विलेशकन वगैरे

पुण्यात नवले ब्रिजपाशी पोलीस प्रत्येक गाडी अडवून लायसन्स, गाडी नं, नांव, फोन नं वगैरे घेताय... इलेक्शन च्या दृष्टीने असेल..
आणि ही नोंद करण्याचं काम महिला पोलीस करताय... पुरुष पोलीस गाड्या अडवायचं !
त्या महिला पोलीसांत एक बऱ्याच वयस्कर, दुसऱ्या नवीनच जॉईन झालेल्या...
आत्ताच....
गाडी लावली, लायसन्स दिलं, आणि शांतपणे बाजूला जाऊन उभा राहीलो...
त्या वयस्कर बाई लायसन्स, गाडी नं इ. माहिती दुसऱ्या बाईंना सांगतात, त्या दुसऱ्या सगळी नोंद त्या चार्टमध्ये करतात... असा कार्यक्रम !
...
नांव, गाडी नं, लायसन्स नं इतकं झाल्यावर
कोणती गाडी ? या प्रश्नावर बाई अडल्या...
त्यांना ते "पल्सर" नांव काही केल्या घेता येईना...
"Pulsar" चं त्या पुसर पुसर असं काहीतरी बोलत होत्या...
दुसऱ्या बाईंना ते नेमकं कळत नव्हतं...
त्या बाईंनी शेवटी केविलवाण्या नजरेनं विचारलं,
आणि मी "प ल्स र" असं तारसप्तकात ओडल्यावर नोंद करणारे जोरदार हसायला लागले...
"जळलं मेलं कठीण नांव..." त्या बाईंची बोलकी प्रतिक्रिया..!
..
तेवढ्यात तिथे फुलवाद भारकाडे अश्या विचित्र नावाचा माणूस आला, त्या माणसाचं नांव कांय हे लॉजीक लावता लावता त्या दोघांची सटकली होती, फुलवाद काय नांव असतं कां ?
"जळलं मेलं कठीण नांव..." त्या बाईंची दुसरी बोलकी प्रतिक्रिया..!
त्यात गाडी अडवली म्हणून तो फुलवाद थरथर...
"ओ पुलवात, चेक करुन सोडून देतोय, भ्यव नको..."
..
मला त्या दोघींची लिटरली दया आली...
एक एक नग हँडल करणं महाकठीण, त्यात Ladies..
ओ काकू... पाणी वगैरे घेणार कां ? बॉटल आहे...
अर्रर्र... दे बाबा... पहिला भेटलास रे !
त्या दोघींना पाण्याची बॉटल दिली,
त्यांचं काम, माझ्या गप्पा... पंधरा वीस मिनिट मस्त टाईमपास केला...!
"इलेक्शनचं काम पिडतंय... xxx" त्या बाईंची तिसरी बोलकी आणि जळजळीत प्रतिक्रिया आली..!
...
ओव्हरऑल मज्जा आली... :-D
पुसर... :-D
फुलवाद... :-D
पुलवात.... :-D
त्या काकू पण भन्नाट होत्या !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved