Lovely Boss

ऑफीसला येण्यासाठी उशीर झाला म्हणून आधी चिडचिड करुन झाल्यावर कारण विचारलं...
हातातला बॉक्स, मागे लपवत त्याने गोंधळून उत्तर दिलं...
"सर, संकष्टी आहे ना"... देवळात गेलो होतो...
...
देवळात ? ऑफीस सोडून ? फोन करुन सांगता येत नाही ?...
सगळी लिंक बिघडते..
...पुन्हा ५-१० मिनिटाची चिडचिड...
...
तोच काहीतरी क्लिक झालं..
त्याच्या हातातला बॉक्स आणि तो गोंधळ समजून माझा पारा झटकन उतरला... आणि उगाच चिडचिड झाल्याची जाणीव झाली..
...
"श्रेया आलीय ?"
- नो सर...
"इथेच आहे ?"
- यस सर... सकाळीच भेटलो...
ओके...
बरं तू कुणाच्या देवळात गेलेला  ? "श्रेयाच्या" ?
लाज - लज्जा वगैरे त्याच्या चेहऱ्यावर एकत्र दिसलं...
- नो नो सर...
खरं सांग... :-O
- अॅक्च्यूअली यस सर... बट एक्स्ट्रेमली सॉरी सर, जावंच लागलं...
..
श्रेया आमच्याच इथं !  दोन वर्षापूर्वी मेलेल्या आज्जीला पून्हा मारुन आज सुट्टी घेतलेली... ती थाप पकडली गेली आणि सगळी लिंक लागली... ओsह ओsह ओsssह...
..
त्याच्या चेहरा किव करावा इतपत झाला होता..
सॉरी सर... चा जयघोष यादरम्यान सुरू होता..
इटस् ओके... वेट...
..
हॅलो ऑल,
"आज ऑफीशिअल ऑफ डिक्लेअर करतोय"..
फॉर वॅलेंन्टाईन :-D
ऑल शिफ्टस् करता...!
हॅव व फन... !
१६ ला रेग्यूलर शिफ्टस् होतील !
ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भलं मोठ्ठं हसू फुटलं... !
..
आज्जीला पोचवायला येतोय असा मेसेज करून श्रेयाचे मज्जेत ऑफीशिअल लाईट लावले ते वेगळे..
पण पण...
यानिमित्ताने ऑफीसमध्येच तिघं कपल्स आहेत हे समजलं...
तसंच व्हॅलेंटाईन डे ला सुट्टी देऊन एखाद्या फुलपाखराकडून
"यू आर सच अ लवली बॉस''
अशी गोड कॉम्प्लिमेंटही मिळवू शकतात... !
:-D
...
प्यार बाँटते चलो...!
काम आपोआप होतं...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved