कांबळेंचं वक्तव्य, माझं मत

कांबळे जे बोलले त्यात ब्राह्मणांना दुखावण्याचा हेतू होता - नव्हता, काय बोलले, काय अर्थाने बोलले, दिलगीरी व्यक्त केली, माफी मागायला हवी वगैरे मुद्दे चर्चचा विषय ठरताय..
पण
कांबळेंनी कळत/नकळत जी आग लावली त्यामुळे उठलेले धुराचे लोट मात्र बरेच बदल दाखवून गेले...
.
एका दृष्टीने जे झालं ते चांगलं झालं...
..
(१) यामुळे कधी नव्हे ते सगळे ब्राह्मण (एरव्ही दहा डोकी दहा मतं असणारे) एकत्र आहेत. एका मतावर ठाम आहेत... आणि अगदी सामान्य ते विचारवंत माणूस यावर एकमताने व्यक्त झालाय. संघटन दिसतंय...
(२) मिडीया या आधी केव्हा बाह्मणांच्या बाजूने उभी राहीलेली ?
यावेळी अनपेक्षित झालं.
त्यांचं वक्तव्य आधी मिडीयानंच लावून धरलं. सकाळ सारखं वृत्तपत्र यावर ब्राह्मणांच्या बाजूने व्यक्त झालं. एबीपी, महाराष्ट्र, झी, आयबीएन या वाहिन्यांनी सुद्धा तटस्थपणे भूमिका मांडली... ब्राह्मणांच्या बाजूने !
(३) कांबळे सामाजिक न्यायमंत्री आहेत, आणि त्यांनी एखाद्या जातीवरुन वक्तव्य करणं हे चूकीचं आहे -
हे उद्गार घङ्याळवाल्याने काढले... काढावेच लागले...
(४) माफी / दिलगीरी -
कांबळेंनी दिलगिरी व्यक्त केली... "ब्राह्मणां''साठी !
यापूर्वी कुणी आपल्या चुकीसाठी ब्राह्मणांची माफी वगैरे मागितलेली ऐकलीय ?
नामदेव ढसाळ हे उदाहरण एकमेव होतं, पण त्यानंतर आत्ताच !
(ढसाळांनी आयुष्यभर ब्राह्मणांना शिव्या काढल्या, पण मरता मरता पश्चातापाने बिनशर्त माफी मागून गेले...)
(५) ब्राह्मण शांत, संयमी आहेत, वेळ आली तर चाणक्य आणि वेळ आल्यावर बाजीप्रभू आहेत... याचा पुनरुच्चार यामुळे झाला.
..
ब्राह्मणांत बदल होतोय...
तो बदल या निमित्ताने प्रकाशात आला...
बाह्मण समाज फार वाईट काळातून जातोय वगैरे खोटं...
संपूर्ण व्यवस्था सोबत आहे.. !
मुख्य म्हणजे पूर्वीचे लोकं मतांसाठी ब्राह्मणांविरोधात कुणाचीही चाटायचे, आत्ताचे तसे नाहीत...
चूक ते चूक, बरोबर ते बरोबर... !
..
कांबळे संघात वाढलेला माणूस आहे, शिवाय दादोजी प्रकरणात त्यांनी ब्राह्मणांच्या बाजूने ठाम भूमिका घेतलेली. भगूरला स्वा. सावरकरांच्या स्मारकासाठी त्यांचा पुढाकार आहे. आणि ब्राह्मणांविषयी त्यांना आदरही आहे.. वाक्याचा अनर्थ घेतला गेला हे जितकं खरं तितकंच आपण जेव्हा सामाजिक प्रतिनिधी असतो तेव्हा बोलतांना शुद्धीत राहणं, शब्द जपून वापरणंही गरजेचं आहे !
...
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर पवाराने थयथयाट केला, तेव्हा "एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून या पवारच्या पोटात दुखतंय" असं जाहीर वक्तव्य करून याच कांबळेंनी फडणवीसांची पाठराखण केली होती ...
...
ब्राह्मण मुख्यमंत्री असतांना त्यांच्याच मंत्रीमंडळातला एक मंत्री ब्राह्मणांविषयी बोलतो हा स्ट्रॅटेजीचाही भाग असू शकतो... गदारोळ झाला - संघटन दिसलं - अपेक्षित साध्य झालं - वक्तव्य मागे घेतलं...
अर्थात ही फक्त शक्यता...
..
बाकी यामूळे फायदा झालाय हे महत्वाचं... !
इतरांनाही शहाणपण येईल...
..
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved