मुंबई भाजपा - सेना ! देवेंद्र फडणवीस द बॉस

(बातमी : भाजपा मुंबईत महापौर, उपमहापौर किंवा कुठल्याही समितीसाठी उमेदवार देणार नाही.)
.
मुंबईत भाजपाने एक जबरदस्त खेळी केलीय. शिवसेना विजयी होऊन पण पराभवी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भुमिकेचं विश्लेषण एक जबरदस्त राजकीय खेळी असच करावं लागेल. कसं ते बघुया.
1) भाजप महापालिकेची महापौरासकट कोणतीही निवडणुक लढवणार नाही त्याचवेळी विरोधी पक्षनेतेपदही घेणार नाही. यामुळे काॅग्रेसला आपोआपच विरोधी पक्षनेतेपद मिळेल. पण त्यामुळे होईल काय की सेनेच्या विरोधात आपोआपच सर्व पक्ष येतील. त्यामुळे कोणताही चुकीचा निर्णय शिवसेना घ्यायला गेली तर 88 विरुध्द बाकी सर्व असल्यामुळे तो निर्णय रद्द करावा लागेल.
2) त्याचवेळी सेनेला चांगला निर्णय राबवतांना संख्याबळ कमी पडलं तर आम्ही मदत करु. म्हणजे चांगल्या निर्णयाला मुंबईकरांच्या हितासाठी पाठींबा पण चुकीच्या निर्णयाला विरोध करणार. आणि हे सर्व सत्तेत सहभागी न होता. म्हणजे सेना राज्यातील सत्तेत सहभागी पण आहे आणि विरोध पण करतेय. पण एकप्रकारे सेनेला असा इशारा आहे की सत्तेत सहभागी होऊन विरोध करु नका तर आमच्यासारखा बाहेरुन पाठींबा देऊन विरोध करा.
3)तसेच या भुमिकेमुळे सेना आणि काॅग्रेस एकत्र येण्याचा जो प्रकार घाटत होता त्यावर मुख्यमंत्र्यांनी अगदीच बोळा फिरवला. कारण तुमचे सगळे बिनविरोध निवडुन आले असतांना तुम्ही काॅग्रेससोबत जाण्याची गरजच काय असा प्रश्न जनता सेनेला विचारु शकते.
त्यामुळेच तर सेनेचे अनिल परब मुख्यामंत्र्यांच्या भुमिकेमुळे सेनेला सर्व पदे मिळणार असली तरी या भुमिकेचं सुतकी चेह-याने स्वागत करत होते.
एकही मारा लेकीन क्या साॅल्लीड मारा.
हा विजय सेनेचा पराभव आहे !
.
भाजपा म्हणूनच ग्रेट !
महापौरपदासाठी ना कुणापुढे झुकले ना कुणाच्या दारी कटोरं घेऊन गेले...
मोडले, पण वाकले नाही !
मजबूत खेळी !
.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved