Womens Day
स्त्री म्हणून स्वातंत्र्य मिळणं हा तुमचा हक्क आहे,
पण ते स्वातंत्र्य स्वैराचार ठरायला नको हे तुमचं कर्तव्य आहे...
ज्या स्त्री ने स्वैराचारी न होता स्वातंत्र्य जपलं तीच स्त्री आदर्श ठरलीय...!
...
कारण "स्त्री" त्व बहाल करतांना निसर्गाने मातृत्वाचं, संयमाचंही माप तुमच्या झोळीत टाकलंय...
.
स्त्री पत्नी म्हणून प्रामाणिक आणि मातृ रुपात समर्पित असेल तर आणि तरच ती सर्वकाळ पूजनीय ठरते,
मग ती राष्ट्रपती असो वा गृहीणी...!
...
केवळ वर्षानुवर्ष ठरलेले मापदंड बंडखोरी करुन मोडणारेही अनेक आहेत,
मग पुरुषी राहणीमान असो,
पुरुषांविषयी तिरस्कार असो..
किंवा
एक किंवा अनेक आम्हीच ठरवू म्हणणाऱ्या, उघडपणे माप झिडकारणाऱ्या अत्याधुनिक विचाराच्या स्त्रिया असो...
"स्त्री"त्वाचं माप झिडकारुन भलेही शिखर गाठाल,
पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी बदलाल,
स्वतःशी, नवऱ्याशी अप्रामाणिक व्हाल,
संस्था मोडीत काढाल..
पण त्या शिखरावर पोहचतांना तुम्ही स्त्री त्व गमावलेलं असेल.
..
म्हणूनच,
स्त्री म्हणून सक्षम व्हा,
शिका, घडा, घडवा..
पण तुमच्यातलं ते नैसर्गिक स्त्री त्व ढळू न देता...
त्या रचनेत बदल न करता...
स्वातंत्र्य आहेच,
पण ते स्वैराचार ठरू देऊ नका... इतकंच !
..
जागतिक "स्त्री" दिनाच्या आदरपूर्वक शुभेच्छा !
- तेजस कुळकर्णी
#WomensDay #स्त्रीदिन