प्रेम आणि गीत

सध्या सगळेच प्रेममय झाले असल्यामुळे पुढचे चार दिवस आवडत्या प्रेम गीतांसाठी
मराठीत आवडलेली प्रेम गीत ही आशा ताईंनी गायली आहेत...
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना... किंवा चांदण्यात फिरताना माझा धरलास हात... केव्हा तरी पहाटे..
शारद सुंदर चंदेरी राती...अशी एकसे एक गाणी आहेत...आशा ताईंच्या  खोडकर आणि  मादक आवजात प्रियकराला साद आहे...
पण तरी सगळ्यात जास्त आवडलेलं किंवा आवर्जून ऐकावं असं एक गाणं जे अलीकडेच आहे..अजय अतुल यांनी दिलेलं संगीत.. हरिहरन आणि श्रेया घोषाल च्या आवाजातील
जीव दंगला गुंगला रंगला
या गाण्यात काय नाहीये... Passionate प्रेम, पहिल्या स्पर्शाची आतुरता...
श्रेया घोषाल  'काळीज माझं तू' गाते तेव्हा वाटत काळीज हातात काढून ते दिल समोरच्याला ...
या गाण्यातील बासुरी इतकं सुंदर काहीच नाही...
यश चोप्रांच्या चित्रपटात माणूस प्रेमात पडल्यावर मागे Violin वाजवताना दाखवतात...पण मला वाटत प्रेमात पडल्यावर मनात बासुरी वाजली पाहिजे....थंड हवेबरोबर बासुरीचे शांत सूर...आणि हृदयाची वाढलेली धडधड...
तर असे रोमांचित करणार  आवडणार प्रेम गीत...
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू
पैलतीरा नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू
सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू .....
- साभार (रश्मी पुराणिक)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved