Posts

बारावीचा निकाल आणि सिट नंबर ...

एखाद्याला किती टक्के मिळाले, पास कि नापास याची गरजेपेक्षा जास्त उत्सुकता दूरच्या / जवळच्या नातेवाईकांना असते... यात काळजी, कौतूक कमी तर फुकट सल्ले वजा प्रवचन देण्याची मळमळ किंवा त्या माणसासाठीची असुया आसूरी आनंदात व्यक्त होते... .. नातेवाईक किरकिर ही भिक नको पण कुत्र आवर सारखी असते... त्यातही सिट नंबर विचारुन उगाच सलगी साधण्याचा प्रयत्न होतो... अगदी जवळचे जवळचे नातेवाईक अश्यावेळी अंगावर आलेले वाटतात... उपजत स्वभावानूसार अश्यांवर मी जालीम लोशन शिंपडलेलं... .. माझा निकाल आला २५ मे २०१० ला, दुपारी १ः०० वाजता... पेपर्स चांगले गेलेले, त्यामूळे धाकधूक प्रमाणात होती... पण दोन दिवस आधीपासूनच "तुझा सिट नंबर देऊन ठेव, मी इकडे चेक करेन / मोबाईलवर बीएसएनएलचा मेसेज आलाय / ऑफीसमध्ये नेटवर बघेन " चे कॉल्स सुरू झाले ... कमी मार्क मिळाले तर, मार्क नको पण यांची प्रवचनं आवर गत होईल हे जाणून "माझ्याकडे घरी बीएसएनएलचं हायस्पिड ब्रॉडबँड आहे. मी बघेन आणि त्याच दिवशी कळवेन"... ही टेप वाजवणं सुरु केलं ... जो सिट नंबर मागेल त्याला हे १२ शब्द म्हणून दाखवायचो ... .. निकाल लागला... ! बऱ्

डोंबल्या

माझ्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या मुलाने त्याला मुलीकडची मंडळी पहायला येणार म्हणून मला आग्रहाने बोलावून घेतलं, जनरली - असे कार्यक्रम बोअर होतं म्हणून टाळलेले बरे - पण घोड्यावर चढणाऱ्या मित्राला पाठींबा द्यायला हवा... त्यातही कुणी मान दिला तर जास्त आढेवेढे न घेता गपगुमान मिरवून घ्यावं, दिवे ओवाळून घ्यावे असं साधं सोपं प्रिन्सीपल मी स्वतःसाठी पाळतो ( :-P ) अरेंज मॅरेज म्हणलं तर कुठे काय विचारावं याची त्या पोरांना अक्कल नसते - आम्हा लव्हमॅरेज वाल्यांचं तसं सोप्पं असतं, त्यामुळे अनुभवाची खिरापत वाटायला अस्मादीक पोहचले ! आणि हाय व्होल्टेज तमाशा अनुभवायला मिळाला ... झालं असं : ... मुलीकडची मंडळी पोहचली - मुलगी, आईवडील, मामा आणि अजून एक दोघं ... कार्यक्रम सुरू ... ! नमस्कार चमत्कार झाले, आणि मुलाचा त्या मुलीच्या मामाने इंटरव्ह्यू सुरु केला... काय करतात ? शिक्षण कीती ? फ्लॅट स्वतःचा की रेन्टवर ? पॅकेज किती ? जॉब फिरस्ती की ऑफीस ? लग्नानंतर कुठे राहणार ? शिक्षण कुठे झालं ? .. एमबीए केलंय ! मग कुठले विषय होते ? ... भाऊ किती ? सोबत राहतात की वेगळे ? .... .... ... पोरा

Bhhoo

बायकोला लपून "भ्भ्भो" करणं आणि तिने आरोळी मारत, "घाबरून", हातातली वस्तू टाकून पळत सुटणे हे, .. भारत वी पाकिस्तान वर्ल्डकप फाईनल मध्ये आपण स्वतः खेळत असताना शेवटच्या बॉल वर सिक्स ठोकून जिंकवून देणं, किंवा रागाविरुध्द उभं राहून कॉंग्रेस अध्यक्षपदाची, उठा विरुध्द शिवसेना पक्षप्रमुख पदाची  निवडणूक जिंकण्यासारखी मोठ्ठी विजयश्री आहे ... ... आता पुढे खोटी पाल अंगावर टाकून पळून जाणार आहे... :-D :-D

Caller Tune

जियो फोनवर फुकट कॉलर ट्यून असते म्हणून लहान असल्यापासूनचं मोस्ट फेवरेट सॉंग "ससा तो ससा की कापूस जसा" सेट केलं... !! ... बायकोच्या भावाने नेमका त्याच नंबरवर फोन केला, बालगीताचा भलताच अर्थ घेवून अभिनंदनाची आवई उठवली... तसलं नाही काहीच सांगून तोंडाला फेस आलाय. ... ऑफीसच्या स्टाफनं मला ससा खूप आवडतो समजून टेबलवर ठेवण्यासाठी सश्याचं टेडी दिलं... ते ठेवलं आणि एका प्रोजेक्टचा क्लायंट आला - "आर यू स्टिल प्लेयिंग विद धिस ?"... उचलून कपाटात ठेवावं लागलं... ... दुरच्या मावशीच्या लहान मुलीनं ऐकलं आणि आवडलं म्हणून सारखं सारखं फोन लावून ते ऐकवणं सुरुय, आणि तिला डाऊनलोड केलेलं आवडत नाही - कॉलवरच ऐकायला आवडतं... त्या पोरीला मध्यरात्री हुक्की आली तर ? ... सेफ्टीकरता नंबर ब्लॉक केला... ... आता कॉलरट्यून बदलावी लागणार नाही ! फुकट असली तरीही !!

Habit

डायरी लिहिणं, शेड्युल बनवून काम करणं आणि स्वतःची एखादी सिस्टीम तयार करणं हि म्हणलं तर चांगली आणि म्हणलं तर वाईट सवय आहे... आणि सवय आपल्याला तिचा गुलाम करते याचा प्रत्यय आज आला... माझा महिना मी १६ ते १५ तारीख असा असतो... आणि दर महिन्याच्या १५ तारखेला डायरी वाचून मी मागच्या महिन्याचं अवलोकन, पुढच्या महिन्यात करायची कामे वैगेरे प्लान करत असतो... गेल्या १२ वर्षात कधीही खंड न पडलेली हि गोष्ट आता सवय झालीय... झालं असं - काल १६ तारीख, म्हणजे नवीन महिना सुरु होण्याचा दिवस... ११ तारखेपासून कालपर्यंत माझा पूर्ण दिवस एका प्रोजेक्टच्या कामात जायचा... क्लायंट अमेरिकावासी असल्याने नेमकं रात्री ८ ते सकाळी ४-४:३० पर्यंत ऑफिस किंवा घरूनही असलो तरी ऑनलाईन असायचो... आणि डायरी, दिवसभराच्या नोंदी पेंडिंग राहत होतं... अगदी दर महिन्याच्या १२ तारखेला पुढच्या महीन्याचं प्लान करतो ते सुद्धा झालं नाही... काल नवीन महिना सुरु झाला... म्हणावं तसं कामाचं गणित बसत नव्हतं... काय करू, कुठून सुरुवात करू उमजत नव्हतं... आणि ११ पासून डायरी पेंडिंग असल्याने मनात चुकलं चुकलं वाटत होतं... अगदी रोजचे नित्यक्रम करतांनाही गडबड

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं...

लग्नानंतरची १५ दिवसातली निरीक्षणं... १. तुम्ही शक्य तितकं "ध्यान" किंवा बावळट दिसावं याची ती काळजी घेते... गेल्या १५ दिवसापर्यंत मी ज्या ड्रेसमध्ये हॅन्डसम दिसत होतो, तो ड्रेस अचानक घालू न देणं, काळाच चष्मा लाव, चिपकू तेल लावून भांग पाड,  सॅन्डल्सच घाल ... अश्या गोष्टींची गोड बोलून / रागावून सक्ती करणं ही बायकोगिरी आहे... ही बायकोगिरी बाहेर जातांना तिव्र होते... तिच्या मैत्रिणींकडे जातांना तर प्रकर्षाने ! .. २. बाजारात जावंच लागतं... इडली-सांबार खायचाय की पराठा ? इडली सांबार... मग बाजारात जावं लागेल... - तू आणि मम्मा जा ना गाडी घेवून... मला कंटाळा येतो तिथे... - मग मला पण कंटाळा येतोय... खिचडी करते... चल बाई चल... खिचडी करते ही धमकी असते, तिला घाबरून आपण बाजारात जायला तयार होतो... .. ३. गाडीवर - तिथे गेल्यावर गाडी पार्कींगमध्ये लावून तू जाऊन खरेदी करून ये - मी हॉटेलवर चहा घेतोय... हे मी ऐकणार नाही... भाव ठरवतांना एक दोन रुपयाने काय होतं हे  बोलायचं नाही... मला घाई करायची नाही, भाजीतलं तुला कळत नाही... .. .... सुचना ऐकाव्या लागतात... ... ४. कुणी ओळखीचं भेट

शुक्रतारा अस्तला...

Image
सकाळी अरुण दाते गेल्याची बातमी आली आणि जवळचं माणूस गेल्यावर येतं ते पाणी आलं डोळ्यात... ज्या माणसाची गाणी ऐकत लहानाचं मोठं झालो, प्रेमातल्या गुजगोष्टी ज्यांच्या गाण्याने बहरल्या, ज्यांच्या आवाजाने कितीही मोठ्या संकटात जन्मावर जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, ज्यांच्या आवाजाच्या सानिध्यात शेकडो किमीचा प्रवासही जवळचा वाटायचा त्या आवाजाचं असं शांत होणं चटका लावणारं आहे... हि बातमी खोटी ठरो म्हणून मनातल्या मनात देवाचा धावाही झाला. पण अवतार सुद्धा संपतात, आणि अरुण दाते आपल्या दुर्दैवाने अमर नाहीत.  . मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळे काकांचे संगीत आणि शब्दांना-संगीताला लाभलेला अरुण दातेंचा मखमली आवाज... त्रिमूर्तीने केवळ गाण्यासाठी अवतार घेतलेला असावा असा सुरेल संगम... किती भरभरून द्यावं एखाद्याने ? आपली झोळी भरली, पण त्या त्रिमूर्तीचा हात आखडला नाही. आज फक्त दाते गेले नाहीत, तर मराठीचं पितृत्व हरवलंय, मराठी गाण्याचा आवाज शांत झालाय... खळे-दाते-पाडगावकर त्रिमूर्तीमधला शेवटचा देवही आज निजधामाला गेला... या तिघांचे एकमेकांशी खरंच स्वर्गातले संबंध असावेत... एकमेकाच्या मनातलं गाणं ओळखून

BJP 38th Anniversary

Image
भाजपा १९५१ मध्ये हिंदूत्व विचारधारेच्या जनसंघाची श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापना केली. १९७७ मध्ये भारतीय इतिहासाचा काळा कालखंड आणीबाणी संपल्यानंतर झालेल्या निवडणूकांत जनसंघाला कॉंग्रेसला हरवण्यात यश मिळालं, इंदिरा गांधींना मोठ्ठा धक्का बसला. आणि ६ एप्रिल १९८० रोजी जनसंघासह सहविचारी पक्षांचं एकत्रीकरण होवून वाजपेयींनी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला... भारतीय राजकारणाचा आणि उत्कर्षाचा सुर्योदय म्हणावा असा दिवस. .. हिंदुत्ववादी विचारधारा, राष्ट्र-हिंदूत्व-तत्व यांवर एकनिष्ठ असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आणि रा. स्व. संघाचा पाया यावर भाजपाची वाटचाल सुरु झाली... सुरुवात तशी अडखळत झाली. १९८४ लोकसभेला फक्त २ सिटस् आले... नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात किस्सा सांगितला... तेव्हा उभ्या उमेदवारांपैकी ४ लोकांचं डिपॉजिट वाचलं हेच मोठ्ठं यश समजून त्यांनी सेलिब्रेट केलं होतं... १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झालं, ते वर्षभर चाललं - परत निवडणूका होवून पुर्ण बहुमतात सरकार आलं. त्या सरकारने कार्यकाळ पुर्ण केला... ! २००४ ते २०१४ या काळात वनवास भोगल्यानं

Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या वगैरे निघणंही शक्य होत नव्हतं... बाऊन्सर्स, पोलीस तैनात होते...  मी कॅबमध्ये होतो... गर्दीला वैतागल्याने कॅब ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला... बोंबलतच तो गर्दीत गाडी घुसवत होता... कामधंदा छोडके ये xx चले आते है बुढ्ढेको देखने... येडेकी पूँछ वगैरे शाब्दिक पाऊस पाडत होता, तेवढ्यात गॅलक्सीचं गेट उघडून (मे बी) सलमानखानची गाडी बाहेर आली, गर्दी एकदम एक्टीव्ह झाली आणि त्या धुंदीत पळणारे दोन पोरं एकदम आमच्या गाडीसमोर आले.. ड्रायवरने अर्जंट ब्रेक लावून गाडी थांबवली... आणि, xके, मरना है क्या नीचे आके ? मै शर्ट निकालता हूँ मुझे देख मुँह फाडके, उस बुढेको देखता है तो - म्हणत घाण शिव्या घालतच गाडी काढली... ..तिथून ड्रॉपपॉइंट येईपर्यंत पाऊणतास त्या ड्रायव्हरने सलमान, शाहरुक, तैमूरपिता, नुकताच सुटून आलेला संजय दत्त यांना तोंडाला येतील त्या शिव्या घातल्या... त्या संतापाचा गाभा होता.. "कमीने देश को खुद के बापका माल स

व्यवसायातले नग 2

कॉलेजमध्ये असतांना एक फुल्ल टू राजकारणात घुसलेलं पोरगं होतं... अभ्यासात मध्यमवर्गीय म्हणावा असा,  प्रत्येक इयर ला एक-दोन वर्ष आराम केलेला... पण एका प्रादेशिक पक्षाचा युवा सरचिटणीस वगैरे. ''साहेबांसोबतचे" फोटो मोठ्या दिमाखात दाखवायचा... त्याला java चा साधा अॅडीशनचा प्रोग्राम जमला नाही, फायनल इयर viva ला exception handling च्या सोप्प्या प्रश्नावर बोंब पाडून आल्यावर बाहेर येवून टोळभैरव जमवून नरेंद्र मोदी या देशाचं कसं वाटोळं करू शकतात यावर त्याने तासभर लेक्चर दिलेलं... त्याला सगळे सोयीनुसार गमतीने-उपहासाने-आदराने भावी आमदार म्हणायचे... आणि आपलं राजकारणात सेट आहे समजून तो नेत्याच्या मागे पुढे असायचा, आंदोलनं - बंद - गाड्या फोडणं वगैरे उत्साहात करायचा... अगदीच जोश चढला तर या बामणांनी भटांनी देशाची वाट लावली म्हणत हिंडायचा... .. पुढे कॉलेज संपलं, प्रत्येक जण आपापल्या वाटेने गेला... आणि तो भावी आमदार विस्मृतीत गेला... .. काल संध्याकाळी कुठूनतरी नं मिळवून त्याने कॉल केला ... नांव ऐकून... "बोला आमदार"... पण यावेळी एक दिर्घ हम्म्म्म शिवाय काहीच नव्हतं... तेजा, तुझ्

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved