परिकथा

आपलं लग्न व्हावं, लग्नात आपण खूप नटाव .. असं स्वप्न ललिता बन्सीने पाहिलं होतं... पण वयाच्या 20व्या वर्षी  Acid attack झाल्यावर तिची सगळी स्वप्न भंगली...अचानक राहुल कुमार याने चुकून डायल केलेला नंबर आणि तिथून गप्पांना झालेली सुरुवात... आणि ललिताला न पाहता राहुल कुमारने घातलेली लग्नाची मागणी ... सगळी कहाणी स्वप्नवत आहे... विश्वास बसत नाही... पण या दोघांना भेटल्यावर जाणवलं... असंही होऊ शकत...ललितावर acid  हल्ला झालाय... ती इतर मुलींसारखी नाही किंबहुना सुंदर या व्याख्येत पण बसणारी नाही... आणि हे माहीत असताना पण राहुलने लग्न केलं...त्याच्या प्रेमाला सलाम!! ललिताला सजताना,  हसताना पाहून जाणवलं... आयुष्य खरंच सुंदर आहे... अनेक लग्नात महागड्या साड्या, दागिने घातलेल्या नववधू पाहिल्या... पण ललिता सर्वार्थाने आजपर्यंत मी पाहिलेली सगळ्यात सुंदर नववधू आहे.. तिचं हसणं,आनंद सगळं सगळं मनापासून वाटलं... तिच्या सुखाला कोणाची नजर लागू नये.... ज्या राहुलने तिला आहे तसं स्वीकरल... त्याच जरा जास्त कौतुक ...
Arrange marriage च्या बाजारात इतक्या वर्षात आलेले अनुभव आणि नकार आज सगळे एका फटक्यात  आठवले
... आणि हसू आलं..

"पुरुष हा लग्नासाठी मुलगी पाहताना असं पाहतो किंवा Imagine करतो की आपली होणारी बायको बेड मध्ये कशी असेल!" 

God bless Lalita and Rahul Long lasting Love and happiness..

#गोष्टएकासुंदरमुलीची  #परिकथा

साभार (रश्मी पुराणीक)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved