Ujhma Pakistan Affair
उझमा नावाची भारतीय स्त्री सिंगापूर थायलंड फिलीपीन्सला मलेशियात फिरायला गेली. तिथे, ताहीर या पाकीस्तानी माणसाला भेटली. मैत्री झाली, प्रेमात पडली, तिथून एक आठवडा ती त्याच्याबरोबर पाकिस्तानला गेली. तिथे त्याच्याशी लग्न लावलं, आणि अंगावर आलं तसं आरडाओरडा सुरु केला...
..
उज्मा म्हणाली की अशा फसवून आणलेल्या कितीतरी विविध देशातील स्त्रिया तिथे होत्या...एकाच माणसाच्या अनेक बायका...
सुषमा स्वराज यांच्या मुळे आज ती सहीसलामत परत भारतात आली.. तिच्या येण्याचा सोहळा होतोय... ती किती निरागस आहे, किती भोगलं वगैरे सुरु आहे...
ति वाघा बॉर्डरवर नमस्कार करते,
सुषमा स्वराज यांना नमस्कार करते हे सारखं सारखं दाखवताय...
पण तथ्य आहे ?
..
आधी खङ्ङ्यात उडी मारायची आणि नंतर बाहेर काढण्यासाठी बोंबलायचं - मंत्रालयाने कामधंदे सोडून अश्या मुर्ख लोकांना वाचवायचं - इतकंच ?
मूळात घरी एक नवरा असतांना, पाच वर्षांची मुलगी असतांना परदेशात परपुरुषाबरोबर संबंध ठेवायचे, लग्न करायचं - झेपलं नाही की बोंबलायचं !
..
पाकिस्तानने तिचे सगळे आरोप पुराव्यासह फेटाळले आहेत...
- फसवून लग्न केलं -
पाकिस्तानी कचेरीत रितसर निकाह झाल्याची नोंद आहे...
- ताहीर विवाहीत आहे -
त्यांचं चॅट समोर आलं ज्यात तो विवाहीत आहे हे माहित होतं...
- फसवलं
टाळी एका हाताने वाजत नाही...
..
अश्या वाया गेलेल्या लोकांसाठी संवेदना, आनंद वगैरे गरजेचा नसतो...
हिच्या ऐवजी सैनिक, नागरीक, मासेमार यांना आणलं असतं तर आनंद झाला असता...
उजमा सारखी घाण तिकडेच बरी. तिच्यावर ना पैसा खर्च करावा ना वेळ... !
...
उझ्मा
कथेतले कच्चे दुवे...
१) दत्तक घेतलेली मुलगी आहे
२) रक्ताचे नातेवाईक कोणी नाही
३) एका पेक्षा जास्त लग्न झाली आहेत, आणि अर्थातच घटस्फोट पण
४) ५-६ वर्षाची मुलगीपण आहे ( काहीजण म्हणतायत २ - ३ मुल झाली आहेत)
५) मुलीच्या नावाने दिल्लीत बुटिक आहे
६) वर डॉक्टरपण झालीय...
७) तरीपण वय म्हणे फक्त २० वर्ष( काही जण २५-२८- ३० वर्ष म्हणतायत)
८) पासपोर्ट वरचा पत्ता खोटा आणि अपूर्ण आहे (सगळ्यात मोठा संशयाचा मुद्दा, पोलीस चौकशी वगैरे काही असते की नाही)
९) नवरा, मुलगी, वर उल्लेखलेले बुटिक हे सगळे सोडून मलेशियात गेली
१०) तिथे बहुसंख्य असलेले मलाय, तमिळ, सिंहली आणि NRI आहेत ते सोडून अल्पसंख्य पाकिस्तानी व्यक्तीच शोधला, तो पण बहुभार्या असलेला
११) मलेशिया मधून पाकिस्तानात गेली नातेवाईकांना भेटायच्या नावाखाली
१२) पण पाकिस्तानात हिचे कोणीही नातेवाईकच नाहीत
१३) लाहोर, कराची, इस्लामाबाद ह्या शहरांना सोडून गेली खैबरपख्तूनख्वा मध्ये, जो की कायदा-सुव्यवस्था नसलेला टोळीवाल्यांचा प्रदेश आहे,
१४) KPK मध्ये परदेशी हेरांचा भरपूर वावर आहे, हे जगजाहीर आहे
१५) नंतर KPK मधून नवऱ्याला फसवून, बोलबच्चन टाकून इस्लामाबाद ला घेऊन आली
१६) पाकिस्तान सारख्या देशात जिथं ताक पण फुंकून पितात तिथं तिला दुतावासात २-३ वाक्य बोलून थेट प्रवेश मिळाला, कोणत्याही चौकशी आणि तपासणी शिवाय
१७) पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर भारतात तात्पुरते / कायमस्वरूपी येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी हिंदूंची आणि भारतात उपचारासाठी येऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम प्रजेची भयंकर मोठी लाईन आसते, टोकन सिस्टीम असते, ८-१० दिवसांनी नंबर लागतो आणि मग प्रवेश मिळतो, हिचा लगेच नंबर कसा लागला ?
१८) अनेक हिंदू कुटुंबे मुली-तरुणी वर्षानुवर्षे भारतात आश्रय मागत आहेत, पण दूतावास तिकडे लक्ष पण देत नाही आणि दुतावासाने पहिल्याच दिवशी हिला आश्रय द्यायचे आणि भारतात पाठवायचे मान्य केले, का तर नवरा मारतो, छळतो म्हणून, दूतावासाला दुसरे काही काम नसते का ?
१९) एकतर हि ISI मध्ये भरती झाली होती, पण नंतर defect केलं
२०) नाहीतर ही RAW ची एजंट होती, कव्हर ब्लो झाले म्हणून परत आली.