Posts

Showing posts from February, 2017

तारक मेहता यांचं निधन..

Image
गुजराती भाषेतले सिद्धहस्त विनोदी लेखक पद्मश्री तारक मेहता यांचं आज अहमदाबादेत ८८ व्या वर्षी निधन झालं. . सामाजिक विषयांवर विनोदी टचने भाष्य करत दिव्य भास्कर मधील दुनिया ने ओंधा चष्मा या कॉलमने गुजराती मानदंड प्रस्थापित केला होता. त्यांच्या त्या कॉलम वर आधारीत "तारक मेहता का उल्टा चष्मा" सिरीयल आज यशाच्या शिखरावर आहे...  गुजराती नाट्यविश्वातले विश्वामित्र म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी ऐंशीच्या वर पुस्तकं लिहीली. .. दुनियाने औंधा चष्मा, अॅक्शन रिप्ले, चंपकलाल टपूनी जुगलबंदी, बेताज बाटलीबाज पोपटलाल इ. त्यांच्या अजरामर कलाकृती. . तारक मेहता यांनी इच्छेनुसार देहदान केले... ! तारक मेहता का उल्टा चष्मा या सिरीयलसह अनेक अजरामर कलाकृती देवून एक अवलीया जगाला टाटा करून निघून गेला.

पोटोबा

हॅलो, अरे आज मी येणार नाहीय, यू हॅव टू हँडल... - ओके सर, बट एनी प्रॉब्लेम ? हेल्थ वगैरे ? - नो नो... आय एम ऑलराईट... काही पर्सनल कामं आहेत... .... कुठल्याही डिमांडवर, १. बटाट्याची साल काढून देणं. २. मटर सोलून देणं ३. नारळ खवून देणं आणि, . वर्षभरात एकदा सुट्टी घेऊन "पापड बनवण्यासाठी उडीद डाळ पुसून देणं" ही न टाळता येणारी कामं करावी लागतात... . सगळ्यांनाच...! काहींचं दिसतं काहींचं नाही... इथे तुम्ही कंपनीचे बॉस आहात किंवा सीएम याचा विचार करत नाहीत... जिभ आणि पोटोबाचे लाड पुरवायचेत, हे काम करावं च लागेल ! ... आईच्या राज्यात हे... पुढच्या विचारानं धडssकी भरलीय.. पण, मला एवढंच येतं... बाकी चहा पण हातात मिळाला तरच... बनवता वगैरे येत नाही... हॉटेल जिंदाबाद ! .. ...

खान्देश, Khandedh

Image
फिरायला जायची बहुतेकांची ठिकाणं ठरलेली असतात आणि चुकूनही फारसं कुणी खान्देश बघायला जात नाही. पण खरंच वेगळं काही अनुभवायचं असेल तर या खान्देशात बरंच काही आहे. महाराष्ट्रात फिरायला कुठे कुठे जाता येईल, याची यादी सहजच काढली जाते, तेव्हा त्यात खान्देशाची नोंद क्वचितच घेतली जाते. त्यामुळे धुळे, नंदुरबार हे तसे उपेक्षित जिल्हे आहेत, असे जाणवते. जळगाव तरी चच्रेत असते. पण ‘चला, या सुट्टीत धुळ्याला फिरायला जाऊ’, असे कोणी म्हणताना सहसा दिसत नाहीत. त्यात तिथे उन्हाळा प्रचंड असतो. त्यामुळे, लोकांच्या मे महिन्याच्या सुट्टीतूनदेखील इतक्या उकाडय़ाचा प्रदेश बाद होतो. धुळे, नंदुरबार हे महाराष्ट्राचे उत्तरपश्चिम टोक म्हणावे लागेल. गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमा इथून जवळ आहेत. त्यामुळे, हे दोन्ही जिल्हे पश्चिम खान्देश म्हणून ओळखले जातात. जळगावचा भाग हा पूर्व खान्देश आहे. पश्चिम खान्देशात अहिराणी बोलली जाते. तर पूर्व खान्देशात वऱ्हाडी. नंदुरबार जिल्हा धुळ्यापासून वेगळा झालेला आहे. ‘खान्देश’ असा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा त्यात महाराष्ट्रातले धुळे, नंदुरबार, जळगाव हे तीन जिल्हे येतातच, पण...

मराठी दिन

मराठी मातृभाषा आहे... विचार ते शिव्याशाप सगळं मराठीत... इंग्रजीतून - हिंदीतून व्यक्त व्हावं लागलं तरी मराठी अभिजात आहे... ! ... टिव्हीवरच्या अॅक्ट्रेसवर, ऑफीसमधल्या सेक्रेटरीवर कितीही जीव आला तर, माणसाचा कंट्रोल बायकोच्याच हातात असतो.. सो, मराठी कुठेही संपत नाही. .. मराठी संपतेय या बोंबा मारत, सहज न बोलता अलंकारीक शब्द घूसडून गोड मराठी रटाळवाणी करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका... प्रतिशब्द शोधत त्यांचं आयुष्य खपतंय. .. मराठीवर प्रेम करु, वाचू, बोलू.. लिहून समृद्ध पण करु.. इतर भाषेतलं दर्जेदार साहित्य मराठीत अनुवाद करु...! बरंच काही आहे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी ते कुसुमाग्रज, विंदा, सुरेश भट, गदीमां, गडकरी यांसारखी रत्न मराठीत आहेत, थिल्लर, अडगळीतलं भालचंद्र, श्रीपाल वगैरे लोकंही आहेत. तुम्ही-मी आहे. मराठी आहे ! मराठी संपत नाही, संपणार नाही हे मात्र खरं ! .. #मराठी_भाषा_दिन

महाशिवरात्र

Image
उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या कुशीत केदारनाथ आहे. हा परीसर शिवलीलांनी प्रेरीत असा अद्भूत आहे. बाबा केदारनाथ, गौरीकुंड, गणेश जन्मस्थान अशी अनेक स्थळे तिथे आहेत, यातलं अजून एक महत्वाचं स्थळ, केदारनाथपासून २० किमी अंतरावर असलेलं रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं "त्रियुगीनारायण"... .. त्रियुगीनारायण हे शिव पार्वतीचे विवाहस्थळ. जिथे साक्षात महादेव आणि पार्वती यांनी श्रीविष्णूच्या साक्षीने विवाह केला. त्या घटनेची साक्ष म्हणून अखंड धुनी तिथे आहे. साळीच्या लाह्यांची आहूती त्यात द्यावी लागते. तिन युगांपासून अखंडपणे ती धुनी सुरु आहे. त्यामुळे त्रियुगी - आणि विष्णूचे मंदीर असल्याने नारायण अशी ओळख त्या मंदिराची आहे. इथून गरम पाण्याचे झरे वाहतात. पार्वतीने शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी गौरीकुंड येथे तप केले, गुप्तकाशी येथे मागणी घातली आणि त्रियुगीनारायण येथे विवाह केला. . केदारनाथपासून जवळ असुनही गर्दीपासून अलिप्त असं नयनरम्य, शांत ठिकाण आहे. मंदिरही जुनं साधं बांधकाम असलेलंच ! साक्षात देव याठिकाणी विवाह करुन गेले ही भावना तिथे रोमांच उभे करते... . शिवपार्वतीचा विवाह झाला ती रात्र म्हणजे महाशिवर...

Smart BJP

Image
देवेंद्र फडणवीस - किरीट सोमय्या - आशिष शेलार या त्रिकुटानं उ.ठा. आणि शेणेचा मस्त गेम केलाय... . युतीत ५६ जागा नाकारून भिजत घोंगडं ठेवलं, आणि युती तुटायची घोषणा उ. ठा. च्या तोंडून केली... इथेच उठा फसले. उताविळपणे पुन्हा युती नाही अशी घोषणा केली... परत मनसेला दारातून परत पाठवलं... युती सेनेमुळे तुटली... भाजपावर आक्रस्ताळेपणे पातळी सोडून आरोप करत सुटले. ... आज उ.ठा. पुर्ण कात्रीत सापडले... युती केल्याशिवाय पर्याय नाही, युती केली तर मराठी माणसाकडून बक्कळ शिव्या पडतील, लाज निघेल... परत युतीसाठी ताट घेऊन स्वतःच जावं लागेल.. . लै मोठा गेम ! उ. ठा. ना गाजर मिळालं :-D मज्जा आली !

MC Election 2017

Image
कमळ फुललंय... भाजपाला चौफेर यश... ! पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर या महत्वाच्या महापालिकात भाजपाची जोरदार मुसंडी ! सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन :) .. मनसे, शिवसेना यांचे सांत्वन... (सेनेला मुंबईत मस्त चॉकलेट मिळाले, पुण्यासह इतर ठिकाणी औव्वा. मनसे नाशिकमध्ये सुपडा साफ... ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस उरलेले असल्यास त्यांचेही सांत्वन ! ... खिल गया कमल ! छा गया कमल !

Lovely Boss

ऑफीसला येण्यासाठी उशीर झाला म्हणून आधी चिडचिड करुन झाल्यावर कारण विचारलं... हातातला बॉक्स, मागे लपवत त्याने गोंधळून उत्तर दिलं... "सर, संकष्टी आहे ना"... देवळात गेलो होतो... ... देवळात ? ऑफीस सोडून ? फोन करुन सांगता येत नाही ?... सगळी लिंक बिघडते.. ...पुन्हा ५-१० मिनिटाची चिडचिड... ... तोच काहीतरी क्लिक झालं.. त्याच्या हातातला बॉक्स आणि तो गोंधळ समजून माझा पारा झटकन उतरला... आणि उगाच चिडचिड झाल्याची जाणीव झाली.. ... "श्रेया आलीय ?" - नो सर... "इथेच आहे ?" - यस सर... सकाळीच भेटलो... ओके... बरं तू कुणाच्या देवळात गेलेला  ? "श्रेयाच्या" ? लाज - लज्जा वगैरे त्याच्या चेहऱ्यावर एकत्र दिसलं... - नो नो सर... खरं सांग... :-O - अॅक्च्यूअली यस सर... बट एक्स्ट्रेमली सॉरी सर, जावंच लागलं... .. श्रेया आमच्याच इथं !  दोन वर्षापूर्वी मेलेल्या आज्जीला पून्हा मारुन आज सुट्टी घेतलेली... ती थाप पकडली गेली आणि सगळी लिंक लागली... ओsह ओsह ओsssह... .. त्याच्या चेहरा किव करावा इतपत झाला होता.. सॉरी सर... चा जयघोष यादरम्यान सुरू होता.. इटस् ओके...

व्हॅलेँटाईन्स डे...

व्हॅलेँटाईन्स डे... महागडी गिफ्टस्, मूवी, लॉँगड्राइव्ह, सारसबागेत चक्कर, कुठल्यातरी कोपऱ्‍यात बसून काही मोक्याचे क्षण, डिनर-ड्रिँक - शहरातलं Valentine's. आज त्याने मुद्दाम तिला आवडणारा टिशर्ट घातलेला. सकाळपासून सायकलवरुन दोनदा चक्कर मारुन तिच्या एका "श्माईल"साठी त्याची धडपड सुरु होती... दुपारी माडाच्या बनात भेटायला जातांना तिने त्याच्या आवडीचा नारळीभात डब्यात नेला होता... त्याने जत्रेतून आणलेली शिँपल्यांची कर्णफूलं समोर धरताच आनंदानं लाजून तिचा चेहरा लाल झाला. - गावाकडचं Valentine's अंगात ताप असतांनाही तो शाळेत गेलाच... मधल्या सुट्टीत त्याने तिच्या बॅगमध्ये गूपचूप चॉकलेट ठेवलं... शाळा सुटल्यानंतर त्याच्या बॅगमध्येही चॉकलेट सापडलं... तिने त्याला दिलेल्या ओळखीच्या स्माईलने त्याचा अख्खा दिवस साजरा झाला. - शाळेतला पहिलावहीला गूपचूप Valentine's ! लोकांघरची कामं करुन दमलेल्या गंगीने झोपडीतल्या कोपऱ्‍यात चारही पोरांना झोपवलं. चौघं पोरं झोपलेली पाहून नाम्यानं गंगीच्या केसात कामावरुन येतांना आठवणीने आणलेला गजरा माळला... गंगीने लाजून दोन्ही हातांनी आपला चेहरा झ...

प्रेम आणि गीत

सध्या सगळेच प्रेममय झाले असल्यामुळे पुढचे चार दिवस आवडत्या प्रेम गीतांसाठी मराठीत आवडलेली प्रेम गीत ही आशा ताईंनी गायली आहेत... रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना... किंवा चांदण्यात फिरताना माझा धरलास हात... केव्हा तरी पहाटे.. शारद सुंदर चंदेरी राती...अशी एकसे एक गाणी आहेत...आशा ताईंच्या  खोडकर आणि  मादक आवजात प्रियकराला साद आहे... पण तरी सगळ्यात जास्त आवडलेलं किंवा आवर्जून ऐकावं असं एक गाणं जे अलीकडेच आहे..अजय अतुल यांनी दिलेलं संगीत.. हरिहरन आणि श्रेया घोषाल च्या आवाजातील जीव दंगला गुंगला रंगला या गाण्यात काय नाहीये... Passionate प्रेम, पहिल्या स्पर्शाची आतुरता... श्रेया घोषाल  'काळीज माझं तू' गाते तेव्हा वाटत काळीज हातात काढून ते दिल समोरच्याला ... या गाण्यातील बासुरी इतकं सुंदर काहीच नाही... यश चोप्रांच्या चित्रपटात माणूस प्रेमात पडल्यावर मागे Violin वाजवताना दाखवतात...पण मला वाटत प्रेमात पडल्यावर मनात बासुरी वाजली पाहिजे....थंड हवेबरोबर बासुरीचे शांत सूर...आणि हृदयाची वाढलेली धडधड... तर असे रोमांचित करणार  आवडणार प्रेम गीत... जीव दंगला गुंगला...

Hug Day

Image
हग डे... कितीही सुधारलो, वेस्टर्न कल्चर वगैरे अंगिकारलं तरी वार्म हग च्या नावाखाली कुणाच्याही अंगचाटीला जाणं नाहीच आवडत... आणि ते कितीही प्रामाणिक असलं तरी त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो याचं भान असतं... खासकरुन मैत्रिणी, दुरच्या नात्यातल्या स्त्रिया, सहकारी या कितीही जवळच्या असल्या तरी लाळघोट्या माणसांसारखं जवळ जाणं, थोपणं, मिठी मारणं इव्हन इव्हन बळजबरी शेकहॅन्ड करणंही काही वेळा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी किळस निर्माण करू शकतो...! .. उच्चभ्रूपणाचा बुरखा घातलेल्या बऱ्याच लोकांना मैत्रिण दिसली की हा हा ही ही करत जवळ जाणं.. अगदी आंगचाटीला जाणं, गाल ओढणं, खांद्यावर हात ठेवणं... त्या घोळक्यात जाऊन उभं राहणं वगैरे लाड सुचतात... तोंडावर भले चांगलं म्हणतील, मागून घाण तोंड केलंच जातं... विवाहीत स्त्री सुद्धा सोडत नाहीत... स्त्री ही स्त्री च असते... तिला बळजबरी केलेला स्पर्श आणि तिच्या संमतीने केलेला स्पर्श समजतो. प्रतिक्रीया म्हणून आपली इमेज बिघडते... ... दुरुन बोलल्यावर विश्वास, मान वाढतो.. मग ती कितीही जवळची मैत्रिण असेना...! बायको, girlfriend वगळता इतर कुणा...

विलेशकन वगैरे

पुण्यात नवले ब्रिजपाशी पोलीस प्रत्येक गाडी अडवून लायसन्स, गाडी नं, नांव, फोन नं वगैरे घेताय... इलेक्शन च्या दृष्टीने असेल.. आणि ही नोंद करण्याचं काम महिला पोलीस करताय... पुरुष पोलीस गाड्या अडवायचं ! त्या महिला पोलीसांत एक बऱ्याच वयस्कर, दुसऱ्या नवीनच जॉईन झालेल्या... आत्ताच.... गाडी लावली, लायसन्स दिलं, आणि शांतपणे बाजूला जाऊन उभा राहीलो... त्या वयस्कर बाई लायसन्स, गाडी नं इ. माहिती दुसऱ्या बाईंना सांगतात, त्या दुसऱ्या सगळी नोंद त्या चार्टमध्ये करतात... असा कार्यक्रम ! ... नांव, गाडी नं, लायसन्स नं इतकं झाल्यावर कोणती गाडी ? या प्रश्नावर बाई अडल्या... त्यांना ते "पल्सर" नांव काही केल्या घेता येईना... "Pulsar" चं त्या पुसर पुसर असं काहीतरी बोलत होत्या... दुसऱ्या बाईंना ते नेमकं कळत नव्हतं... त्या बाईंनी शेवटी केविलवाण्या नजरेनं विचारलं, आणि मी "प ल्स र" असं तारसप्तकात ओडल्यावर नोंद करणारे जोरदार हसायला लागले... "जळलं मेलं कठीण नांव..." त्या बाईंची बोलकी प्रतिक्रिया..! .. तेवढ्यात तिथे फुलवाद भारकाडे अश्या विचित्र नावाचा माणूस आला...

Budget 2017-2018

उत्तम बजेट.... दिलासादायक...!! जियो जियो ! ३ लाख पर्यंत कर नाही ! पुढे खूप सवलती...! पॉलीटीकल पार्टी, एनजीओ ची नाडी आवळलीय ! त्यांना दोन हजारापेक्षा जास्त देणगी चेकनं घ्यावी लागेल... ! बिल्डअप एरीयाच कार्पेट एरीया ठरवला. छोट्या कंपन्यांना ५ टक्के सूट ! .. प्रवेश परीक्षा वगैरे बाकीचं इतकं घेणं देणं नाही... टॅक्स स्लॅब, बांधकामचा थेट फायदा होतोय, त्यामुळे आनंद !  पॉलिटीकल पार्टीची नाडी आवळल्यानं कमालीचा आसुरी आनंद झालाय ! ... महत्वाचे मुद्दे ! (१) ३ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त. (२) ३ ते ३.५ लाख : २५०० रु. (३) ३.५ लाख ते ५ लाख : १० टक्क्यावरुन ५ टक्के. ते पण फक्त एक पानी अर्ज भरुन. (४) छोट्या कंपनी, कारखान्यांना टॅक्समध्ये ५ % सूट ! स्टार्टअपला सात वर्ष करात सूट. (५) तीन लाखांवरचे व्यवहार रोख होणार नाही. पारदर्शकता येऊ शकते ! (६) बिल्ड अप एरीयाच कार्पेट एरीया गृहीत धरणार. . ता. क. : बजेटमध्ये पुर्ण मोदींचं डोकं दिसतंय, जेटली इतके हुषार नाही हे जगन्मान्य सत्य आहे. पेट्रोलचे दर वाढले त्यामागे जेटलीच आहे. एक्साईज ड्यूटी वाढवल्याने किमती वाढल्या ! त्याचं खापर जागति...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved