EVM Machine
EVM मशीन मध्ये घोटाळा झाला अश्या काही पोस्ट मी वाचल्या यावर मी माझं वैयक्तिक मत देत आहे. ( कुठल्याही राजकीय विचारसरणी शी माझा अजिबात संबंध नाही )
*(1)* EVM मशीन हे एक स्वतंत्र प्रणाली आहे. यात दोन मशीन एकमेकांना जोडलेले नसतात.( जसे दोन कंप्यूटर इन्टरनेट वर जोडलेले असतात)
त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात मशीन मध्ये बिगाड़ करायचा असेल तर सगळ्या मशीन मध्ये स्वतंत्र पद्धतीने असा बिघाड़ करावा लागेल. एकाच वेळेस सगळ्या मशीन मध्ये बिघाड़ करता येणार नाही. EVM मशीन ची संख्या पाहता ते अशक्य आहे.
त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात मशीन मध्ये बिगाड़ करायचा असेल तर सगळ्या मशीन मध्ये स्वतंत्र पद्धतीने असा बिघाड़ करावा लागेल. एकाच वेळेस सगळ्या मशीन मध्ये बिघाड़ करता येणार नाही. EVM मशीन ची संख्या पाहता ते अशक्य आहे.
*(2)* मशीन तयार करताना त्यांचे सरमिसळ(Randomisation) करण्यात येते ज्यात वेगवेगळ्या ठिकानहून या मशीन आनल्या जातात. त्यामुळे कोणता मशीन कोणत्या ठिकाणी जाईल हे शेवटपर्यंत कुनालाच माहित नसत. अश्या वेळी एका विशिष्ठ उमेदवाराला फायदा करवून द्यायची असेल तर सर्व इलेक्शन यंत्रणा ताब्यात घ्यावी लागेल. जे की अशक्य आहे.
*(3)* मशीन निवडणूक प्रक्रिया साठी तयार करताना Bharat Electronics Ltd या कम्पनीचे इंजीनियर असतात ज्यांच्या स्थानिक प्रशासन आणि राज्य शासनाचा काही संबंध नसतो. ते या प्रक्रियेत मदत करतात.
*(4)* निवडणूक प्रक्रियेत स्वतंत्र अधिकार असलेले आयोगाचे निरीक्षक असतात. असे निरिक्षक फक्त आयोगला उत्तरदायी असतात. आणि सर्व प्रक्रिया त्यांचा नजरेमध्ये घडत असतात. निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी अनेक व्यक्ति जबाबदार असतात - यात जिल्ह्यातील IAS,IPS आणि इतर श्रेणीतिल महत्वाचे पदावरिल अधिकारी असतात.
*(5)* एका इलेक्शन डैशबोर्ड वरुन आयोग या सर्व प्रक्रियेची real time- monitoring केली जाते.
*(6)* मी EVM बनवणाऱ्या Bharat Electronics Ltd या कम्पनीला भेट दिली होती. हि कंपनी देशातील अतिशय किचकत अशी मिसाइल प्रणाली विकसित करते. त्यांचा कामामुळे त्यांचे जगभरात नाव आहे. ही कंपनी भारत आणि भारत बाहेर अनेक देशाना मशीन पुरवत आहे. आणि मशीन मध्ये घोटाळा झाला असा बाहेरील देशाने अजूनही आरोप केला नाही.
*(7)* आयोगा ने काही ठिकाणी Voter-verified paper audit trail (VVPAT) या पद्धतीने मतदान घेतला आहे. यात मतदान केल्यावर आपण ज्या उमेदवाराला मतदान केलाय त्याची एक चिट्ठी प्रिंट करुण निघते. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक याच पद्धतीने होणार आहेत. ज्या ठिकाणी अशे मतदान झाले त्या ठिकाणी अशी कोणतीही घोटाळ्याची तक्रार आली नाही.
*(8)* मतदान दिवशी मतदान चालू होण्या अगोदर सम्बंधित उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधि यांना मशीन वर आभासी मतदान करून मशीन विषयी शास्वती देण्यात येते. जोपर्यंत अश्या उमेदवार - प्रतिनिधि ची खात्री होत नाही तोपर्यंत त्यांना मशीन वर असे आभासी मतदान करून दाखवले जाते.
जगभरामध्ये आपल्या देशाला सर्वात मोठी लोकशाही आश्चर्य म्हटल जात. हे शक्य झाल ते दूरदृष्टि असणारे राजकीय प्रतिनिधि, अमाप मेहनत करणारे प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी , जनसेवक आणि या देशातील सुजाण नागरिक यामुळे !!
जगभरामध्ये आपल्या देशाला सर्वात मोठी लोकशाही आश्चर्य म्हटल जात. हे शक्य झाल ते दूरदृष्टि असणारे राजकीय प्रतिनिधि, अमाप मेहनत करणारे प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी , जनसेवक आणि या देशातील सुजाण नागरिक यामुळे !!
EVM मधील घोटाळा अश्या बातम्या या लोकशाहीवर प्रश्रचिन्ह उभा करतात.
- साभार