Madhuri Dixit : Pahla Pahla Pyar Hain

माधुरी दिक्षीत आजही त्यांच्या करोडो समवयस्कांचं पहला पहला प्यार आहेत. आणि याची सुरुवात हम आपके है कौन नंतरच झाली असावी... कारण आजही हम आपके मधल्या "पहला पहला प्यार है" गाण्यातल्या त्यांच्या अदा बघून भले भले घायाळ होतात, त्यांच्या टिव्हीवरच्या त्या नजरेलाही नजर भिडवू शकत नाहीत. uuimaaa सोबत... त्या पूर्ण सेगमेँटमधला त्यांचा अॅपिअरन्स लाजबाब आहे.
.
दिग्दर्शक सूरज बडजात्याने तो सेगमेँट जीव ओतून अप्रतीम घडवलाय. निशा आणि प्रेमच्या प्रेमाची गोड सुरुवात होते. मूकेपणे मंद प्रकाशात दोघांच्या स्पर्शाने, नजरेने ते प्रेम फुलत जातं. त्यातला त्यांचा साधा आणि लाईट मेकअप, कर्ल हेअर्स, बोलके डोळे, साजेसं कॉस्ट्यूम आणि घायाळ करणाऱ्‍या नजरा सौँदर्याला चार चाँद लावतात. अप्रतिम सौँदर्य, अवखळ तारुण्य आणि
बॅकग्राऊंडला बालसुब्रमण्यमच्या आवाजातला अंतरा
"उसकी नजर, पलको कि चिलमनसे मुझे देखती...."
- माधुरी दिक्षीत याच क्षणी सुपरस्टार होते, आणि तिच्यावर करोडो जीव कुर्बान होतात...
.
आमच्या आधीची एक अख्खी पिढी खुलवणाऱ्‍या, त्यांचं पहिलं प्रेम असणाऱ्‍या, लाखोँच्या मनात राहणाऱ्‍या या अभिनेत्रीच्या आयुष्याचा सुवर्णमहोत्सव (५०) आज सुरु झाला.
.
:)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved