UPSC

अन्सार शेख नावाच्या कोणी व्यक्तीने म्हणे "शुभम" नावाने भाड्याने जागा घेतली होती. आता, UPSC परीक्षेत यशस्वी झाल्यावर, त्याने आपले खरे नाव जाहीर केलेय.
.
अन्सार शेखने आपले खरे नाव लपवले नसते, तर काय झाले असते ? त्याला जागा मिळायला थोडा त्रास झाला असता , त्याला मुस्लीम बहुल वस्तीत जागा बघायला लागली असती, जी कदाचित त्याच्या दृष्टीने थोडी गैरसोयीची झाली असती , कदाचित त्याला नाईलाजाने एखाद्या लॉजवर राहावे लागले असते, ?? ह्यातली कुठलीही गोष्ट , ज्याला "आकाश कोसळणे" म्हणतात, तशी नव्हती ?
.
मुळात ज्याला UPSC परीक्षांची तयारी करायचीय, तो माणूस, बहुधा दिवसाचा बराचसा वेळ, दहा बारा तास सुद्धा, एखाद्या Library तच घालवतो, घालवावा लागतो. त्यामुळे मुळात हा "जागेचा प्रश्न" ओढूनताणून मोठा केल्यासारखा वाटतो.
.
खरा प्रश्न हा आहे, कि जी व्यक्ती, थोडीशी गैरसोय टाळण्यासाठी चक्क खोटे नाव लावणे, (तोतयेगिरी, Impersonation) ह्या "पर्याया"चा जाणीवपूर्वक, स्वेच्छेने स्वीकार करते, ती एक सनदी अधिकारी म्हणून काम करण्यास कितपत योग्य ??
.
इथे त्याच्या मुस्लीम असण्याचा काहीही संबंध नाही. त्याच्या "प्रामाणिक" असण्याचा संबंध आहे. आणि ज्याला सनदी अधिकारी म्हणून काम करायचेय, तो प्रामाणिक तरी हवा ना ?? ह्या घटनेत, < समाज म्हणून आपण कुठे कमी पडतो >, हे बघण्याआधी, व्यक्ती म्हणून अन्सार शेख, Irrespective of his religion, कुठे कमी पडला, हे बघणे तितकेच महत्त्वाचे आहे. ह्याकडे केवळ त्या व्यक्तीच्या मुस्लीम असण्याने अजिबात फरक पडता कामा नये. सनदी अधिकारी कोणत्याही परिस्थितीत १००% प्रामाणिक राहतील, असेच हवेत.
.
अन्सार शेखने जे केलेय, तो "तोतयेगिरी, Impersonation" चा फौजदारीगुन्हा आहे. UPSC परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर, सेवेत रुजू होण्यापूर्वी, अर्थात Police Verification वगैरे सोपस्कार असतातच. संबंधित घरमालकाने ही सर्वमाहिती, कागदोपत्री पुराव्यासहित, ताबडतोब UPSC कडे Regd.AD ने पाठवून द्यावी. एक जागरूक, कायदेपाळू नागरिक म्हणून ते त्यांचे कर्तव्य आहे. असे केल्याने, कदाचित आपण थोड्याश्या गैरसोयीसाठी खुशाल गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या इसमाला सनदीसेवेत येण्यापासून रोखू शकू.
.
आणि हो,
इथे संबंधित व्यक्ती मुस्लीम असण्याचा काडीमात्र संबंध नाही.
- Copied from : Shrikant Patwardhan kaka

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved