Indian Corporate Industry and Lacks

तर एकुणात आजकाल इंडस्ट्री, स्टार्ट अप यांच्याबद्दल खूप बोलबाला चालू आहे. इंडस्ट्रीच्या लोकांना रेड टेपिझम मधून मुक्तता मिळून रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते आहे असा एकुणात सूर आहे.
मला स्वतः ला असं काही वाटत नाही आहे. जिथे पैसे लागतात तिथे आजही लागतात. जिथे वेळ लागायचा तिथे आजही वेळ लागतोच.
आमची एक शिपमेंट चायना तुन आली. त्या कंपनीचं हेड ऑफिस यु के त आहे. त्या शिपमेंट चं इन्व्हॉईस यूकेतून बनलं. पेमेंट देताना बँकेने सांगितलं, हे चालणार नाही. शिपमेंट जिथून आली तिथूनच इन्व्हॉईस व्हायला पाहिजे. बरं मग पेमेंट करताच येणार नाही का? तसंही नाही. काही कागदी घोडे नाचवले. महिनाभर टाइम पास केला, अन पेमेंट दिलं.
इंडियन कस्टम्स. आमची कंपनी सेटको झाली. त्यामुळे आम्ही जगभरातल्या सेटको साठी सिस्टर कंपनी झालो. सेटको च्या दुसऱ्या देशातल्या प्लांट मधून इंपोर्ट होणाऱ्या गोष्टी क्लीअर करायला ही मंडळी आम्हाला जी नाचवत आहेत, त्याने झीट पडायला आली आहे. सहा महिने झालेत, कस्टम्स मध्ये मटेरियल पडून आहे. कस्टमर ठणाणा मारतोय आमच्या नावाने. पण ही लोकं, त्यांना ना खेद ना खंत. ढिम्म हलत नाहीत. ५% ड्युटी झाली आहे, त्यात आता आम्ही काय चोरणार? तरी भिकारी बनवून ठेवलं आहे आम्हाला.
हसतात हो, हे बाहेरची लोकं आपल्याला. आपल्या बाबा आदम च्या पद्धतीला, आपल्या अजागळ पणाला. कुठल्या तोंडाने आपण उत्पादकता वाढवायच्या गोष्टी करतोय. प्रोडक्टिव्ह वेळ या फालतु गोष्टी निस्तरण्यात जातोय.
जादूची कांडी फिरवता नाही येणार हे कळतंय, पण तरीही जे घडतंय त्यापेक्षा दवंडी जोरात पिटली जात आहे, हे ही जाणवतंय.
(हे लिहिण्यापेक्षा घेऊन जाऊ का पाच पंचवीस नातेवाईकांना बँकेत नाही तर कस्टम्स मध्ये. हाय काय अन नाय काय. फोडून काढतो अन काम तमाम करून टाकतो) - Rajesh Mandlik
>>>>>>>>>>>
<<<<<<<<<<<<
My Comment
Rajesh Mandlik सरांची एक पोस्ट वाचली, इंडस्ट्रीत असलेली भारतातली बाबा आजमच्या जमान्यातली पद्धत मांडलीय...
व्यवसायात त्या कागदी घोड्यांमुळे आपलं घोडं अडतं हे खरंय, पण हे खूप पुढचं झालं. म्हणजे लग्न होवून, पोरंबाळं झाल्यावर पोराच्या अॅडमिशनला रांगेत उभ्या पालकाची व्यथा असावी इथपर्यंत... पोरं बाळ होणं दूर, माणूस पहिल्या चार पाच स्टेप पार करून गेला तरी जन्म सार्थकी लागला...
सुरुवातीपासूनची हीच गत आहे,
कंपनी रजि. करायची ते दरमहा बँकेला सेम फॉरमॅट  declaration of source पाठवायचं ...
बाबा आजम सुद्धा मॉर्डन वाटावा इतकी जुनी पद्धत आहे...
...
माझं सांगतो...
करायचं तर पुर्ण तयारीनिशी उतरायचं असं ठरवून प्रा. ली. रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरु केली - ऑनलाईन !
वेबसाईट यूजर फ्रेंडली नाही, वर्क फ्लो, डिरेक्शन्स, रिक्वायरमेंट व्यवस्थित नाही... डोकं आपटून आपटून एक एक स्टेप पुर्ण करायला ब्रह्मांड दिसायचं. डिजीटल सिग्नेचर, डिन नं, कार्पोरेट certificate ची वाट बघत बसा... वाट बघून जीव जायची वेळ आली की ते यायचं..
धडपडत ते पुर्ण केलं
नंतर बँकेत आहेच दे माय दे माय...
नाचवा कागदी घोडे...
..
हे दिव्य पार पडलं की ..
डॉलर मधून येणारा पैसा कनव्हर्ट करण्यासाठी परत दरमहा एकाच फॉरमॅट मध्ये स्टेटमेंट द्या ...
आधीचे काही महिने मी शब्दशः खेटा घातल्याय...
कारण कागदी कामाची सवय असलेला स्टाफ - काही गोष्टींची माहिती नाही, टेक्नीकलच्या नावे बोंब. त्यांना मी सांगायचो एक ते समजायचे भलतंच. पुन्हा नाचवा कागदी घोडे...
आता कुठेतरी रुळावर येतंय... त्यात जर स्टाफची बदली झाली तर पुन्हा डोकं फोडा...
...
मार्च एंड आला की धसका बसतो, साधं सोप्पं असं नाहीय काहीच... एक तर स्वतः धडपडत करा, कींवा एजंटच्या पाया पडा...
...
आपली प्रॉडक्टिविटी खूप चांगलीय,
पण ती अश्या कागदी घोड़यांबरोबर नाचण्यात खर्च होते...
जर त्यात सोपेपणा आला तर भारतीय उद्योजक चायना-जापानला विकत घेऊ शकतो इतकं कमावतील...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved