Rima Lagoo
मराठी असूनही हिंदीत भक्कम पाय रोवलेल्या थोड्या लोकांपैकी एक रिमा लागू होत्या... त्यांच्या जाण्यानं ते स्थान रितं झालंय... !
..
देखण्या, चेहऱ्यावरचा प्रचंड आत्मविश्वास यामूळे गर्भश्रीमंत स्त्रीची भूमिका केवळ त्यांच्यासाठीच आहेत की काय असं वाटायचं... हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैने प्यार किया या तीन चित्रपटात त्यांच्या अॅपिअरन्सनी चार चाँद लावले... !
कयामतसे कयामत तक, दिलवाले, प्रेमग्रंथ, जुडवा, आंटी नं १, कुछ कुछ होता है, वास्तव, जिस देस मे गंगा रहता है अश्या शेकडो हिट चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या - जगवल्या ...
.
पडद्यावरचा त्यांचा वावर कधी मिश्कील, समजूतदार तर कधी गंभीर, हळवा असायचा... जितका दमदार अभिनय तितकाच गोड आवाज... त्या सहज बोलायच्या... त्या पात्राशी एकरूप व्हायच्या... गर्भश्रीमंत स्त्रीच्या वागण्यातला आत्मविश्वास, अभिमान जितका सहज साकारायच्या - कनवाळू आई मध्ये पण तितकाच जीव ओतायच्या... मिश्किल, कॉमेडी भूमिकांनाही त्यांनी पुरेपूर न्याय दिला...
...
हिंदीत जम बसला तरी मराठीतही त्यांनी जबरदस्त भूमिका साकारल्या... सिंहासन मधल्या राजकारणी, बिनधास्त मधल्या उद्योजक, आई शप्पथ मध्यल्या मिस देसाई रिमा लागूच !
...
जितक्या करारी अभिनयात होत्या, प्रत्यक्षात तितक्याच प्रेमळ आणि जमिनीवर पाय असलेल्या... मेसेजला आठवणीने रिप्लाय देणाऱ्या, सहज बोलणाऱ्या ...
...
५९ हे जाण्याचं वय नसतं...
रिमा लागूंची अकाली एक्झीट खूप चटका लावणारी ठरली.... !
जास्त ग्लॅमर लाभलं नाही तरीही चित्रपटसृष्टीतलं शक्तीपीठ झालेल्या रिमा लागूंना भावपूर्ण श्रद्धांजली.... !