Posts

Showing posts from March, 2017

Financial Year

Image
२०१७- २०१८ या नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा ! नवे वर्ष नवी उलाढाल... ! हे नवे वर्ष आर्थिक उत्साह आणि उत्कर्षाचे जावो... निफ्टी 9500 Cross करो, GDP वाढ 8.5%+ जावो, बँकेचा इंटरेस्ट बऱ्यापैकी मिळो... व्यवहार सूरळीत, कागदी घोडे न नाचवता, डोकं न फोडता सहज होवो... तुमच्या इन्वेस्टमेंटचे उत्तमोत्तम रिटर्न मिळो... ! .. या Capitalist अर्थप्रजासत्ताकाच्या सर्व सहभागी घटकांना (म्हणजेच Businessmen, Researchers, Technicians, Employees, Worksmen, Agents, Bankers, Service Providers, Regulators, Taxmen, Professionals, Investors)  हे नवे अर्थसंवत्सर Prosperous आणि Value-Enriching व्हावे ही सदिच्छा... .. मुख्य म्हणजे, जीएसटी व्यवस्थित लागू व्हावा  - कॅशलेसवर भर द्यावा - म्यूचूअल फंडस् बद्दल अक्कल यावी.. पैसा मोठा व्हावा...! .. आणि वर्षभराचं टारगेट व्यवस्थित पूर्ण व्हावं... ... :-) :-)

Court

परफेक्ट! हे चोचले बंदच व्हायला पाहिजेत --- कॉपी पेस्ट डॉ सचिन लांडगे टा लाईन *कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी का असते कोणी सांगेल का..?* इंग्रजांच्या काळात बहुतांश जज हे इंग्लिश असत.. थंड प्रदेशातल्या इंग्रजांना आपल्या भारतातला उन्हाळा अगदी असहाय्य होत असे.. (तेंव्हा AC नव्हते).. म्हणून त्यांच्या कार्यालयीन सुट्ट्या उन्हाळ्यात असत.. (तसं युरोपात शाळा कॉलेजेसना वार्षिक सुट्ट्या नाताळात असतात.) इंग्रज गेले.. त्याबरोबर इतर सगळ्या कार्यालयांच्या कार्यालयीन सुट्ट्या बंद झाल्या.. पण कोर्टाच्या सुट्ट्या का चालू आहेत त्यामागचं लॉजिक काही कळत नाही..!! कोणत्या प्रोफेशनला अशी महिना, दोन महिन्यांची सुट्ट्यांची खैरात आहे..? महाराष्ट्रात सरकारी रुग्णालयात जेवढे पेशन्ट एका वेळी ऍडमिट असतात त्यांच्या कितीतरी पटीने कोर्टात केसेस पेंडिंग आहेत.. लोकांच्या आशा लागल्यात त्या निर्णयांवर.. कोणाच्या आयुष्याचा प्रश्न अवलंबून आहे कोर्टाच्या निकालावर.. कोणी सुनावणी अभावी जेलमध्ये सडत आहे..  *जनता त्रस्त असताना, लाखो केसेस पेंडिंग ठेवून, टॅक्स पेयरच्या पैशांवर, दिर्घ भरपगारी रजा कोर्टांना कोणत्या आधा...

Jio vs Other

Image
जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोननं सेम प्लान आणलाय ३४८ रुपयांत, तर बीएसएनएलनं ३५८ रुपयांत... आयडीया पण ३५० च्या आसपास वोडाफोन आयडीयाचा स्पीड, नेटवर्क वगैरे तगडं आहे... शिवाय वोडाफोन प्ले पण जीओ सारखंच ! ... मुकेशभाय जी भर के जीयो... नॉन जीओ वाल्यांना भरभरके मिळालंय...  ... फक्त वोडाफोन, आयडीया, बीएसएनएलनी त्या प्लान्सना कंटीन्यू करावं...  आज एक उद्या एक करतात -  तोंडावर आपटवतात... .. जीयो ग्राहकाभिमूख आहे.. कस्टमर केअरवाले मोजून १० व्या सेकंदाला फोन उचलतात... आणि वर्षानूवर्षांचं मैत्र असल्यासारखं सगळं समजवतात... प्रेमानं आणि अभ्यास करून.... शिवाय, केव्हाही रिचार्ज करा, ते १ एप्रिल पासूनच लागू शकतील...! भारीय हे... ... माझे विद् जीओ दोन मोबाईलमध्ये तीन नंबर्स आहेत, चालू असतात, त्यांना पोसतो... त्यात एक वोडा, एक बीएसएनएल आणि टेलीनॉर... टेलीनॉर अडगळीत जाण्याच्या लायकीचं आहे, पण एकेकाळी उसीने सहारा दिया ... कृतज्ञता म्हणून ठेवलंय. रिचार्ज वगैरे करणार नाही. ..

हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... !

Image
"गुढी" पेक्षा "ब्रह्मध्वज" हा शब्द मला खूप आवडतो... काठी, महावस्त्र, त्यावर कळस, लिंबाचे पानं, साखरेचा हार आणि तो ध्वज घरावर दिमाखात उभारुन नव्या वर्षाचं, सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यांचं दिमाखात स्वागत करायचं... या दिवशी अभिमान, नाविन्य, पावित्र्य वगैरे भरभरुन वाहतं... ... ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ! प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !! । । ब्रह्मध्वजाय नम:।। ब्रह्मध्वजाच्या प्रार्थनेने आपल्या घरात मांगल्य येण्याची प्रार्थना करायची.. ... अभिमान बाळगावा असा हा दिवस... ... हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... ! आनंदात रहा ! ... आमच्या घरची गुढी !

Indian Corporate Industry and Lacks

तर एकुणात आजकाल इंडस्ट्री, स्टार्ट अप यांच्याबद्दल खूप बोलबाला चालू आहे. इंडस्ट्रीच्या लोकांना रेड टेपिझम मधून मुक्तता मिळून रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते आहे असा एकुणात सूर आहे. मला स्वतः ला असं काही वाटत नाही आहे. जिथे पैसे लागतात तिथे आजही लागतात. जिथे वेळ लागायचा तिथे आजही वेळ लागतोच. आमची एक शिपमेंट चायना तुन आली. त्या कंपनीचं हेड ऑफिस यु के त आहे. त्या शिपमेंट चं इन्व्हॉईस यूकेतून बनलं. पेमेंट देताना बँकेने सांगितलं, हे चालणार नाही. शिपमेंट जिथून आली तिथूनच इन्व्हॉईस व्हायला पाहिजे. बरं मग पेमेंट करताच येणार नाही का? तसंही नाही. काही कागदी घोडे नाचवले. महिनाभर टाइम पास केला, अन पेमेंट दिलं. इंडियन कस्टम्स. आमची कंपनी सेटको झाली. त्यामुळे आम्ही जगभरातल्या सेटको साठी सिस्टर कंपनी झालो. सेटको च्या दुसऱ्या देशातल्या प्लांट मधून इंपोर्ट होणाऱ्या गोष्टी क्लीअर करायला ही मंडळी आम्हाला जी नाचवत आहेत, त्याने झीट पडायला आली आहे. सहा महिने झालेत, कस्टम्स मध्ये मटेरियल पडून आहे. कस्टमर ठणाणा मारतोय आमच्या नावाने. पण ही लोकं, त्यांना ना खेद ना खंत. ढिम्म हलत नाहीत. ५% ड्युटी झाली आहे, त...

Doctors

मुद्दा एक : जर कामाची भिती वाटत असेल तर नोकऱ्या सोडा - कोर्ट टू डॉक्टर्स... इथे डॉक्टर्स जर जीवाची सुरक्षा मागत असतील तर चूकीचं काय ? आणि नोकऱ्या सोडून वडापाव तळत बसणार कां ? .... रामजन्मभूमीचा मुद्दा आपापसात मिटवा... - कोर्ट टू हिंदू सगळे पुरावे हिंदू महासभेच्या बाजूने आहेत, २५ वर्ष लढा सुरुय.. तरीही फक्त जनभावनेचा आदर. मग हिच जनभावना, ३० जाने १९४८ नंतर कां विचारात घेतली गेली नाही..? ... जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाते तेव्हाच लोकं कोर्टात जातात. आणि पंचवीस वर्ष गोल गोल फिरून हाती धोपटणं दिल्यासारखा निर्णय दिला जातो... कधीकधी मागुनही न्याय मिळत नाही, कधी न मागताची फुकटात पोक केलं जातं... ... मुद्दा दोन : डॉक्टर्सना पॉवर द्यायला हवी, जर लोकं हल्ला करत असतील तर दोन चार बाऊंसर्स ठेवायचे, आणि हल्ला करणाऱ्यांना ठिकाणीच धुवायचं, नंतर ट्रिटमेंट द्यायची नाही... शंभरात दोन तीन डॉक्टर्स लुच्चे असतात, नो डाऊट... त्यांची मापं काढायलाच हवी... प्रत्येकच क्षेत्रात असे नग असतातच.. पण इतरांचं काय ? ...

Yogi Aditynath

Image
योगी आदित्त्यनाथ उ.प्र.चे मुख्यमंत्री झाले ! भारताचे हिंदुराष्ट्रपणाबाबत आता कुणाचे मनात काही शंका राहू नयेत. फार स्पष्ट संदेश आहे हा ! आता शपथसोहळा वगैरे औपचारिकता तेवढ्या पार पडायच्या आहेत. योगी आदित्त्यनाथ हे जहाल हिंदुत्त्ववादी समजले जातात. यांची तुलना ब्रह्मदेशातील ( मिन्यामार) इस्लामविरोधी जहाल बौद्ध महंत विरथु यांचेशी होऊ शकेल, या विरथुंनी ब्रह्मदेशातील मुस्लीमांविरोधात शस्त्र उचलले होते. जगात बौद्ध तत्त्वज्ञान शांततेचे म्हणून ओळखले जाते. परंतु, ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंनीच तिथल्या मुसलमानांविरोधात शस्त्र हाती घेतले होते. आदित्त्यनाथांची तशी ख्याती नाही. परंतु, जहाल वक्तव्यांची आहे. पूर्व उ.प्र. मध्ये त्यांचे नावाचा महाराष्ट्रातील शिवसेनाप्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांचेप्रोा दरारा आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेने भाजपबरोबरचे सगळे वैर बाजूला ठेवून योगी आदित्त्यनाथांचे निवडीचे उत्स्फूर्त मनपूर्वक स्वागत केलेले आहे. उ.प्र.तील सगळ्या हिंदू-मुस्लीम दंगली या पश्चिम भागात झालेल्या आहेत. जिकडे मायावती आणि यादवांचा प्रभाव होता ! (आता सगळा उ.प्र. भाजपचा आहे). आदित्त्यनाथांचे पूर्व उ.प्र.त...

Sena vs Fadanvis

ठाकरेसेना एखाद्या नागासारखी आहे. जरा धोका वाटला की फुस्स करीत नागासारखा फणा काढीत उभी रहाते. पण देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री एखाद्या कुशल गारुड्यासारखे आहेत. कुठली तरी पुंगी वाजवीत ते या नागापुढे ती गोलगोल, उलट सुलट फिरवीत रहातात. मग नाग बावचळून जातो. कुठून कसा हल्ला त्या पुंगीवर करावा तेच त्याला कळेनासे होते. आणि त्या भानगडीत देवेंद्रजी त्या नागाला सत्तेचे टोपलीत केव्हां बंद करतात, ते त्याला कळतही नाही. गंमत अशी की लोकांपुढे खेळ करायचा असेल तेव्हां या नागाला ते पुन्हा बाहेर काढतात.

कांबळेंचं वक्तव्य, माझं मत

Image
कांबळे जे बोलले त्यात ब्राह्मणांना दुखावण्याचा हेतू होता - नव्हता, काय बोलले, काय अर्थाने बोलले, दिलगीरी व्यक्त केली, माफी मागायला हवी वगैरे मुद्दे चर्चचा विषय ठरताय.. पण कांबळेंनी कळत/नकळत जी आग लावली त्यामुळे उठलेले धुराचे लोट मात्र बरेच बदल दाखवून गेले... . एका दृष्टीने जे झालं ते चांगलं झालं... .. (१) यामुळे कधी नव्हे ते सगळे ब्राह्मण (एरव्ही दहा डोकी दहा मतं असणारे) एकत्र आहेत. एका मतावर ठाम आहेत... आणि अगदी सामान्य ते विचारवंत माणूस यावर एकमताने व्यक्त झालाय. संघटन दिसतंय... (२) मिडीया या आधी केव्हा बाह्मणांच्या बाजूने उभी राहीलेली ? यावेळी अनपेक्षित झालं. त्यांचं वक्तव्य आधी मिडीयानंच लावून धरलं. सकाळ सारखं वृत्तपत्र यावर ब्राह्मणांच्या बाजूने व्यक्त झालं. एबीपी, महाराष्ट्र, झी, आयबीएन या वाहिन्यांनी सुद्धा तटस्थपणे भूमिका मांडली... ब्राह्मणांच्या बाजूने ! (३) कांबळे सामाजिक न्यायमंत्री आहेत, आणि त्यांनी एखाद्या जातीवरुन वक्तव्य करणं हे चूकीचं आहे - हे उद्गार घङ्याळवाल्याने काढले... काढावेच लागले... (४) माफी / दिलगीरी - कांबळेंनी दिलगिरी व्यक्त केली... "ब्राह...

स्त्रीदिन

Image
(फेसबुक वरील महिला दिनाच्या पोस्ट ला आलेल्या अभिप्रायांवर दिलेलं उत्तर) .... फेसबूकवर, इतरत्र पण अनेक स्त्रिया अश्या आहेत, ज्या केवळ आधुनिकता, समानता वगैरे म्हणत उघडपणे विवाहसंस्थेला, कुटूंबसंस्थेला डावलतात... .... अगदी स्पष्टपणे सांगायचं तर  ( विश्वास बसणार नाही किंवा हे जरा भडक होईल, पण सत्य आहे.) जरी लग्न झालंय तरी विवाहबाह्य संबंध ठेवायचं स्वातंत्र्य मिळायला हवं, कुणाबरोबर शारीरीक संबंध ठेवायचे हे ठरवू - मग नवऱ्यालाही जुमानणार नाही... मुलं बाळं झाली, पण करीयर करता त्यांना वाऱ्यावर सोडून इतरत्र राहणारेही आहेत... पुरुषांचा पावलोपावली तिरस्कार करणारेही आहेत... एक स्त्री तिच्या विवाहबाह्य (शारीरीक) संबंधांवर उघडपणे बोलते, ... ते कसे योग्य ते पटवते... माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, त्याने मला पुर्ण स्वातंत्र्य दिलंय, पण फॉर अ चेंज मी ट्राय करते.... जर असं असेल तर मग लग्न का केलं ? जर अपत्य झाली तर या पारंपारीक आधुनिक लढाईत त्या बाळांची फरफट कां ? ... जर पटत नसेल तर एकटे राहून हवं तसं जगा... दोन्हीकडे पाय ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी ? .... विवाहसंस्था ...

Expectation

आपल्याला काय हवंय ? . ते कसं मिळेल ? आणि ते देण्यासाठी समोरच्या व्यक्तीनं काय करायला हवं हे नेहमी १०० टक्के तयार असावं... ! ... व्यवसायात, नात्यात आणि व्यवहारात मी माझ्या अपेक्षा स्पष्ट समोर ठेवतो, ज्या माझ्यादृष्टीने परफेक्ट असतात, ज्यांना माझ्या मर्यादेचं कोंदण असतं, ज्याच्या दोन्ही बाजूंचे सकारात्मक नकारात्मक परीणाम माझ्या डोळ्यासमोर असतात... ... त्यात तडजोड नाही, ते तसं म्हणजे तसंच हवं असतं... "तुला जमणारे कां ? हो तर हो बोल, नाही तर नाही... त्या नाही पुर्ण झाल्या तर मी ती गोष्ट त्याच ठिकाणी थांबवतो.. ! विषय संपला... ! .. या हट्टी स्वभावामूळे भलेही जीवन नौका भरकटत आहे, पण गाळात रुतून फसली नाही की दगडावर आपटून फुटली नाही... .. जे मिळतं ते १०० टक्के मला हवं तसं, परफेक्ट... समाधान... पुर्ण ... ! बाकी काय हवं... ! ... " तेजा... यू आर disgusting.. " या प्रेमपूर्ण कॉम्प्लीमेंटवर माझं प्रेमपूर्ण विश्लेषण.. !

Mumbai Local Train Announcer

*पुढील स्टेशन…’ लोकलमधला हा आवाज कुणाचा, माहिती आहे?      आराधना तुंगारे यांचा* मुंबई :- लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रत्येक स्थानका अगोदर तीन भाषांमध्ये पुढील स्थानक कोणतं आहे हे सांगण्यासाठी उद्घोषणा होत असते. हा आवाज कोणाचा असेल असा अनेकांना प्रश्न पडतो, ही उद्घोषणा सुरू करण्यात आली होती तेव्हा ती ‘लाईव्ह’ ऐकवली जात आहे की रेकॉर्ड करून असाही प्रश्न अनेकांना पडला होता. ज्या घोषणेकडे सगळ्यांचे कान लागलेले असतात त्यामागचा आवाज आम्ही शोधून काढला आहे. हा सुंदर आवाज आहे एका मराठी उद्घोषिकेचा, जिचं नाव आहे आराधना तुंगारे. गेली अनेक वर्ष विविध माहितीपटांना आवाज देणाऱ्या आराधना यांच्यासाठी रेल्वे उद्घोषणेसाठीची ही ‘असाईनमेंट’ सगळ्यांपेक्षा वेगळी होती आणि विशेष म्हणजे ती त्यांच्याकडे स्वत:हून चालत आली. यामागची कहाणी देखील रंजक आहे. साधारणपणे सहा वर्षांपूर्वी त्या फेमस स्टुडियो, महालक्ष्मी जवळच्या विजय साऊंड स्टुडियोमध्ये एका माहितीपटाला आवाज देण्यासाठी आराधना रेकॉर्डिंग करत होत्या. त्यावेळी तिथे रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी ...

Womens Day

Image
स्त्री म्हणून स्वातंत्र्य मिळणं हा तुमचा हक्क आहे, पण ते स्वातंत्र्य स्वैराचार ठरायला नको हे तुमचं कर्तव्य आहे... ज्या स्त्री ने स्वैराचारी न होता स्वातंत्र्य जपलं तीच स्त्री आदर्श ठरलीय...! ... कारण "स्त्री" त्व बहाल करतांना निसर्गाने मातृत्वाचं, संयमाचंही माप तुमच्या झोळीत टाकलंय... . स्त्री पत्नी म्हणून प्रामाणिक आणि मातृ रुपात समर्पित असेल तर आणि तरच ती सर्वकाळ पूजनीय ठरते, मग ती राष्ट्रपती असो वा गृहीणी...! ... केवळ वर्षानुवर्ष ठरलेले मापदंड बंडखोरी करुन मोडणारेही अनेक आहेत, मग पुरुषी राहणीमान असो, पुरुषांविषयी तिरस्कार असो.. किंवा एक किंवा अनेक आम्हीच ठरवू म्हणणाऱ्या, उघडपणे माप झिडकारणाऱ्या अत्याधुनिक विचाराच्या स्त्रिया असो... "स्त्री"त्वाचं माप झिडकारुन भलेही शिखर गाठाल, पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी बदलाल, स्वतःशी, नवऱ्याशी अप्रामाणिक व्हाल, संस्था मोडीत काढाल.. पण त्या शिखरावर पोहचतांना तुम्ही स्त्री त्व गमावलेलं असेल. .. म्हणूनच, स्त्री म्हणून सक्षम व्हा, शिका, घडा, घडवा.. पण तुमच्यातलं ते नैसर्...

भाजपा vs सेना

शिवसेनेचे हार्दीक अभिनंदन. अखेर स्वबळावर मुंबैमहापालिकेत सत्तेवर येणार असल्याबद्दल. #करुन_दाखवलं सेनेकडे मुंबैच्या विकासाची  संधी आणि जबाबदारी या योगे मिळाली आहे. त्याचं त्यांनी सोनं करावं हीच अपेक्षा. अभिनंदन. देवेंद्र फडणवीसांनीही अन्य लहान पक्षांना व अपक्षांना ब्लैकमेल आणि मांडवली करण्यापासून रोखलं. शिवसेनेची मुंबैसाठी जी काही तडफड तडफड चालू होती ती ही आश्वासक पद्धतीने शांत केली. शत्रुत्व नव्हे तर शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत हे अमित शहांचे म्हणणेच अधोरेखीत केले. आजच्या एकूणच लसलसत्या राजकीय वातावरणात विपरीत वाटेल असा घेतलेला एक पण सकारात्मक निर्णय. किंबहुना ज्या परिवर्तनाची भलावण देवेंद्र फडणवीस करत होते ते त्यांनी या स्वरुपात मुंबै महापालिकेत आणले. म्हणजे एकतर सुशासन स्वतः देऊ किंवा सुशासन द्यायला भाग पाडू, अन्य कुणाचा त्यात ब्लैकमेल, मांडवलीवाला हस्तक्षेप न होता. ते ही मोकळ्या मनाने. सत्तेत भागीदारी घेऊनही रोज उठून कण्हतकुतंत , बोटं कडकडा मोडत बसणार्या शिवसेनेसमोर देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची आणि भाजपची उंची या निर्णयाने वाढवली आहे. ब्राव्हो टीम देवेंद्र.

मुंबई भाजपा - सेना ! देवेंद्र फडणवीस द बॉस

(बातमी : भाजपा मुंबईत महापौर, उपमहापौर किंवा कुठल्याही समितीसाठी उमेदवार देणार नाही.) . मुंबईत भाजपाने एक जबरदस्त खेळी केलीय. शिवसेना विजयी होऊन पण पराभवी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भुमिकेचं विश्लेषण एक जबरदस्त राजकीय खेळी असच करावं लागेल. कसं ते बघुया. 1) भाजप महापालिकेची महापौरासकट कोणतीही निवडणुक लढवणार नाही त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपदही घेणार नाही. यामुळे काॅग्रेसला आपोआपच विरोधी पक्षनेतेपद मिळेल. पण त्यामुळे होईल काय की सेनेच्या विरोधात आपोआपच सर्व पक्ष येतील. त्यामुळे कोणताही चुकीचा निर्णय शिवसेना घ्यायला गेली तर 88 विरुध्द बाकी सर्व असल्यामुळे तो निर्णय रद्द करावा लागेल. 2) त्याचवेळी सेनेला चांगला निर्णय राबवतांना संख्याबळ कमी पडलं तर आम्ही मदत करु. म्हणजे चांगल्या निर्णयाला मुंबईकरांच्या हितासाठी पाठींबा पण चुकीच्या निर्णयाला विरोध करणार. आणि हे सर्व सत्तेत सहभागी न होता. म्हणजे सेना राज्यातील सत्तेत सहभागी पण आहे आणि विरोध पण करतेय. पण एकप्रकारे सेनेला असा इशारा आहे की सत्तेत सहभागी होऊन विरोध करु नका तर आमच्यासारखा बाहेरुन पाठींबा देऊन विरोध करा. 3)तसेच या भुमि...

EVM Machine

Image
EVM मशीन मध्ये घोटाळा झाला अश्या काही पोस्ट मी वाचल्या यावर मी माझं वैयक्तिक मत देत आहे. ( कुठल्याही राजकीय विचारसरणी शी माझा अजिबात संबंध नाही ) *(1)* EVM मशीन हे एक स्वतंत्र प्रणाली आहे. यात दोन मशीन एकमेकांना जोडलेले नसतात.( जसे दोन कंप्यूटर इन्टरनेट वर जोडलेले असतात) त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात मशीन मध्ये बिगाड़ करायचा असेल तर सगळ्या मशीन मध्ये स्वतंत्र पद्धतीने असा बिघाड़ करावा लागेल. एकाच वेळेस सगळ्या मशीन मध्ये बिघाड़ करता येणार नाही. EVM मशीन ची संख्या पाहता ते अशक्य आहे. *(2)* मशीन तयार करताना त्यांचे सरमिसळ(Randomisation) करण्यात येते ज्यात वेगवेगळ्या ठिकानहून या मशीन आनल्या जातात. त्यामुळे कोणता मशीन कोणत्या ठिकाणी जाईल हे शेवटपर्यंत कुनालाच माहित नसत. अश्या वेळी एका विशिष्ठ उमेदवाराला फायदा करवून द्यायची असेल तर सर्व इलेक्शन यंत्रणा ताब्यात घ्यावी लागेल. जे की अशक्य आहे. *(3)* मशीन निवडणूक प्रक्रिया साठी तयार करताना Bharat Electronics Ltd या कम्पनीचे इंजीनियर असतात ज्यांच्या स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाचा काही संबंध नसतो. ते या प्रक्रियेत मदत करतात. *(4)* निवडणूक...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved