Posts

House in Metro

मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं... . करायचं काय ? यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय. पटतोय कां बघा. . आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...! . स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने. (याच लेखात दिलंय ते) . भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु ...

= संडे ज्ञान =

Image
आपल्या आजुबाजुचे लोक - नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स... . यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात... . बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं... . बायकोनं विचारलं... ए आहो, हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ? टेँशन नाट - याद रखीयो - १. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं... २. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे. ३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय. ४. महत्वाचं - ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत. सो यूनिवर्सल मूलमंत्र- लेट देम गो टू द हेल ! बी हॅप्पी...

व्यवसायात भेटणारे नग

. ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी. . कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू. व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे. . तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो. . दोन दिवस गेले, काकूंचा फोन आला. - मी ...

Saved Business

एका जवळच्या मित्राचा काल संध्याकाळी फोन आलेला. "तेजा, भेटूयात.. जरा महत्वाचं बोलायचंय. !"... मुंबईत एका प्रोजेक्टमध्ये भेटलेलो आम्ही... दोघेही देशस्थ... मी खान्देशातला, तो विदर्भातला... आणि जवळपास एकाच वेळी आपापल्या व्यवसायात स्टार्टअप केलेलं...! त्यामूळे एकमेकां सहाय्य उक्ती जागत आम्ही चार-पाच प्रोजेक्ट एकत्र केले... बऱ्‍यापैकी फायदा झाला... त्याची कंपनी सुद्धा हळू हळू वाढायला लागली... तीन वर्षात जितकी हवी त्यापेक्षा काही टक्के चांगलीच... . आज सकाळी तो घरी आला... चेहर प्रचंड दडपणात असलेला... उसनं हसू आणत त्याने गुड मॉर्निँग वगैरे केलं... "तेजा, सॉरी यार - खूप सकाळीच आलो घरी. थोडं महत्वाचं बोलायचंय..." एरव्ही तेजासेठ बोलत पाठीवर जोरदार फटका देत बोलणारा तो आज एकदम गरीब गाय झालेला. म्हणजे नक्कीच सिरीयस मॅटर असणार... त्याचं एका पोरीसोबत दोन वर्षाँपासून प्रकरण चालू होतं. त्यात बऱ्‍याचदा मोठी भांडणं झालेली, मी घरचं कार्य समजून सोडवलीय... त्यामूळे हा तिच्यामूळे व्यथितबिथीत झालाय कां ? आणि हो, तर आता पुन्हा दोन तास याचं देवदास ऐकावं लागणार म्हणून माझ्या चेहऱ्‍यावर प्रश्ना...

उंगली टेढी

Image
= उंगली टेढी = . धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं. . नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला. - "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्‍या गाडीत शिफ्ट करु कां ?" - चालेल. पण गाडी कोणती आहे ? - सिटीँग आहे... - आणि चार्जेस ? - आधीच्या गाडीइतकेच... ७०० ! - पण ही सिटीँग आहे ना ? - हो. पण चार्जेस सेम आहेत. - मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्‍या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको. - ठिक आहे. विषय संपला. पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं. . सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आप...

औपचारिकता

घरातल्या घरात औपचारिकता ठेवणाऱ्‍यांची मला अति किळस येते... . टेबलवर जेवायला बसले कि भाषण ठोकून चियर्स न बियर्स, चुलत आते मामे मावस भावंड एकत्र आले की डान्स बसवणार, ड्रामा प्ले करणार - घरी वर्षभरातनं भेटल्यावर गेट टू गेदरला गेम्स, गाणी प्लान करणार... लग्नातल्या स्टेजवर गाणी, कविता, डान्स वगैरे करणार... ... किँवा घरातल्या घरात योजना राबवणार, नवरा बायकोला मॅडम बायको नवऱ्‍याला सर म्हणणार, पोरांना घरातल्या घरातल्या नियम-बियम देणार - . मी अश्या कार्यक्रमांना आणि अश्या लोकांकडे जाणं टाळतो. घुसमट होते. . घरात घरासारखंच रहावं. घरी सुद्धा औपचारिकता ठेवावी लागली तर ते घर कसलं - ते तर डोँबल ! गेट टू गेदरला मस्त गप्पा कराव्या, खावं, मस्ती करावी... . अशी एखादी जागा तर ठेवा गड्याहो जिथे हातपाय पसरुन मनासारखं बसता येईल.

प्रिय एबीपी माझा,

प्रिय एबीपी माझा, व्यवसाय चालवतांना जर चुकूनही आपल्याकडून माती खाल्ली गेली, आणि एंड यूजर दुखावला गेला तर त्याच्यापुढे नाक घासून, प्रसंगी डोकं फोडून माफी मागावी... पण एकुण मामला शक्य तेवढा लवकर थंड करावा... तेच फायद्याचं ठरतं... . कारण जर प्रकरण एका लिमिटबाहेर गेलं तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायाचा प्राणवायू - म्हणजे पैसा तुटण्यावर होतो. आणि याचा शेवट व्यवसायासाठी खुप वाईट असतो... . एबीपी माझा इथेच चुकतंय. टायटल चुकलं किँवा कार्यक्रम चुकला - मान्य...! बोस्टन हाऊसमध्ये हाडामासाची माणसंच काम करतात. चुक होते ! . पण ट्विटर, फेसबूक आणि त्यांच्या ऑफीसला येणाऱ्‍या मेल्स, पत्र यांतून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी (जे एंड यूजर्स आहेत) बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली... जी प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य आहे - ती एबीपीने सातत्याने फाट्यावर मारली, ही घोडचूक ठरतेय... एबीपी माझा जरी स्वतंत्र चॅनेल असलं तरीही कार्यक्रम बघणारे प्रेक्षक आहेत, त्यांच्या संख्येनूसार जाहिराती देणारे जाहिरातदार आहेत... आणि एका चुकीमूळे प्रेक्षकांचा एक पुर्ण वर्ग जर दुरावत असेल तर व्यवसायासाठी ती धोक्याची घंटा आहे. . या प...

पु. ल.

१२ जून २००० पु. ल. या देवाचं अवतारकार्य संपला तो दिवस...! . शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी... त्याला पु. ल. तरी अपवाद कसे ठरतील...? पुलं तुम्हाला पुण्यात रुपालीच्या पहील्या मजल्यावर तर शोधूनही सापडणार नाहीत... पु.ल. त्यांच्या पुस्तकांची पारायणं करुनही भेटणार नाही... हा देव तुम्हाला अवतीभवती मात्र चराचरात दिसेल... . दातांच्या जागी छापखान्यातले खिळे बसवलेला आणि जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचे क्लासेस उघडलेय अश्या सखाराम गटणेच्या रुपात... उघड्या तोँडाच्या पण तितक्याच प्रेमळ माणसांच्या अंतू बर्व्याच्या रुपात... सोसायटीच्या मिटीँग्समध्ये... मराठी शाळाशाळांत तर असंख्य चितळे मास्तर भेटतील... रावसाहेब तर गल्लीगल्लीत - घराघरात, घर म्हणून अख्खं गाव दाखवणाऱ्‍यांत पुलंची अनेक पात्र भेटतात... पोष्टातल्या काऊंटरमागच्या माणसाच्या टक्कलावर केस आले की आज सुद्धा मराठी माणूस त्याची बदली झाल्याचं लगेच ओळखतो... पहीली परदेशवारी आठवून बघा... पुलंना मिळाले तेच सल्ले आपल्यालाही मिळतात... लग्नकार्यात येणारा नारायण हल्ली कुणाच्या मयतालाही दिसतो... . तुम्ही मुंबईत विरारला राहतांना अ...

एक महत्वाचं कौतूक

एक महत्वाचं कौतूक . गेले अडीच ते तीन महीने निवडणूकीची धांदल आपण पाहिली. एक्क्याण्णव कोटी मतदार, पाचशे बेचाळीस जागा, वीस हजाराच्या जवळपास उमेदवार, सात फेऱ्‍या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही... . भारतात लोकशाही टिकवणं सोप्पं नाही. इथे दर तीन लोकांमागे एक जण द्वाड आहे, एक जण उपद्व्यापी आहे. एक जण दिडशहाणा आहे. भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. राज्याराज्यात लोकल गावगुंड आहेत. भाषा, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यातही मे चं कडक ऊन. भरीस भर म्हणजे कंट्रोल न ठेवता येणारं सोशल मिडीया. . तरीही भारतीय लोकशाहीचा प्रचंड विजय झाला... पक्षाचा विचार बाजूला ठेवा. लोकशाहीने सतरावी लोकसभा देशाला दिलीय.... आचारसंहीता पाळून. पवित्रपणे, प्रामाणिकपणे...! . तीन महिन्याच्या प्रचारात प्रचंड धुराळा उडाला. इव्हीएमवर आरोप झाले. एकमेकांवर चिखलफेक झाली, हाणामाऱ्‍या झाल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली होत्या... मोदीँपासून राहुलपर्यँत सगळ्यांवर या यंत्रणेची घट्ट पकड होती... ती यंत्रणा म्हणजे "भारतीय निवडणूक आयोग"... आज मोदी किँवा राहूल जिँकले नाही, तर भक्कमपणे हा लोकन्नाथाचा रथ ओढून संसदे...

कामगार-नवरा दिन

शॉपीँगला गेल्यावर बॅग्ज उचलणं, डिमार्टला गेल्यावर ट्रॉली ढकलणं, वरचे डब्बे काढून देणं, कितीही दमलेलं असा - "चला" म्हणल्यावर कुठलंही कारण न देता गाडीवर ड्रायव्हर होवून बसणं, आपण कोण, काय करतात याच्याशी देणंघेणं न ठेवता गिरणीत दळण आणायला जाणं, रात्री एकटीला किचन मध्ये जायची भिती वाटते म्हणून पाणी आणायला जाणं, घरात पाल दिसली तर हुसकावणं, तिचा फोन चार्जिँगला लावणं, बटाटे सोलणं, घरी असतांना तिच्या माहेरचा किँवा मैत्रीणीचा फोन आला आणि सापडत नसेल तर सापडवून हातात नेवून देणं, ईथून ते - तिचा आयटीआर भरणं, तिच्या शाळेचं अकाऊंटस् बघणं, माझ्या ऑफीसच्या स्टाफ आधी तिच्या शाळेच्या स्टाफला बोनस वगैरे वाटणं, त्यांच्या सॅलरीजचं मॅनेजमेँट करणं, तिच्या डिप्लोमा कोर्सचं सबमिशन तयार करुन देणं etc. etc. etc... . भर म्हणून, दर शनिवारी न चुकता निशा मोँजोलीकाच्या रेसिपी व्हिडीयो ऐकाव्या लागतात. टळत नाही ते ! . "नवरा हा अलिखीत कामगार असतो"... त्यामुळे आजचा दिवस कामगार दिनासह नवरा दिन म्हणूनही साजरा व्हावा...! . कामगार-नवरा दिनाच्या शुभेच्छा. - तेजस कुळकर्णी (टि.के. टेक्नॉलॉजी प्रा.ली., अं...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved