Share Market

शेअरबाजारात आपला कोअर पोर्टफोलिओ तयार करावा. त्याला खरं ट्रेडिंग म्हणता येईल. असे रोजंदारीसारखं डे ट्रेडिंग करून लक्षाधीशांचे भिक्षाधीश झालेले अनेक आहेत.
मार्केटमध्ये पैसे कमवायचे तर संयम हवा. उजलतपसंद लोकांची ही कामं नव्हेत.
ठराविक उत्तम दहा, बारा,पंधरा कंपन्या निवडाव्या. फक्त त्याच कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत. भाराभर फालतू शेअर्सना मिठी मारून बसू नये.
कंपन्या निवडतांना त्यांचा नीट अभ्यास करावा. बाजारात ज्याला प्रचंड मागणी आहे, ज्या फंडामेन्टली स्ट्रॉंग आहेत, जिथे ग्रोथ आहे, अशा वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपन्या निवडाव्या. एकाच सेक्टरमध्ये सर्व गुंतवणूक करू नये. Don't put all your eggs in one basket....  हे शेअरबाजार गुंतवणुकीचे बेसिक सूत्र आहे.
शेअरबाजारात उतरण्यापूर्वी, टेक्निकल ऍनॅलिसिस स्वत: शिकून घ्यावा. काय घ्यायचं ते आपल्याला कळलं पाहिजे. कधी घ्यायचं ते ही कळलं पाहिजे. कधी विकून बाहेर पडायचं ते ही कळलं पाहीजे. टिव्हीवर कुणाचं तरी काहीतरी ऐकून कधी काही घ्यायला जाऊ नये. आपल्याकडे च्युतियांची कमी नाही.
माझ्यामते फार्मा, बॅंकिंग, रिफायनरीज, इंजिनियरिंग, पॉवर अशा सेक्टरमध्ये मुख्य गुंतवणूक करावी. कारण मंदीचा तडाखा यांना कमी बसतो कारण या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींमध्ये व्यवसाय करतात.
कितीही मंदी आली तर लोक एकवेळ महागडे टिव्ही घेणं टाळतील, पण असा कुणी मिळणार नाही की जो म्हणेल, मंदी आहे तर आता औषधं घ्यायची नाहीत. झक मारत घेणार. तसचं इतर सेक्टरचं. जोडीला सॉफ्टवेअर, सिमेन्ट ( सध्या वाईट असलं तरी), स्टील यांचा अंतर्भाव करावा.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, येस बॅंक, कोटक बॅंक अशा बॅंकिंगमधील कंपन्या, सिप्ला, ग्लेनमार्क, सनफार्मा, डॉ. रेड्डी अशा फार्मा कंपन्या, लार्सन ट्युब्रो, सिमेन्स सारख्या इंजिनियरिंग, मारूती, टाटा मोटर्स, महिन्द्र सारख्या ऑटोमोबाईल्स, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, रिलायन्स, ओएनजीसी सारख्या रिफायनरी आणि पेट्रोलियम, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट यासारख्या पर्सनल हेल्थकेअर, इन्फोसिस, एचसीएल टेक सारख्या सॉफ्टवेअर, कोल इंडिया, गॅस ऍथॉरिटी ऑफ इंडिया, पॉवर ग्रीड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन सारख्या पॉवर कंपन्या.......
अशा कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवावा..... याला म्हणतात शेअर्स घेणं.....
नाहीतर ब्रोकर सांगतो म्हणून कुठल्यातरी नावंही ऐकली नाहीत अशा कंपन्यांचे शेअर्स घेऊन पैसे घालवणं, म्हणजे गुंतवणूक नव्हे.
मी वर लिहिलेल्या कंपन्यांचा पोर्टफोलिओ बनवायला आयुष्य जावं लागतं. तेव्हा कुठे असा कोअर पोर्टफोलिओ बनतो.....  उमरें बीत जाती है... यहॉं उजलत नही चलती... एक एक रत्न निवडून, पारखून घ्यायला लागतं....
बशीर बद्र साहेबांचा सुंदर शेर आहे...
हर धड़कते पत्थर को, लोग दिल समझते है
उमरें बीत जाती है, दिल को दिल बनाने में.....
आपला,
(रत्नपारखी) धोंडोपंत
.............
( श्री धोंडोपंत आपटे यांच्या फेसबूक वॉल वरून साभार)
You can follow him on : https://www.facebook.com/dhondopant.apte

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved