Posts

Showing posts from 2015

RIP Mangesh Padgaonkarji

Image
कविवर्य मंगेश पाडगांवकर गेले... तृणातल्या फुलापासून वादळी वाऱ्‍यापर्यँत, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी हळूवार मनाची, हसतमुख धग शांत झाली... जिप्सी कायम कसा राहील ?  . मंगेश पाडगांवकर... तुम्ही खूप दिलं हो, सगळे खिसे भरुन भरुन दोन्ही मुठांमध्ये गच्च भरलेलं असतांनाही आम्ही तुमच्या कवितांसाठी हापापलेले आहोत... इतक्यात तर कुठे दिवस उजाडलाय. कसं सांगू ?? . शुक्रताराचे सुर पुढे गेले... आज शब्द गेले... चटका लावून गेले...

Gurucharitra Parayan

Image
कालपासून गुरुचरीत्राचं पारायण सुरु केलंय. दरवर्षी हे सात दिवस मला खूप शिकवणारे असतात. स्वत:च्या अनेक गोष्टीँवर ताबा ठेवला जातो.  आणि या सात दिवसात कुठल्याना कुठल्या रुपात दिव्य दृष्टांत मिळतोच. . कालच रात्री स्वप्नात मी गाणगापूरात असल्याचं दिसलं. आणि आज सकाळीच आमचे एक नातेवाईक गाणगापूरला गेल्याचा फोन आला. महाराजांनी स्वत:हून सेवा करुन घेतली... कुठल्या ना कुठल्या रुपानं मी तिथे पोहचलोच. आणि आज दुपारी पहिल्यांदाच मनीध्यानी नसतांना अचानकच "देऊळ बंद" चित्रपट बघायला मिळाला. देऊळ ब ंद चित्रपटात दत्तसंप्रदाय आणि दत्तस्थानांचं अप्रतिम दर्शन दिलंय. आणि महाराजांचं आपल्याकडे कसं लक्ष आहे याचा उत्तम साक्षात्कार दाखवलाय. शहारे येतात अंगावर. . अनुभूती कशाला म्हणतात याची "याची देही, याची डोळा" प्रचिती आली... या सात दिवसांत खूप शांत वाटतं, कितीही टेँशन असू देत - सात दिवस महाराज आपल्याबरोबर असल्याचं पदोपदी जाणवतं.

अखेरचा क्षण मृत्यूचा थंडगार स्पर्श

. काल रात्री माझ्या एका मित्राची नव्वदीतली आजी देवाघरी गेली. नव्वद वर्षांची होती, शरीर पूर्ण गेलेलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मेंदू आणि वाचा तल्लख होती. तिचा शेवटचा अगदी जीव जायच्या वेळेचा क्षण मला प्रत्यक्ष बघता आला. शेवटचा क्षण कसा असतो, इतक्या वर्षाचं आयुष्य संपत असतं, जे जे माझं माझं म्हणून जमवलं ते इथेच सोडून जायचं असतं, पुढे काय असेल याची एक उत्सुकता अश्या असंख्य भावनांचे काहूर त्यावेळी मनात उठत असावं. त्या आजींच्या शेवटच्या  क्षणाचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांची वाचा आणि मेंदू शेवटपर्यंत शाबूत होता त्यामुळे नेमक काय होतंय हे जाणून घेण सोप्प झालं.  . शेवट जसा जसा जवळ येत होता तसा आजूबाजूंच्या मंडळींची हुरहूर वाढत होती. संपूर्ण शांत आणि भयाण वातावरण. नकळत कुणाच्यातरी मुखातून हुंदका बाहेर पडायचा. आजीं घरभर नजर फिरवत होत्या. त्यांच्या मुलांकडे, मुलींकडे वैगेरे बघत होत्या. खुणेनेच त्यांना शांत व्हा असा इशारा केला. त्यांच्या मोठ्या मुलाने शांतपणे विचारलं, "काही हवंय का आई??" आजी सगळी शक्ती एकवटून "मी खूप थकलीय आणि मला झोप येतेय" इतकंच बोलल्या, आणि समोरच लावलेल्या ...

कालनिर्णय

Image
"भिँतीवSरी... कालनिर्णय असावे." किँवा "वामनराव, तुमच्या ठणठणीत तब्येतीचं रहस्य काय ?  - नियमीत व्यायाम, बदामाचा शिरा,  पुरेशी झोप,  व्यसन नाही आणि कालनिर्णय आरोग्य... - आता ही कुठली गोळी ? - गोळी नै ओ, कालनिर्णयची खास आरोग्य आवृत्ती... भिँतीवर लावा आणि शड्डू ठोका...!! हा शिवाजी पार्कातला दोन आजोबांमधला सकाळचा संवाद... कडाक्याच्या थंडीचे दिवस असतांना, डिसेँबरच्या सुरुवातीला पहाटे पहाटे पहील्या चहाबरोबर रेडीओवर ऐकू येणाऱ्‍या या दोन जाहिराती सकाळी लवकर उठणाऱ्‍या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतात... मला तर माझी स्कूलटाईम मॉर्निँग आठवते... डिसेँबरच्या थंडीत सकाळी स्कूलबस पकडण्यासाठी उठल्यावर डोळ्यावर अलगद झोप, थोडासा संताप आणि ग्लासभर दूध यामागे बॅकग्राऊंड म्यूजिक भिँतीवssरी कालनिर्णय असावे... हेच असायचं... आणि वामनराव... संपायच्या आत दूध संपवायचं...! . साधेपणा आणि सुटसुटीतपणा या बळावर गेली बेचाळीस वर्ष कालनिर्णय मराठी घरातल्या आणि मनांतल्या भिँतीवर राज्य करतंय. मराठी माणसाची एकादशी-चतुर्थी सारखी नाजूक नस पकडून कालनिर्णयच्या माध्यमातून जयंत साळगांवकरांनी ८.५ मिली. ड...

असहीष्णू

Image
"असहीष्णू :: ये क्या होता है भाई ??" . कालच... ऑफीसच्या गेटवर उभ्या असलेल्या "उत्तर भारतीय" वॉचमनला निघता निघता Happy Diwali केलं... त्यानं मस्त हसून रिप्लाय केलं... त्यानंतर रस्त्यावर, चौकांत ओळखीचे ट्रॅफीक पोलीस भेटले. पाच मिनिटं थांबून प्रत्येकाशी बोललो, शक्य असेल तर सुट्टी घ्या आणि दिवाळी घरी करा असा न मागताच सल्ला आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या...  "आमच्या नशीबी कसली रे सुट्टी... धुळ्याहून आलास की घरी ये फराळाला" असं आग्रहाचं निमंत्रणही घेतलं... पुण्याहून धुळ्याला आल्यावर सकाळी उतरतांना ट्रॅव्हल्सच्या ओळखीच्या ड्रायव्हर- आणि "ख्रिश्चन" मॅनेजरनं स्वत:हून Happy Diwali केलं... परत जातांना मिठाई घेऊन ये अशी मागणीही झाली. . आणि आत्ता इतक्यातच... गाडी सर्व्हिसीँगला नेली, ओळखीचाच मेकॅनिक... २३६ रुपयांचं बिल फाडतांना सवयीप्रमाणं "कितना दूँ रहमान ? दिवाली डिस्काउंट देके बिल बना..." म्हणत २०० त आवरलं... निघतांना तो आठवणीनं Happy Diwali tejaabhai बोलला... . "असहीष्णू" वातावरण झालंय नां ? मला तर नाही ब्ब्बॉ दिसलं कुठे... उलट, चाँद, ...

Year of Fadanavis Gov.

महाराष्ट्र सरकार आज वर्षपूर्ती साजरी करतंय... शिवसेनेच्या येड्याचाळ्यांना, टांगघाल स्वभावाला फूकटाचीही किँमत न देता योग्य रितीने राज्याची धुरा सांभाळणाऱ्‍या फडणवीसांच्या द्रष्टेपणाचं कौतूक वाटतं... . चांगल्या बाजू : (१) फडणवीसांची कार्यपद्धती : चाणक्यनितीचा पूरेपूर वापर करुन फडणवीस कार्य करताय. सर्वसमावेशक धोरण, जनतेचा मुख्यमंत्री आणि अभ्यासपूर्ण आखणी हा फडणवीसांचा पाया आहे. कामाशिवाय वायफळ बडबड नाही हे महत्वाचं. स्वत: लक्ष घालून प्रत्येक काम करताय. (२) विनोद तावडे आणि सुधीर  मुनगंटीवार : शिक्षणमंत्री तावडे आणि वनमंत्री मुनगंटीवार फडणवीसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करताय. स्वच्छ चारीत्र्याचे मंत्री आणि कार्यक्षम ! (३) बाबासाहेब पुरंदरे : बाबासाहेब पुरंदरेँच्या महाराष्ट्र भूषणवरुन काही नतद्रष्ट्यांनी रान पेटवलं होतं. पण तावडे-फडणवीस जोडीने न भूतो न भविष्यती असा सोहळा करुन बंटी आणि ब्रिगेड्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घातल्या. (४) जलयुक्त शिवारासाठी फडणवीसांनी महाराष्ट्र पिँजून काढलाय. (५) डिजीटल वर्षाच्या दृष्टीने योग्य कार्य सुरु झाले आहे. (६) वर्षभराचा कारभार पारदर्शक...

Dasara 2015

Image
माझं सरस्वती आणि शस्रांचं पूजन... विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...  . विजयादशमी हि मुख्यत्वे दुर्गेने म्हैशासूरावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरी केली जाते. नऊ रात्रींच्या घनघोर लढाईनंतर दहाव्या दिवशी अंबेने म्हैशासूरावर विजय मिळवला... नऊ दिवस युद्धामुळे एकाच जागी अडकलेल्या देवतांनी दहाव्या दिवशी सिमोल्लंघन केलं... नवरात्राच्या आरतीत आहे तसं  दशमीच्या दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो...  सिँहारुढपरी दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो... शुंभनीशूंभादी राक्षसा किती मारिसी रणी हो... अस्सं... . पांडवांनी याच दिवशी अज्ञातवासातून बाहेर पडून राजवस्त्रे परीधान केली, शमीच्या झाडावर लपवलेल्या शस्रांचं पूजन केलं... आणि तेव्हापासून शस्त्रपूजनाची प्रथा सुरु झाली... . या दोन महत्वाच्या प्रथा... म्हणूनच विजयादशमीला विजयादशमी म्हणतात... आणि शस्त्रपूजन करतात. . रामाने रावणाचा वध केला, पण रावण लंकेश्वर होता... राजा होता... कलाकार होता... रुद्रपूजक होता... त्याने सीताहरणाची चूक केली, पण क्रुरपणे व्याभिचार केला नाही, जबरदस्ती केली नाही... रावणाविषयी मला आदर आहे... . असो. विजयादशमीच्या खूप ...

Sunday

रवीवारची दुपार... विकऐँड म्हणजे अस्सल शनीवार... त्यातही शनीवारची दुपार... उद्या सुट्टी असल्याची मस्त जाणीव आणि शांतता... त्यातही रवीवारी सकाळची वेळ एकदम भन्नाट... रवीवारची झिँग फार फार तर सकाळी १० पर्यँत टिकते... नंतर दिवस माध्यान्हाकडे कलायला लागला की आपसूकच उद्या पुन्हा मंडे आला यार... ची विचित्र फिलीँग... . डोळ्यावर अलगदशी झोप असते... टिव्हीवर झी टॉकीज छकूला किँवा सेट मॅक्सचा सूर्यवंशम सुरु असतो... मनात रिलॅक्सनेस पण त्यामुळेच नकळत बोजडपणा येतो. आज बरंच काही करायचं ठरवलेलं  असतं... स्पेशली, जेवायला बसतांना डोळ्यावरची अलगद झोड गडद होत असते. रवीवार किती फास्ट सरकतोय यार... इतर दिवस कस्सेही असुदेत, बदलूदेत आपला रवीवार मात्र अनादी काळापासून अभिजात, अस्साच आहे. . सकाळी आठची रंगोली त्यातली सोनाली बेँद्रे इस दिवाने लडके को म्हणत आठवते तसंच दुपारी चार वाजता हमखास सह्याद्रीच आठवणार... ते पण लक्ष्मीकांत बेर्डेच. मग पंधरा एक वर्षांपूर्वीचे संडे फ्लॅशबॅक होणार... रवीवार दुपारच्या चहाला सुद्धा संडे टेस्ट असते... . दिवसाचा उत्तरार्ध सुरु होतो... कंटाळलेला, बोअर, अवजड... उद्या सकाळी "मंडे...

Unfortunate Fact

आमचे जवळचे नातेवाईक असलेले एक आजोबा परवा देवाघरी गेले. त्यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित आणि वेलसेटल्ड प्रकारातली. लग्न ते पोरांची मुंज वगैरे सगळे कार्यक्रम आटोपलेले... पण पोरांच्या विचित्र स्वभावामूळे त्या आजोबांचा मुक्काम गेल्या दोन वर्षाँपासून वृद्धाश्रमात होता... आणि ३ तारखेला त्यांनी तिथेच आवरलं !! वृद्धाश्रम मॅनेजमेँटनं त्यांच्या मुलांना आणि इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून आम्हालाही कळवलं.... . अंत्ययात्रा तशी नाहीच... चार पाच फोन केल्यानंतर दोघांपैकी एक मुलगा आला... "मरेपर्यँत  म्हाताऱ्‍याचं तोँडही बघणार नाही" अशी प्रतिज्ञा असल्यानं दुसऱ्‍यानं बहिष्कार घातला...! तासाभरातच सगळं आटोपलं... पण नंतर ऑफीस स्टाफ आणि नातेवाईँकासमोर "पितृऋण" फेडण्यासाठी म्हणून दोघांनी लाख रुपयांचं श्राद्ध घालायचं ठरवलंय... १३-१४ तारखेला श्राद्धसोहळ्यानिमित्त शाही भोजन वगैरे ठेवलंय... ज्याचं श्राद्ध आहे तो माणूस मात्र एकटाच, उपाशीपोटीच तडफडून मेला . आईबापाला जिवंतपणी पाणीही न पाजणारे पितृपक्षात त्यांच्यानावे शंभर लोकांना जेवण घालतात... तो माणूस उपाशी तडफडतच जातो.... मेल्यानंतरचं खाणं वगैरे सग...

Hindi and Parties

एकीकडे :  देशातील आरक्षणाच्या पुर्नविचाराची गरज आहे... असं अभ्यासपूर्ण मत परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नोँदवले... तसेच इतिहासातील अनेक व्यक्तीँच्या, घटनांच्या पून:अभ्यासाची गरज असल्याचे सांगितले. हिँदूत्वावादी संघटनेचे शिरोमणी भारताच्या वर्तमानाची घडी निट बसवण्यासाठी धडपड करताय. . विश्व हिँदू परीषदेचे प्रविणजी तोगडीया हिँदूंचा प्रपंच, रोजगार सुलभ आणि अद्ययावत करुन, हिँदूशक्तीचे एकत्रीकरण करत हिँदूंना शिक्षित, समृद्ध आणि राजकीय-सामाजिक दृष्ट्या सक्षम करताय. हिँदूचे भव िष्य संरक्षीत करताय. . तर दुसरीकडे सनातनचे प.पू. ज.बा.आठवले... सदरा कुर्ता घ्या, समष्टी करा, साधना करा, लहरी दिसल्या, वयाआधीच प्रौढ व्हा वगैरे सात्विक बफाऱ्‍या देऊन स्वत:ला कृष्णावतारी म्हणत हिँदूंना बाबा आझमच्या जमान्यात नेताय... . संघ आणि विहिँप जीव तोडून जी धडपड करतात ; ती सनातनच्या येड्याचाळ्यांमूळे अर्धी पाण्यात जाते. संघ आणि विहिँपच्या "राजकीय परीपूर्ण सत्ता" या केँद्रबिँदूचा विचार आत्ता काळानुरुप आहे. तिथे हे बिनडोक सनातनवाले हिँदूंच्या तरुण बळाला मुर्खासारखं निळ्या लहरी-काळ्या लहरीँच्या मागे ...

Mahalakshmi

Image
आज आम्हा देशस्थांकडे महालक्ष्मी असतात, तर कोकणस्थांकडे गौरी. "थोडक्यात गोडी" या उक्तीप्रमाणे कोकणस्थांकडे खड्यांच्या गौरीँची पूजा करतात. नारळाच्या पदार्थांचा नैवेद्य आणि १२ वाजेपर्यँत जेवण... साधेपणात सुंदरता.  . आम्हा देशस्थांच्या महालक्ष्म्यांचा थाट मात्र राजेशाही. "लक्ष्मीला शोभावा असाच..." ! उंची साड्या, मुखवटे, दागिने, अत्तरं आणि समोर फळं, मिठाई... आज भलेही जेवायला दुपारचे तीन वाजतील पण, पंचपक्वान्नाचा थाट असतो... पुरणपोळी, सोळा भाज्या, कोशिँबीरी, पुरणाचे दिवे... उद्या व िसर्जनाच्या दिवशी खीर-कान्होले. तीन दिवस सजावट, खाण्यापिण्याचा थाट. . कोकणस्थ असो वा देशस्थ... गौरी आणि महालक्ष्मी यांच्या पाहुणचारात कुणीच कमी पडत नाही. अतिथी देवो भवः ही उक्ती दोघांकडून पूरेपूर पाळली जाते... आणि गौरी/महालक्ष्मी देशस्थ+कोकणस्थ असा तृप्तीचा माहेरवास भोगून आनंदातच विष्णूलोकात परत जातात... . Bdw... येताय ना जेवायला ??  :D  देशस्थांचा पाहूणचार करु आज...!

Gannapati 2015

Image
तुम्ही काही म्हणा, पण गणपतीच्या दिवसांचा बेस ज्याला म्हणता येईल अशी (पार्वतीच्या बाळा आधीची) चीक मोत्याची माळ होती तीस तोळ्याची, प्रथम तुला वंदीतो, गणराज रंगी नाचतो, गजानना श्री गणराया... ही चार गाणी ऐकल्याशिवाय गणपती आल्यासारखेच वाटत नाहीत. हि चारही गाणी शांत प्रकृतीची, भक्तीरसप्रधान आणि नितांतसुंदर... अवीट गोडीची... बनानेवालेने सबसे खुबसूरत यही आखिरी चीज बनाई... वगैरे. . त्यापैकी चीक मोत्याची माळ माझं ऑल टाईम फेवरेट... चार पाच वर्षाँपूर्वी आम्ही चौघांनी कॉलेजच्या गणेशोत्सव  कार्यक्रमात समुहगीत गायलेलं. वन्समोअर आणि अनेक बक्षिसं मिळालेली. त्याचा रियाज करतांना आणि गातांना या गाण्यानं झिँग चढवली होती. आणि बऱ्‍याsssssच बाकीच्या भारी भारी गोष्टीसुद्धा या गाण्यादरम्यान झालेल्या... अगदी आजपण माझ्या कुठल्याही सांगीतिक मैफीलीत प्रथम तुला वंदीतो नंतर हे गाणं नं २ वर असतंच... . आत्ता डिजे विद थर्डक्लास धांगडधीँगा... गणेशोत्सवाचं सांगितीक पावित्र्य संपल्यात जमा आहे... . बाप्पा... तुझ्या आठवणीच्या कप्प्यातली ती जुनी गाणी आणि जुना गणेशोत्सव तेवढा येतांना आठवणीने घेऊन ये...! . bdw आमचा बाप्प...

Ashatai Bhosale

Image
आशाताई आणि लतादीदी या दोन नक्षत्रांनी साठ ते नव्वदच्या दशकातील अनेक गाणी अजरामर केलीयेत... लतादीदीँनी शांत प्रकृतीच्या गाण्यांना साज दिला, तर आशाताईँनी आपल्या सहज वळणाऱ्‍या, गोड आवाजाने शांत प्रकृतीच्या गाण्यांपासून डिस्कोच्या मेलोडीज् पर्यँत गाण्यांमध्ये प्राण ओतला... आशाताईँनी स्वरबद्ध केलेलं प्रत्येक गाणं कालातित झालं... तेव्हापासून आत्तापर्यँत प्रत्येकाच्या ओठांवर रुळलंय. अर्थात त्यांना गाण्यात आणि आयुष्यातही पंचमदांच्या संगीताची तेवढीच भक्कम साथ मिळाली. . गाण्यासाठी आशा  भोसले नसून आशा भोसलेँसाठी गाणं झालं. चूरा लिया है, आगे भी जाने ना तू, झूमका गिरा रे, आओ हूजूर तुमको, दम मारो दम, दिल ने जिसे अपना कहा सारखी शेकडो हिँदी गाणी... एकाच या जन्मी जणू, मी मज हरपूर, अरे खोप्यामंदी खोपा, उठी श्रीरामा, उष:काल होता होता, किती सांगू मी सांगू कुणाला सारखी अनेक मराठी गाणी आशाताईँच्या स्वरस्पर्शाने एव्हरग्रीन झालीय. . पुण्यात एका कार्यक्रमावेळी आशाताई आलेल्या. त्यावेळी धडपडत-गर्दीतून वाट काढत काही क्षणांसाठीच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं... आणि त्यांच्या हातांचा स्पर्श पाठीवर होताच माझ्या...

Gurupornima 2015

तीन-चार वर्षाँपूर्वी कुठल्याश्या कारणानं भांडणात रागाच्या सर्वोच्च स्ट्रोकला शेजारच्या काकूंना काहीतरी भलतं बोलून बसलो... आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांसमोर मम्मानं मला एक सणसणीत कानाखाली ओढली... त्यानंतर पुन्हा कितीही राग आला तरी कंट्रोल करायला शिकलोय...!! . काही कारणानं एका कस्टमरचा प्रॉडक्ट देण्यासाठी उशीर होत होता... ते इतकं फायद्याचं नाही म्हणून मी चालढकल आणि टाळाटाळ करत होतो... साधारण महिन्यानं त्याचं काम झाल्याचं कळालं... माझ्या आजोबांनी माझ्या नकळत स्वत: लक्ष घालून ते काम  पूर्ण करुन दिलं... मला माझी लाज वाटली. आणि आजोबांना सॉरी म्हणून, त्यानंतर कुठलंही काम वेळेतच पूर्ण करण्याची स्वत:ला सवय लावली...!! . अंधाराची मला खूप भिती वाटायची... लाईट बंद झाले तरी त त फ फ व्हायचं... एक दिवस पप्पांनी माझी एक महत्वाची वस्तू लपवली... इतर सगळे Options Lock केले... आणि ती वस्तू घेण्यासाठी करो या मरो प्रमाणे अंधाऱ्‍या खोलीत पाठवलं... त्या दिवशी पहिल्यांदाच घाबरत घाबरतच अंधारात उडी घेतली... And yes ! मी करु शकलो... भिती गायब !! पप्पांमूळे आत्मविश्वास आला... नंतर कधीच कुठलीच भिती राहिली नाही...!...

Kalaam and I

Image
मी आणि कलाम मी सहावीत असतांना कलामांची तोँडओळख झालेली. वृत्तपत्रांतून, टिव्हीवर ते राष्ट्रपती झाल्याच्या बातम्या वाचलेल्या... तेव्हा कुणीतरी विलक्षण हूषार माणूस राष्ट्रपती झाल्याचं फक्त कळत होतं. नंतर हळू हळू त्यांचं कार्य, विद्यार्थ्याँविषयीची भावना आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टी समजत गेल्या. राष्ट्रपती म्हणून ते खूप चांगलं कार्य करतायेत असं ऐकू येत होतं. मध्ये मध्ये व्हिजन २०२० कानावरुन जात होतं. . त्याचदरम्यान "अग्निपंख" ऐकण्यात आलं... विज्ञानाची आवड, वैज्ञानिकांबद्दल कुतूहल  आणि कुणी विचारलं तर सांगता यायला हवं यासाठी ते पुस्तक मिळवून वाचून काढलं... कलामांचं गारुड झालं... Kalaam and kids, And dream comes in true, Kalaam and Me वाचण्यात आलं... आणि डॉ. कलाम या माणसानं मला अक्षरश: वेड लावलं... ISRO, रामेश्वरम, मिसाईल्स, पोखरण, न्यूक्लीअर पॉवर आणि २०२० या गोष्टीँची पारायणं सुरु झाली... या विलक्षण माणसाला आयुष्यात एकदातरी भेटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली. . ते राष्ट्रपतीपद सोडतांनाचा दोन बॅग्जबरोबरचा फोटो पाहून कलाम हे माझ्यासाठी आयडॉल पासून देवतूल्य झाले... . कलामांचं शक्य त...

Kalaam and I

Image
मी आणि कलाम मी सहावीत असतांना कलामांची तोँडओळख झालेली. वृत्तपत्रांतून, टिव्हीवर ते राष्ट्रपती झाल्याच्या बातम्या वाचलेल्या... तेव्हा कुणीतरी विलक्षण हूषार माणूस राष्ट्रपती झाल्याचं फक्त कळत होतं. नंतर हळू हळू त्यांचं कार्य, विद्यार्थ्याँविषयीची भावना आणि विज्ञाननिष्ठता या गोष्टी समजत गेल्या. राष्ट्रपती म्हणून ते खूप चांगलं कार्य करतायेत असं ऐकू येत होतं. मध्ये मध्ये व्हिजन २०२० कानावरुन जात होतं. . त्याचदरम्यान "अग्निपंख" ऐकण्यात आलं... विज्ञानाची आवड, वैज्ञानिकांबद्दल कुतूहल आणि कुणी विचारलं तर सांगता यायला हवं यासाठी ते पुस्तक मिळवून वाचून काढलं... कलामांचं गारुड झालं... Kalaam and kids, And dream comes in true, Kalaam and Me वाचण्यात आलं... आणि डॉ. कलाम या माणसानं मला अक्षरश: वेड लावलं... ISRO, रामेश्वरम, मिसाईल्स, पोखरण, न्यूक्लीअर पॉवर आणि २०२० या गोष्टीँची पारायणं सुरु झाली... या विलक्षण माणसाला आयुष्यात एकदातरी भेटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली. . ते राष्ट्रपतीपद सोडतांनाचा दोन बॅग्जबरोबरचा फोटो पाहून कलाम हे माझ्यासाठी आयडॉल पासून देवतूल्य झाले... . कलामांचं शक...

Drinkers

Image
आज घडलेला किस्सा... . ऑफीसमधले एक काका, इतरांची भांडणं सोडवणं आद्यकर्तव्य मानतात. त्यांना आज विनाकारण बेवड्यांचा मार बसला... . रस्त्यावर दोन बेवड्यांची कुठल्याश्या राजकीय मुद्यावरुन हाणामारी सुरु होती. दोघंही फूल्ल्ल !! त्यामुळे बाकीचे मज्जा बघतांय. काकांना भांडण सोडवण्याची हुक्की आली... काकांना नको... नको... करत असतांनाच, भाषण सुरु झालेलं. "हा सभ्य लोकांचा रस्ता, इथे दारु घेऊन धिँगाणा करायचा नाही, हे काय तुमचं घर आहे का, निघा इथून वगैरे..." बेवड्यांनी आधी दुर्लक्ष केलं... पण , . एव्हाना मुद्दे पटून दोन्ही बेवड्यांचं एकमत झालं... गळ्यात गळे घातले गेले ! पण काकांची गाडी सुसाट... उत्साहाच्या भरात एका बेवड्याची गचांडी पकडून बसले... आणि ते सहन न झाल्यानं दुसऱ्‍यानं चारचौघात काकांना थोबाडीत लगावली आणि एक सणसणीत टप्पू ओढला... बस्स्स ! खेळ खल्लास...!! एकमेकांचे जीव घ्या भxxनो... गाल चोळत काका गाडीला किक मारुन रस्त्याला...!! पब्लीकला फुकटात डबल शो मिळाला. . मोरल ऑफ द इंसिडन्स... चुकूनही बेवड्यांच्या नादी लागू नये... मार पडू शकतो... Bewde... Bewde astat...!!  :-D   :-D

Roja

(मी हिँदू आहे. आणि पुर्णपणे हिँदूत्वाचा पुरस्कर्ता आहे. खालील स्टेटसचा विपर्यास करुन भलता अर्थ लावू नये आणि विषय भरकटवण्याची समाजसेवा करु नये.) . मुस्लिमांचे रोजे या प्रकाराबद्दल मला खूप वर्षाँपासून उत्सुकता आहे. आणि कौतूक सुद्धा. त्यांच्यातले काही लोकं एरव्ही वर्षभर कितीही वाईट वागत असले तरी रमजानचा पूर्ण महीना त्यांच्यातला संयम वाखाणण्याजोगा असतो. पूर्ण दिवसभर पाण्याचा थेँबही न घेता किँवा काहीच न खाता राहणं वाटतं तितकं सोप्पं नक्कीच नाही... एक महीना ते पुर्णपणे त्यांच्या दे वाला समर्पित असतात. कुठलेच पापं करत नाही, रमजानच्या काळात कुठलेच शारिरीक संबंध प्रस्थापित करत नाहीत, सेहेर आणि इफ्तारच्या वेळा पाळणं... पाच वेळा नमाज पठण करणं हे किमान महीनाभर काटेकोरपणे पाळतात. आणि म्हणूनच त्यांच्यातली धार्मिक कट्टरता टिकून आहे. . तेच आपल्यातले बरेच लोक चार्तुमासात, श्रावणात कांदे-लसूण-मांसाहार वर्ज्य असूनही कंट्रोल राहत नाही म्हणून त्याला थोतांड वगैरे म्हणत खातातच. एकादशी, चतुर्थी, नवरात्रात तर उपवास म्हणून साबुदाण्याचे पदार्थ, राताळे, बटाटे वगैरे पोट दुखेपर्यँत दुपटीनं हाणतात... फक्त दत्तजयं...

Childhood

सोसायटीत काही लहान मुलं क्रिकेट खेळत होती... खेळता खेळता छोटाश्या कारणाने भांडण झालं... एकमेकांच्या गचांड्या पकडून पार पटकून पटकून आपटणं सुरु होतं... दे दणादण... . इतक्यात बर्वे काका आले... बर्वे काकांचा सोसायटीच्या लहान पोट्याहोत कड्डक दरारा... त्यांना पाहीलं की पोरं जागा मिळेल तशी धूम ठोकतात... काका नजरेस पडताच बाकीची टिम गुल... आणि स्वत:च्याच तंद्रीत प्रदीर्घ भांडत असलेल्या दोघांपैकी एकाचं लक्ष तिकडे गेल्यावर "हिटलर काका आले... पळ" म्हणत एका क्षणात धूम ठोकली... आणि दुसऱ्‍यानं आऊटहाऊसमागे लपण्यासाठी एकमेकांना कव्हर केलं... काही क्षणांपूर्वी यांच्यात महायुद्ध रंगलं होतं, अशी शंकाही येणार नाही...!!  . लयीच भारी... अश्या भन्नाट लहान लहान घटना मोराच्या जादुई पिसासारखं बरंच काही करुन जातात... :-):-):-)

Parshuram Jayanthi 2015

लहान असतांना जेव्हापासून समज आली तेव्हापासूनच "आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याला इतरांपेक्षा वेगळी कामं करायची असतात" असा एक समज मनावर बिँबवलेला...! शिव्या देऊ नये, इतर मुलं बोलतात त्यापेक्षा आमची भाषेची चाल वेगळी का ? या पासून ते रोज संध्याकाळी नित्यनियमे शुभंकरोती, गणपतीअथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आई किँवा आज्जी म्हणायला सांगते, ते माझं तोँडपाठ आहे पण इतर मित्रांना ते कां माहीत नाही असे बाळबोध प्रश्न पडायचे... आठव्या वर्षी मुंज झाल्यानंतर तर ते ब्राह्मणत्व ऑफीशिअली अंगात भिनलं.. . अंगावर जानवं घातल्यानं, ते कानात अडकवतांना किँवा जेवतांना चित्रावती घालतात हे फक्त आपणंच करतो या इतरांपेक्षा वेगळ्या गोष्टी कळल्या... न आणि ण चा फरक, खाद्यसंस्कृती, समाजस्थान, सौम्यपणा, शिस्त कलासंस्कृती यापासून विवाह-मृत्यूविधी पर्यँतचा ब्राह्मण आणि इतरांमधला फरक कळायला लागला. वयापरत्वे ते ब्राह्मणत्व बोलण्यात, वागण्यात, जगण्यात पुरेपूर भिनलं... मी ब्राह्मण या सर्वश्रेष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कृत, विद्वान धर्मात जन्माला आलोय. मला ब्राह्मण असल्याचा गर्व नाही "अभिमान" आहे. जय परशूरा...

Unfortunate Fact

माझ्या ओळखीतल्या एका माणसानं त्याच्या वृद्ध आईला छळ छळ छळला... जेवायला देत नव्हता, मारहाण करायचा, राहण्यासाठी घराशेजारीच उघड्यावरच पलंग टाकलेला. बाकी औषधाच्या आणि कपड्यांच्या नावे बोँबच ! एकूण खुप हालच केले... (बऱ्‍याचदा त्या आजी इतरांच्या उष्ट्या ताटातलं खातांना मी स्वत: पाहीलंय... आणि तेव्हा यथाशक्ती मदतही केलीय.) पाच-सहा महीन्यांपूर्वी त्या आज्जी देवाघरी गेल्या. आज इतक्यातच तो माणूस खंगलेला, आजारानं वैतागलेला आणि शरीरानं अर्धा झालेला दिसला. लंगडत चालत होता. मी मुद्दामच गाड ी थांबवून चौकशी केली... मधुमेह, किडनीचे प्रॉब्लेम्स, सांध्याचे विकार अश्या अनेक आजारांनी त्याला धरलं आहे. दर दोन दिवसांनी डायलेसिसिस करावं लागतंय... आणि ना धड जगतंय ना मरतंय अश्या पंथाला लागलाय... त्याला तोँडावर ohhhh... hmm... असा रिप्लाय केला, पण माझ्या मनातल्या मनात "तू त्याच लायकीचा आहेस xxxच्या... स्वत:च्या कर्माची फळं भोगतोय..." असा आसुरी विचार त्या आजीँच्या दुर्देवी चेहऱ्‍यासोबत आला...! मी चूक की बरोबर कळत नाहीय...!!

Real life in Real

मला नेहमीच एक प्रश्न पडतो... म्हणजे पहा ना, मराठी-हिँदी चित्रपट, मालिका एका स्क्रिप्टनंतर संपतात... पण त्यातली पात्र चित्रपट-मालिकेच्या पल्याड खरंच्च आहेत असं मानलं तर चित्रपट-मालिका संपल्यावर त्यांचं पुढे काय होत असेल ? म्हणजे शोले मधला ठाकूर, विरु-बसंतीला रेल्वेत बसवून घरी गेल्यावर राधाशी काय बोलला असेल ? विरु-बसंतीचं पुढचं आयुष्य कसं असेल ? ते रामगढला येऊन ठाकूरला भेटत असतील का ? हम आपके है कौनमध्ये मोहनिश बहल पुढे आयुष्यभर तसाच विधूर असेल की दुसरं लग्न केलं असेल ? अशी ही बनवाबनवीमध्ये घरमालक आज्जी मेल्यानंतर ते घर अशोक सराफ अॅन्ड कंपनीकडेच असेल कां? कि विजू खोटेँनी घेतलं असेल ? अ.स अॅन्ड कंपनी पुढे सेट झाली असेल की नाय ?  चार दिवस सासूचे मधली म्हातारी मेली की अजून तश्शीच धडधाकड आहे ? एका लग्नाची दुसरी गोष्टच्या राधा-घनाला मुलबाळ झालं असेल ना ? श्रीमंत दामोदरपंतच्या दामूचं लग्न झालं की नाही ? लगानच्या भूवननं पुढे क्रिकेटची प्रॅक्टीस चालू ठेवली असेल की बंद केली असेल ? गावानं भूवनचा सत्कार केला असेल का ? कुछ कुछ होता है मधला अमन शाहरुख-काजोलच्या घ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved