"संघ संस्कार"

काल संध्याकाळची गोष्ट...
धायरी तथा पुण्यातले सगळे ऑटोवाले सामुहीक कामचुकार आहेत... आणि याचा याची देही अनुभव घेत नऱ्हे रोडवरुन वेताळ चौक मार्गे मुंबईच्या गाड्या उभ्या राहतात त्या विश्वास हॉटेल स्टॉप पर्यंत चालणं सुरु केलं... हातात जड बॅग, आणि निघण्यापूर्वी (ऑटो मिळेल या भ्रमात) डबल पोटभर हादडलेलं... त्यामुळे घामाघूम...!...
...
वेताळ चौकातून पुढे आलो... तोच मागून एक स्विफ्ट कार आली...
त्यात फ्रंट सिट वर दहा बारा वर्षांची एक लहान मुलगी बसलेली, तिचे पप्पा गाडी चालवत होते...
गाडी थांबली...
"दादा, कुठे जायचंय ? लिफ्ट हवी ?"
त्या गोड मुलीनं, तितक्याच गोड आवाजात विचारलं...
- जवळपास १ किमी, जड बॅग उचलून चालण्याचा नभविष्यती वाटणारा अनुभव घेत असतांना, चक्क स्वतःहून लिफ्ट... रेगिस्तानमे झील मिल जाऐ, टाईप वाटून गेलं...
तरीही हावरटासारखं लगेच हो कसं म्हणणार ?...
"नो नो.. इट्स ओके... थँक्स... मी जाईन..."
त्यावर ड्राईव्ह करत असलेले काका... - "अरे, डोन्ट बी फॉर्मल... या, मी सोडतो... ! "
जास्त आढेवेढे घेण्यात अर्थ नाही, हे समजून मी गाडीत जाऊन बसलो...
"थँक यू काका... नवले ब्रिजपाशी सोडलं तरी चालेल !
...
हाय - हॅलो, अल्पपरिचय, व्यवसाय वगैरे बोलून झाल्यानंतर,
"तुम्ही संघात आहात नां ? मी बघीतलंय तुम्हाला... !
त्या काकांनी जिव्हाळ्याच्या मुद्यावर बोट ठेवलं,
संघाचं कुणीही एकमेकांना आपलं वाटतं... !
आमच्यातली औपचारीकता संपली...
..
ते काका मूळचे सोलापूरचे, पुण्यात छोटे छोटे व्यवसाय करत जम बसवलेला !
"सोलापूरात पण रिक्षांचे वगैरे असेच हाल होतात... मी अनेकदा या अनुभवातून गेलोय... त्यामूळे एक दोनदा न संकोचता लिफ्ट मागितली... गेल्या महिन्यात ही गाडी घेतली तेव्हाच ठरवलं, लिफ्ट करता कुणालाही नाही म्हणायचं नाही...  तुम्ही घामाघूम, हातात बॅग दिसली, चेहरा ओळखीचा वाटला... म्हणून थांबवली गाडी... ! त्यानिमित्ताने ओळख झाली आपली..." - काका
तोपर्यंत मला जिथे उतरायचं ते ठिकाण आलं...
नवले ब्रिज मागे सुटून, विश्वास हॉटेलचा स्टॉप... !
...
"थँक यू सो मच काका... छान वाटलं भेटून... आणि तुमच्याकडून नवीन गोष्ट शिकायला मिळाली.. खूप छान विचार आहेत तुमचे... आणि भेटूयात पुन्हा... थँक यू सो मच फॉर द लिफ्ट..." - मी
- " नक्कीच भेटूया.. ! आणि बेटा, हे संघाचे संस्कार... एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ..."
खळाळणाऱ्या हास्यासह एकमेकांचे कार्ड घेवून, काही मिनिटांचा छानसा प्रवास संपला...
...
त्या काकांची सकाळीच फेबूला रिक्वेस्ट आलीय...
...
संघच ! गुरुस्थानी असलेला भगवा ध्वज नकळतपण खूप काही शिकवतो... आणि अडचणीत कुणाच्या ना कुणाच्या रुपाने मदतीसाठी येतोच...! कारण, ...
"संघभावना मनात रुजता - समरसता ही सहज दिसे..."
- तेजस कुळकर्णी (दि. ४ डिसेंबर २०१६)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved