=कार्यकर्ता, फॅन, समर्थक वगैरे=


आत्ता एका कॉलेजमेट मित्राचा फोन आला...
चार वर्षांनंतर
"तेजा, कुठेस ? एक मदत हवीय... महत्वाचं बोलायचंय..."
- हा मित्र नेतेगिरीची कम पुढारकीची - कम पेप्रात "यांनी परीश्रम घेतले मध्ये नांव" कम दादा तुम्हीच वाली खाज प्रचंड असलेला...
त्यामुळे येऊ घातलेल्या एका सोहळ्यासाठी देणगी मागणे असा भयंकर कार्यक्रम असावा असं समजून ऑफीसमध्ये नको, एखाद्या रेस्ट्रांत भेटू असा दुहेरी कार्यक्रम ठरला...
मला भूक लागलेली हे (च) या मागचं पहिलं कारण...
- भेट झाली
आधी पोटोबा... मँगो केक, समोसा, डोसा असं पोटभर चोपलं... आणि स्लाईस पिता पिता...
"बोल... काय म्हणतोस ?"
देणगी वगैरे मागणार असेल तर टाळण्याचं कारण शोधत असतांनाच मित्रानं चारचौघात सायलेंट भोकाड पसरलं..
हातातली बॉटल तशीच ठेवावी लागली...
अरे अरे गप... नीट सांग काय झालं...
- जॉब नाहीय, चणचण आहे खूप... तू काही मदत करु शकतोय ?
- कां ? बीई पूर्ण केलंस की नाही ?
- नाही झालं...
ते कां नाही झालं याचं कारण ऐकून त्याची किव, राग, अर्रर वगैरे मिक्स फिलींग आल्या...
"आत्मघातकी माणसा... आधी सांगत होतो तर धमकी दिलीस, भला हो उस वक्त का... - तेव्हा तुला त्या पोरांसमोर कानफाटात ठेवली म्हणून वाचलो...."
तुझं हे होणारच होतं...
.
असं काय झालं... ?
तो मित्र शाळेत असल्यापासून प्रचंड समाजवादी... राजकारणावर, जातीवादावर बोलायचा... इथपर्यंत ठीक... पुढे त्याला नेतेगिरीची, गृपीझ्मची खाज सुटली... बारावी झाली - बीईला येईपर्यंत खाजेचं खरूज झालं... पूर्णवेळ सामाजिक कार्यासाठी द्यायचं ठरवलं... एव्हाना पक्षाचा शाखाप्रमुख, एखाद्या संस्थेचा विभागप्रमुख वगैरे व्हायचं स्वप्न पडू लागलं... इंजिनिअरींगच्या अभ्यासापेक्षा सामाजिक, राजकीय विषय बोलणं सुरु झालं... त्याच दरम्यान सामाजिक नावाखाली धांगडधिगा करणाऱ्या, शोऑफ, करीयर सोडून रिकामे उपद्वयाप करण्याऱ्या एका समवयस्कांच्या गृपला तो जोडला गेला... प्रभावित वेग्रे झाला...
दादाने सांगितलं एक हात वर करून नाचा - तर नाचा...
भै ने सांगितलं नागिन करून नाचा... नाचा...
भै चालतो पुढे - मेंढरं गोंडा घोळे... टाईप...
एव्हाना त्याचं बीईतून लक्ष उडालं...
मी आणि इतर मित्रांनी अनेकदा सांगितलं, तुमच्या जीवावर तो भै/दादा स्वतःची लाल करतोय... त्याच्या सतरंज्या उचलत स्वतःची हज करू नको वगैरे... पण गाढवापूढे वाचलं गेलं...
एव्हाना आमची बॅच बाहेर पडून सेट झाली.
हा मित्र एन एफ टी...
भै ने स्वतःसोबत इतरांच्याही करीयरची घाण केली... ते ३०-४० पोरं भै च्या मागे वेड्यासारखे पळतात. इव्हन त्यांच्या आयुष्यातले खाजगी निर्णय पण त्याला विचारुन घेतात... एक माणूस त्याच्या फायद्यासाठी आपल्याला वापरतोय याचा विचारही न करता...
भै मंचावर, पोरं सतरंज्या उचलताय, भैला डबलसीट फिरवताय... त्याच्यासाठी जेलमध्ये जाताय...
या गोंडा घोळण्यात त्या मित्राचं शिक्षण सुटलं,
भै च्या मागे फिरता नोकरी नाही...
घरुन लाथ बसली...
सामाजिक कार्याचे पैसे बनत नसतात...
तरी पण भै भक्ती अजूनही अफाट आहे...
.
मी काय करु शकतो रे ? प्रयत्न करेन नक्की तुझ्यासाठी... पण तुला अक्कल नव्हती तेव्हा... बीई तर पूर्ण करायचं मुर्ख माणसा...
अजून गाढवापुढे वाचण्यात अर्थ नाही सो मी
निघालो...
Bdw, चोपलेल्या च्यावम्याव चे पैसे मलाच द्यावे लागले
.
सामाजिक कार्य, गोंडा घोळणं, कार्यकर्ता असणं, भक्ती करणं एका लिमिट पर्यंत ठीक
इतर लोकांसाठी स्वतःच्या आयुष्याचे बारा वाजवायचे नाही...
स्वाभीमान तर विकायचा नाहीच नाही...
कुणाच्याही मागे कार्यकर्ता व्हाल तर कार्यकर्ता म्हणूनच मराल...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved