Hug Day

हग डे...
कितीही सुधारलो, वेस्टर्न कल्चर वगैरे अंगिकारलं तरी वार्म हग च्या नावाखाली कुणाच्याही अंगचाटीला जाणं नाहीच आवडत... आणि ते कितीही प्रामाणिक असलं तरी त्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो याचं भान असतं... खासकरुन मैत्रिणी, दुरच्या नात्यातल्या स्त्रिया, सहकारी या कितीही जवळच्या असल्या तरी लाळघोट्या माणसांसारखं जवळ जाणं, थोपणं, मिठी मारणं इव्हन इव्हन बळजबरी शेकहॅन्ड करणंही काही वेळा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी किळस निर्माण करू शकतो...!
..
उच्चभ्रूपणाचा बुरखा घातलेल्या बऱ्याच लोकांना मैत्रिण दिसली की हा हा ही ही करत जवळ जाणं.. अगदी आंगचाटीला जाणं, गाल ओढणं, खांद्यावर हात ठेवणं... त्या घोळक्यात जाऊन उभं राहणं वगैरे लाड सुचतात... तोंडावर भले चांगलं म्हणतील, मागून घाण तोंड केलंच जातं... विवाहीत स्त्री सुद्धा सोडत नाहीत... स्त्री ही स्त्री च असते... तिला बळजबरी केलेला स्पर्श आणि तिच्या संमतीने केलेला स्पर्श समजतो. प्रतिक्रीया म्हणून आपली इमेज बिघडते...
...
दुरुन बोलल्यावर विश्वास, मान वाढतो..
मग ती कितीही जवळची मैत्रिण असेना...!
बायको, girlfriend वगळता इतर कुणालाही स्वतःहून हग वगैरे करण्याच्या भानगडीत न पडलेलंच बरं... बळजबरी..!
जेव्हा दोन्हीकडून (म्हणजे सहसंमतीने) येतं, तेव्हा खरं हग होतं... ते परफेक्ट, अनुभवण्यासारखं !
वार्म बिम सगळंच ! तिथं नो वर्ड, नो एक्सप्लेनेशन... फूल मज्जानू लाईफ !
..
या अंगचाटीचा एक किस्सा आठवला, साधारण पंधरा दिवसांपूर्वीचा. माझ्यासमोर घडलं..!
एका थ्री स्टार सेमिनारला मी आणि माझी मैत्रिण गेलो...
आयोजकांकडून बिजनेस इनफार्मलनेस दाखवणं सुरू होतं...
या प्रकाराचा भाग म्हणून गेटवर वेलकम हग वगैरे झालं..
ती मैत्रिण आली, वेलकम ला हसून दुरुनच थँक यू वगैरे बोलली,
तो आयोजक त्या मैत्रिणीला हात लावणार तोच तिने
"ओ मिस्टर, बि इन लिमीट.. डोन्ट टच.... आय डोन्ट लाईक धिस..."
म्हणून त्याचा हात चारचौघात झटकला...
त्याचा फूल्टू पचका.
नंतर त्या माणसानं कुणालाही वेलकम हग वगैरे दिलं नाही...!
असो !
..
जंटलमन रहनेका भाय.. ! क्या ?
...
:-D :-D
हॅप्पी हग डे... उद्याचाही डे हॅप्पी.. परवाचाही..!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved