Mseb

आत्ताच, (वाचा आणि शिका)
शेजारच्या प्लॉटवर आज स्लॅबचं काम सुरूय. तर पुढे आलेल्या पोर्चवर मशीन लावण्यासाठी त्यांना मेन डिपी वरुन गेलेली आमची सर्विस वायर नडत होती... कुलकर्णी आपकी ये वायर निकाले क्या ?
(एमएसइबीला आम्ही अवघे चौदाशे मोजून रितसर काम केलेलं... सो काढायचा प्रश्नच नाही)
- क्यो भाई ? प्रॉब्लेम क्या है ? नही निकालना...
और निकालना है तो वैसा ऐफिडेविट स्टॅम्प पे लिख के दो...
हम पूरा को - ऑपरेट करेंगे...
.
काम थांबलं... तसं एक एक पैतरे वापरणं त्यांनी सुरू केलं... साम - दाम वापरलं... पूर्वानुभवावरून दंड वापरणं शक्य नव्हतं (कारण भेद मी वापरतो.. मग जास्त दुखतं)...
फायनली त्यांनी एक वेगळा बॉल टाकला..
.
एक फुटकळ वायरमन बोलावला... खाकी चड्डीत.
(त्याला एमएसइबी वाला बनवून आणला)
तो आणि मी यांच्यात झालेली एक अख्खी ओव्हर.
तो आला, एकदम तोऱ्यात... फुल्ल सरकारी फॉर्मात...
पायातली चप्पल तशीच ठेवून हॉलमध्ये शिरला... च्यामारी..
"ओ.. हॅलो... ती चप्पल गेटबाहेर काढून या... चप्पल घालून घरात नाय यायचं..."
पहिला बॉल बाऊंड्री के पार...
मग फटक्यातच वर आला...
तो - "हे असं चुकीचं लावलंय... तुम्हाला हे काढावं लागेल" असं बोलत त्याची ती वायर काढायची तयारी होती... पून्हा च्यामारी
.
एक दोनदा शांततेत सांगितलं...
नाही ऐकलं...
तो : "कायद्याने हे काढावंच लागेल.."
.
मोठ्ठा च्यामारी...
कायदा बोलतोय... आला हातात गोट्या...
"ओय उतर खाली... काय बोल्ला तू ?"
- कायद्याने...
मी - तू मला कायदा शिकवतोय ? एम एस ई बी त आहेस ? नांव बोल...
तो - नांव कशासाठी ?
मी - आय कार्ड दाखवा... वॉरंट दाखवा..
तो अति गोंधळला.. त त फ फ...
.
"आय कार्ड नाहीय... घरीय..."
माझा आवाज वाढला -
मग ? काय पुरावा तुम्ही एम एस ई बी चे आहात...? नांव सांगा... लगेच !
"x नांव आहे..."
.
मी लगेच एम एस इ बी ऑफीसला फोन लावला... चौकशी केली
अपेक्षेप्रमाणे त्यांनी या गोष्टीला नकार दिला.
x या नावाचा कुणीच नाहीय तिथे...
.
ओके...
कॉल द police ... तु लटकलाय आता...
बास... वर्मावर घाव... दिड फूट लागली...
... मग घालीन लोटांगण... वंदीन चरणम्...
.
निघ इथून... निघ...
शांततामय अपमान करून तो तोतया हाकलला...
.
ज्याने त्याला डुप्लिकेट एमएसइबी बनवून पाठवला त्याचं काम बंद पाडलंय...
आता तो येवून बसलाय...
घालीन लोटांगण... वंदीन चरणम्... करायला...
.
रितसर नाही काम करता येत xत्यांना...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved