मराठी दिन

मराठी मातृभाषा आहे... विचार ते शिव्याशाप सगळं मराठीत...
इंग्रजीतून - हिंदीतून व्यक्त व्हावं लागलं तरी मराठी अभिजात आहे... !
...
टिव्हीवरच्या अॅक्ट्रेसवर, ऑफीसमधल्या सेक्रेटरीवर कितीही जीव आला तर, माणसाचा कंट्रोल बायकोच्याच हातात असतो..
सो, मराठी कुठेही संपत नाही.
..
मराठी संपतेय या बोंबा मारत, सहज न बोलता अलंकारीक शब्द घूसडून गोड मराठी रटाळवाणी करणाऱ्या लोकांच्या नादी लागू नका... प्रतिशब्द शोधत त्यांचं आयुष्य खपतंय.
..
मराठीवर प्रेम करु, वाचू, बोलू.. लिहून समृद्ध पण करु..
इतर भाषेतलं दर्जेदार साहित्य मराठीत अनुवाद करु...!
बरंच काही आहे,
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी ते कुसुमाग्रज, विंदा, सुरेश भट, गदीमां, गडकरी यांसारखी रत्न मराठीत आहेत,
थिल्लर, अडगळीतलं भालचंद्र, श्रीपाल वगैरे लोकंही आहेत.
तुम्ही-मी आहे.
मराठी आहे !
मराठी संपत नाही, संपणार नाही हे मात्र खरं !
..
#मराठी_भाषा_दिन

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved