Strong Fadanvis

काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि फेसबुकवर पोस्ट्स चा अक्षरशः पाऊस पडला! त्यात शुभचिंतकही होते आणि हितशत्रू सुद्धा! आपली नीच मनोवृत्ती दाखवून देणारे काही महाभागही होते यात. अपघात नक्की कसा झाला, जबाबदार कोण वगैरे वगैरे चर्चाही घडल्या.
.
पण या सगळ्यात इतर कुठेही ऐकायला, वाचायला न मिळालेली एक interesting माहिती काल एका वाहिनीवर एव्हीएशन तज्ञ विक्रांत चांदवडकर यांच्याकडून ऐकायला मिळाली.
.
हा अपघात झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टरमधील इतर सर्वजणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्याच्या रिपोर्टनुसार मुख्यमंत्री सोडून इतर पाचही जणांचे bp high झाले होते. फक्त मुख्यमंत्र्यांचे bp त्या परिस्थितीत सुद्धा नॉर्मल होते!
.
अपघातामधून मुख्यमंत्री सुखरूप राहिले ही तर आनंदाची गोष्ट होतीच. पण जेव्हा एखादा अपघात किंवा अशीच एखादी घटना घडते, तेव्हा शारीरिक दुखापत जरी झाली नाही तरी मनाला मात्र धक्का पोहोचत असतो. हा अपघात प्रत्यक्ष बघणाऱ्यांनादेखील निश्चित धक्का बसला असेल. साधा रागाचा पारा जरी चढला तरी रक्तदाब वाढतो. मनावर होणाऱ्या चांगल्या वाईट आघातांचा परिणाम हा रक्तदाबावर होत असतो. इतक्या गंभीर परिस्थितीतही देवन्द्रजी इतके शांत आणि संयमी राहिले होते याचंच हे निदर्शक आहे. कितीही कठोर परिस्थिती असली तरी तिथे balanced राहणं हे खूप कमी जणांना साध्य होतं.
खरोखर अभिमान आणि आनंद वाटतो की महाराष्ट्राला असे खंबीर मुख्यमंत्री लाभले आहेत. देव त्यांना सुदृढ आणि उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना 😊
.
- साभार (नुपुरा भडकमकर Nupura Bhadkamkar यांच्या वॉल वरुन)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved