तृप्ती देसाई

= तृप्ती देसाई =
महिलांना शनी मंदीराच्या चौथऱ्यावर चढून दर्शन घेवू द्या, त्र्यंबकेश्वरात गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्या अश्या साध्या अजेंडयावर या बाईनं अख्खं राजकारण, समाजकारण ढवळून काढलंय. मुद्दा चूक की बरोबर हा विषय बाजूला, पण एकाच मुद्यावर राजकीय, सामाजिक, न्यायालयीन लढा देत लोकांना विचार करायला भाग पाडलंय. वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी तृप्ती देसाईंनी लढा उभारला. शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरला मार खाऊन पण, त्या परत तिथे गेल्याच. तृप्ती देसाई मराठी केजरीवाल बनू पाहताय. एक स्त्री म्हणून ही धडपड नक्कीच कौतूकास्पद आहे.
.
आधी त्या मला नास्तिक वाटायच्या. पण एका बाईट दरम्यान ऑफीसमध्ये स्वामी समर्थ, गणपती, लक्ष्मी दिसले आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला. त्यांचा लढा जातीय नसून पूर्णपणे स्त्री - पुरुष समानतेचा आहे याबद्दल. स्थानीक प्रथा मोडायचा प्रयत्न चुकीचा आहे, पण मुद्दा पटल्याशिवाय संपत नाही.
.
तृप्ती देसाईंचा भूतकाळ, राजकीय पिंड काहीही असू देत, त्यांच्यातला धीटपणा नक्कीच कौतूकास्पद आहे. बाकी स्थानीक प्रथा मोडण्याच्या नादात त्या मार खाताय हे मात्र आवश्यक आहे. समर्थनाविषयी दूमत असलं तरी आदर मात्र आहे.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved