Birthday Of Papa

मास्टर्स पूर्ण झाल्यावर जॉब न करता मी व्यवसाय करायचं ठरवलं... निर्णय तसा रिस्की होता, परत पुणे सोडून मुंबईत जायचं ! खूप टेंशन यायचं, धडधड व्हायचं - व्यवसाय स्थिरसावर होईपर्यंत प्रचंड आर्थिक टणटण होणार हे ही नक्की होतं...
व्यवसायाची बॉर्न टू रन ही फेज काढणं तसं भयंकर असतं - प्रचंड कोंडी होते...
ती भयंकर फेज माझ्या नशीबातही आली... ते ही वयाच्या पंचविशीत !
...
पण पप्पा म्हणाले...  "तू कर - मी आहे सोबत... ! "
माझ्या नकळतच पप्पांनी माझी ती फेज सांभाळून घेतली... आर्थिक - भावनिक आणि मानसिकही...!
एका शब्दानेही जाणवू दिलं नाही...!
सगळंच सहज मान्य केलं ...
...
आता माझं गाडं ट्रॅकवर आलंय (टचवूड)..
काल पप्पांच्या डोळ्यात ते समाधान दिसलं... "माझ्या तेजाने त्याची कंपनी उभी केली"... त्यांनी हे बोलल्यावर टचकन पाणी आलं माझ्या डोळ्यात... सार्थक झालं...
...
माझ्यासाठी देव इथेच सुरु होतो, इथेच संपतो...
प्रत्यक्षातला !
...
माझ्या कातडीचे जोडे करून घातले तरी हे ऋण फिटणार नाही ... फिटायलाही नको !
Happy Birthday पप्पा !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved