Sena vs Fadanvis
ठाकरेसेना एखाद्या नागासारखी आहे. जरा धोका वाटला की फुस्स करीत नागासारखा फणा काढीत उभी रहाते. पण देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री एखाद्या कुशल गारुड्यासारखे आहेत. कुठली तरी पुंगी वाजवीत ते या नागापुढे ती गोलगोल, उलट सुलट फिरवीत रहातात. मग नाग बावचळून जातो. कुठून कसा हल्ला त्या पुंगीवर करावा तेच त्याला कळेनासे होते. आणि त्या भानगडीत देवेंद्रजी त्या नागाला सत्तेचे टोपलीत केव्हां बंद करतात, ते त्याला कळतही नाही. गंमत अशी की लोकांपुढे खेळ करायचा असेल तेव्हां या नागाला ते पुन्हा बाहेर काढतात.