Mi Marathi

"हलो इजीट मि. कुलकर्नी?"
"येस, स्पिकींग. मे आय नो युवर नेम प्लिज्?"(अमराठी जनतेकरता खास वेगळा आवाज).
"सर धिसीज रिचा जोगलेकर फ्राॅम #$% कंपनी?
"जोगळेकर?"
"या सर"
मग पुढे व्यावसायिक चर्चा सुरू झाली... मी त्या कंपनीशी बरेचदा संबंधीत असल्याने नवखे काही नव्हते. नवखे होते तिचे ते तिचे आपले नाव 'जोगलेकर' सांगणे..
माझा मराठी बाणा जरासा उभरता झाला. चित्पावनी युवतीला 'ळ' ऐवजी 'ल' म्हणायला लागावं? काय दिवस पाहावा लागतोय? हेदवीचे जोगळेकर त्यांच्या हयातभर 'ळ' म्हणायला ठणकावून गेले असतील. त्यांच्या घरी हे असले डेव्हीएशन?
चर्चा संपली.. मी माहिती हळूहळू काढू म्हटलं..
"मिस् जोगळेकर व्हेयर आर यू फ्राॅम?"
"सर बेसिकली आयाम फ्राॅम ग्वालियार बट स्टडिड इन् डेली."
(गोविंदपंत बुंदेल्यांनंतर इतके दूरचे बहुतेक ह्यांचेच मराठी  कुटुंब.बाकी इंग्रजीत दिल्ली चे स्पेलिंग देहली असेच ना? डेली काय किस्सा आहे? )
"सो यू कुड नाॅट लर्न मराठी?" (डायरेक वर्मावर बोट)
"माला मराठी येत कुलकर्नी सर बट आयम नाॅट दॅट प्रोफिशियंट यट्. आय एम लर्निंग"
"बट युवर व्होल फॅमिली बिईंग जोगळेकर, इट शूडण्ट हॅव बिन ए प्राॅब्लम"
हे म्हटल्यावर ती क्षणभर थांबली..
"आय अण्डरस्टूड व्हाॅट यू हॅव अझ्यूमड् सर..बाय बर्थ आय एम नाॅट जोगलेकर, आय एम मॅरिड टू जोगलेकर!"
ओहो.. असा किस्सा होता तर... मला वाटलं ब्राह्मण समाजाच्याच पोरींनी बाहेर वाट पाडली आहे. त्या दुथडी भरल्या ओढ्याच्या समोर कोणा जोगळेकरांनी मांडलेला उलट्या दिशेचा ओघळ मला क्षणभर मोठा वाटला.
"सो व्हाॅट यूवर हसबण्ड डज्?"
"ही वर्कस् फाॅर राॅयल बँक आॅफ स्काॅटलँड. ए व्हेरी नेक्सट बिल्डिंग टू मी."
समाधानानी मी फोन ठेवला. आणि परत कामावर लागलो..
___

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved