक निघणार नाही... बस ! मग मी दिवसभर फोन उचलला नाही... झकत ऑफीसला आला - प्रोसेस केली... त्यात साहेबांचं रेकॉर्ड आणि परफॉरमन्स एकदम पूअर दिसलं ... टार्गेट ३७ टक्के, सुट्टया, ऑफीसमध्ये दोनवेळा वादही घातलेले... कामात अक्ष्यम्य कुचराई ... आणि यासाठी एचआरनं त्याला फटकावलं होतं.. "थोबाड न दाखवण्यामागचं हे एक कारण कां ?"... फाईन लाऊन उरलेल्या रकमेचा चेक दिला ...! ... काल फोन आला : सर ६ महिन्यांचं exp लेटर हवंय .... - मी सरळ नाही सांगितलं... तीन महिने काम केलंस ते दिलं... आता नाही ! दोन तासांनी परत फो

सना-त-न

करमत नव्हतं... उदास, एकटं वाटत होतं सकाळपासून ... ! मग मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या परमपूज्य संत अपर्णाताई रामतिर्थकरांच्या अद्भूत भाषणाचे व्हिडीयो यूट्यूबवर लावले आणि समाधी लावून बसलो ... आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेत असतांना नकारात्मक काळ्या शक्तींनी व्हॉटस्अॅपवर टिंग टिंग वाजवून त्यात भंग आणण्याचा प्रयत्न केला... त्यावर मात करण्यासाठी साधना म्हणून "उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेली दैवी बालके" ह्या क्लिप बघून त्या दैत्यांना साऊथच्या अॅक्शन फिल्मसारखं सपसप मारलं ! ... आता आध्यात्मिक किरणांची अनुभूती होतेय... जर यातूनही उदास वाटणं वगैरे कमी नाही झालं तर आज सुक्ष्मातून सनातन प्रभात वाचेन आणि आध्यात्मिक पातळी दोन-तीन टक्के वाढवून घेईल.. ! ... रविवारी इतकंच ! :-P :-D .. #सनातन_नव्हे_टनाटन

डोलची : धुळ्यातली होळी

Image
धुळ्यात होळी म्हणजे प्रेमानं ऑ ऑ करुन चेष्टेनं रंग लावणं नसतं ... इथल्या लोकांत सुप्त / उपजत आडदांडपणा असतो. जो होळीला उफाळून येतो... ! .. धुळ्यात पिचकारीनं नाही - डोलचीने होळी खेळतात. डोलची : पत्र्याला शंकूसारखा आकार देउन हातात घट्ट बसेल अशी मूठ बसवतात... आणि त्यात पाणी भरलं की सुरु ... !  इथल्या पोरासोरांत त्याने फटके मारायची कला उपजत असते... पाण्याचाही फटका दिवसा तारे दाखवू शकतो हे दिव्यज्ञान प्राप्त होतं... एकच फटका - "तुम्ही धुळ्यात आहात" ही जाणीव करून देण्यासाठी पुरेसा असतो...! .. तुमची ओळख असो नसो, इच्छा असो नसो - दिसलात की दोन जण तुमचे हात पाय पकडतील, दोन जण डोलचीत पाणी घेऊन कानफडात मारल्यासारखे दहा-बारा फटके मारतील... मग मोठ्ठ्या हौदात चार वेळा तुमची बुड बुड घागरी करतील... पक्क्या रंगानं भरवतील... आणि है है करुन आहिराणी गाण्यांवर बारापावली नाचवतील... ! पुढच्या चौकात/गल्लीत/खुंटावर/कॉलनीत सेम प्रकार... इतकं असतांनापण भांडण नसतं, मारामाऱ्या नसतात... एरव्ही तगडे दुश्मन पण गळ्यात गळा घालून "भईssss" म्हणत एकमेकांना रंगवतात ! .. ते फुलांची होळी, साध्या रं

मराठी भाषा दिन २०१८

जोपर्यंत ठेच लागल्यावर "आई गं" आणि ट्रक समोर आल्यावर "बाप रे" च मनात येईल तोपर्यंत मराठीची काळजी नाही...! .. इंग्रजी पुस्तकं वाचतो, इंग्रजी सिनेमे बघतो, उर्दु शायरी - हिंदी गाणी ऐकतो... बोलतांना माझे बरेच शब्द गुजराथीत येतात, तरीही त्या इंग्रजी-हिंदी-उर्दू-संस्कृत-आहिराणी-गुजराथीचं आकलन मराठीतच होतं, मनात प्रतिक्रीया मराठीतच येते ... . मराठी लिहीता - बोलता येणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा ... न आणि ण, ळ आणि ल, ट/त्र आणि ञ, श आणि ष, जगातला ज - जनावरातला ज, बषणार आणि बसणार, नाही आणि नाय यांतला फरक कळणाऱ्यांना विशेष शुभेच्छा... .. हिंदी - उर्दू - मोडी - संस्कृत - इंग्रजी आणि इतर प्रांतिक भाषांत प्रचंड साहित्य आहे, ते मराठीत भाषांतरीत करण्यासारखं बरंच मोठं कामही आहे ... इतर लफड्यांत वेळ घालवण्यापेक्षा ते काम केलं तर दर्जा सुधारेल... आपलाच... भरपूर वाव आहे... .. मराठीची सुरुवात स्वतःपासूनच व्हावी... जानू - बाबू - डार्लींग - स्विटहार्ट - मायलव्ह पेक्षा प्रिये, प्राणप्रिये, माझी ऋदयसम्राज्ञी वगैरे शब्द रुळायला हवेत... .. आलू पराठा आणि बटाट्याचा पराठा, नऊवारी आणि नऊ

मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem

Image
सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"... .. गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात...  .. अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे -  मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते...

पवार ठाकरे मुलाखत

Image
त्या दोघांची राजकीय मतं पटत नाहीत, त्यासाठी आदर - आदर्श वगैरेही ते नाहीत, पण आजची मुलाखत ज्या पद्धतीनं झाली त्यासाठी खरंच हॅटस् ऑफ ! पवारांच्या वयाचा, मानाचा आदर ठेवून राज ठाकरेंनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना शरद पवारांनी दिलेलं संयमी उत्तर नक्कीच आवडलं... कधी मिश्किल, कधी बचावात्मक - पण आक्रस्ताळपणा, फालतूपणा नसलेली आजची मुलाखत पुढची अनेक वर्ष चांगल्या मुलाखतीचं उदाहरण म्हणून अभ्यासलं जाईल. ! .. काहीतरी चांगलं बघायला मिळालं ! ..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved