हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... !

"गुढी" पेक्षा "ब्रह्मध्वज" हा शब्द मला खूप आवडतो... काठी, महावस्त्र, त्यावर कळस, लिंबाचे पानं, साखरेचा हार आणि तो ध्वज घरावर दिमाखात उभारुन नव्या वर्षाचं, सहा ऋतूंच्या सहा सोहळ्यांचं दिमाखात स्वागत करायचं... या दिवशी अभिमान, नाविन्य, पावित्र्य वगैरे भरभरुन वाहतं...
...
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
ब्रह्मध्वजाच्या प्रार्थनेने आपल्या घरात मांगल्य येण्याची प्रार्थना करायची..
...
अभिमान बाळगावा असा हा दिवस...
...
हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... ! आनंदात रहा !
...
आमच्या घरची गुढी !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved