स्त्रीदिन

(फेसबुक वरील महिला दिनाच्या पोस्ट ला आलेल्या अभिप्रायांवर दिलेलं उत्तर)
....
फेसबूकवर, इतरत्र पण अनेक स्त्रिया अश्या आहेत, ज्या केवळ आधुनिकता, समानता वगैरे म्हणत उघडपणे विवाहसंस्थेला, कुटूंबसंस्थेला डावलतात...
....
अगदी स्पष्टपणे सांगायचं तर 
(विश्वास बसणार नाही किंवा हे जरा भडक होईल, पण सत्य आहे.)
जरी लग्न झालंय तरी विवाहबाह्य संबंध ठेवायचं स्वातंत्र्य मिळायला हवं, कुणाबरोबर शारीरीक संबंध ठेवायचे हे ठरवू - मग नवऱ्यालाही जुमानणार नाही... मुलं बाळं झाली, पण करीयर करता त्यांना वाऱ्यावर सोडून इतरत्र राहणारेही आहेत...
पुरुषांचा पावलोपावली तिरस्कार करणारेही आहेत...
एक स्त्री तिच्या विवाहबाह्य (शारीरीक) संबंधांवर उघडपणे बोलते, ... ते कसे योग्य ते पटवते... माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, त्याने मला पुर्ण स्वातंत्र्य दिलंय, पण फॉर अ चेंज मी ट्राय करते....
जर असं असेल तर मग लग्न का केलं ?
जर अपत्य झाली तर या पारंपारीक आधुनिक लढाईत त्या बाळांची फरफट कां ?
...
जर पटत नसेल तर एकटे राहून हवं तसं जगा...
दोन्हीकडे पाय ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी ?
....
विवाहसंस्था जर सामंजस्य, तडजोड यावर उभी असेल तर केवळ स्वातंत्र्य, स्वातंत्र्य म्हणून हा स्वैराचार कश्यासाठी ?
...
करीयर, नातेवाईक, शिक्षण, सामाजिक आयुष्य, वैयक्तीक निर्णय यात स्वातंत्र्य, स्पेस देणं योग्य... द्यायलाच हवा...
पण स्त्री असो वा पुरुष - स्वैराचार, प्रतारणा कदापि नाही...
अगदी,
लग्नानंतर एकमेकांच्या आईवडीलांना सांभाळणं असो,
किंवा अपत्य !
...
जर यातून चुकीचं पाऊल पडलं तर जबाबदार कोण ?
...
कुटूंब सांभाळत, स्पेस जपत सामाजिक आयुष्यात टॉपवर अनेक स्त्रिया आहेत,
त्यांनाही तेवढं स्वातंत्र्य, साथ घरुन मिळाली....
त्या ही शिक्षितच !
आणि त्या आज टॉपवर आहेत,
यशस्वी आहेत...
गृहीणी ते राष्ट्रपती...
आदर्श अश्या स्त्रियांचा घ्यावा,
आदर अश्या स्त्रियांचा करावा... ! ...
...
केवळ स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजव्यवस्थेला आव्हान देत बंडखोरी करणं म्हणजे जग जिंकलं असं नव्हे...
...
स्त्री-पुरुष, दोघांच्या मर्यादा हे जितकं सामाजिक आहे तितकं नैसर्गिक आहे...
ज्याने हे डावलण्याचा प्रयत्न केला (स्त्री पुरुष दोन्ही) त्याला त्याचे दुष्परीणाम दिसले आहेत...
...
भलेही हे पटणार नाही,
जुनाट वाटेल
काहींना उपदेश वाटेल,
...
पण स्त्री पुरुष दोघांनी मर्यादा जपल्यात,
हेकेखोरपणा सोडून - मनं जपत सांमजस्य ठेवलं
तेच सुखात आहेत,
बाकी वर वर लाख आनंद दाखवणारे असतील,
मनात खदखद असते !


© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved