काका - काकू - दारु आणि सात मजले...

सन्डे मॉर्निंग
शेजारचे साठवर्षीय काका लंगडत लंगडत चालत होते... इतक्यातच भेटले पार्किंगमध्ये ! काका तसे धडपडे, कुठे ना कुठे धडपडत असतात, लंगडत दिसले तर आता कुठली मोहिम फत्ते करुन आले हे विचारणं क्रमप्राप्त झालंच...
.
- काय काका... सकाळी सकाळी कुठे निघाली स्वारी ? आणि पायाला काय झालं ?
काका - मार्केटमध्ये जातोय रे ! खरेदी वगैरे करायला रविवारची..
- ठीकाय, पण पायाला काय झालं ?
काका - काही नाही, दुखतोय थोडा...
- कश्यामुळे ?
.
इतक्यात काकू अवतरल्या... काकूंच्या एकुण अवतारावरून भडकलेल्या स्पष्ट दिसत होता, त्यामुळे काकांच्या पायामागे नक्कीच काहीतरी दडलंय हे पक्कं होतं... त्या नेमकं "कश्यामूळे" या प्रश्नावर आलेल्या ! काका निघणार, तोच ...
काकू - ओ ओ मी सांगते ना, कश्यामूळे ते... तुमचे पराक्रम... थांबा...
.
इथे सन्डे मॉर्निंगचा धमाकेदार एपीसोड मिळणार - अस्मादिक खूश !
.
काका - अगं कश्याला... राहू दे ना !
काकू - असं कसं... ? पराक्रम आहे हा...  गप्प बसा... सांगते मी...
काका एवढंस तोंड घेऊन बाजूला...
काकू सुरु...
.
बघ, काल रात्री एक वाजता तुझे काका पिऊन घरी आले, बरं पितात तर प्या... पण झेपेल तितकंच नको कांsss ? (काकांकडे एक जळजळीत कटाक्ष...)
काल हे आले, टॅक्सीवाल्यानं इथे सोडलं, आणि आमचा फ्लॅटच विसरले... दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट... हा माणूस चार वेळा जिन्याने सातव्यामजल्यापर्यंत जाऊन खाली आला...
बरं येता जाता सगळ्यांची बेल वाजवली...
....
तेवढ्यात वॉचमन आला, काका अजून गप्प...
...
"हा भैयाजी, थे अंकल उपर नीचे करते रहे, हमारा ध्यान गया तो इनको छोड दिए उनके घर... बोले घर मिल नही रहा...
क्या अंकलजी, क्यो पिते हो इतना..."
वॉचमन अक्कल शिकवून निघून गेला...
...
काकू - बघितलं ? चारवेळा वरुन खाली... खालून वर.. पाय दुखणार नाही तर कांय ? ... नशीब, कुणी बेल वाजवतांना बघितलं नाही, नाहीतर कल्याण !
...
काकूंच्या तोंडातून वज्रास्त्रांचा वर्षाव सुरु होता...
पराक्रमी काका अॅक्टीवाला चावी लाऊन गपगुमान ऐकत होते,
मी निघता निघता, बापट काका आले...
"अहो देशपांडे... काल रात्री दार उघडेपर्यंत निघून गेलात, आवाज दिला तरी थांबला नाहीत... काय झालं एवढ्या रात्री ?...
पुन्हा पहिल्यापासून...
काका - काकू - दारु आणि सात मजले...
...
चला काका... "हॅव अ नाईस डे"... :-D :-D :-P
विशेष हास्यासह निघालो...
.
આજે મારા દિવસની શરૂઆત રમૂજી છે
અને કાકાની ફુલટૂ વાટ લાગે છે...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved