Education Fact and Expectations !!

काल दहावीच्या परीक्षेत ९४ % मिळवलेलं पोरगं आत्ताच आई वडिलांबरोबर आमच्या घरी आलेलं... तासाभरासाठी आल्यावर टिव्ही आणि गेम्स वर तो अक्षरश: अधाशासारखा तुटून पडला... त्या नादात माझं जॉयस्टिक खराब झालं ते वेगळं, पण दोन वर्षांनंतर तो माणसात आला होता. त्याचं दहावीच्या अभ्यासातल्या पुस्तकातलं पान न पान पाठ, अगदी गणितं तोँडपाठ. पण बातम्या, गेम्स, मूविज वगैरे बद्दल बोलतांना तो मख्खं चेहरा करुन बसला होता...
.
"आमच्या xला तशी अपेक्षा ९८ % ची होती. आम्ही पेपर्स रिराईट करुन चेक केले होते... तेव्हापण ९८ आलेले. बघ ना तेजा. याच्याकडून तरी इतका डेनाईट स्टडी करुन घेतला रे..." - त्याची आई
.
अर्र्र्र्र, तुझी नाय चूक गड्या...
२ वर्षात पोराने मार्क मिळवले, पण अक्कल आणि व्यवहारज्ञान गमावलं...
.
मी माझ्या दहावीच्या पेपरच्या आधीच्या दिवशी मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला गेलो होतो... अभ्यास अभ्यास करुन वेड लागेल तेजा, पप्पांनी मारुन ओरडून बळजबरी खेळायला पाठवलं होतं...
- मार्क ९०+ नाही, पण समाधानकारक मिळाले होते. आज गाडं तसं रुळावर आहे.
.
पोरांनो, सांभाळा... खेळा, मज्जा करा.
१ महिन्यात घाण्याला जूंपून
१२ वी चं तेल पाडायचंय !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved