Funda For Happy Life

काल दिवसभर एक प्रयोग केला. ठरवूनच ! आणि त्याचा फायदा झालाय, अनपेक्षित अनूभव आले.
.
कोट्यावधी जीवांशी स्पर्धा करून मी जन्माला आलो. आणि त्यानंतर हे साठ सत्तर वर्षांचं आयुष्य मिळालंय. जे आता जगतोय. यामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा, त्या एकूण आयुष्यातल्या क्षणांपैकी एक आहे. ज्यावर पूर्ण हक्क माझा आहे. मी येणारा प्रत्येक क्षण अनुभवायचं ठरवलं. मला त्यातून माझ्यासाठी त्यावेळचा सर्वोच्च आनंद काय मिळेल ते आणि तेवढंच मनापासून केलं.
दोन गोष्टी केल्या
येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं स्वागत केलं...
आणि मला स्वतःला, मला काय वाटतंय याला प्रायोरिटी दिली.
अगदी महत्वाचं काम टाळून झोपावसं वाटलं तर बिनधास्त झोपलो.
.
काय झालं ?
१. संध्याकाळपर्यंत कुणाशीच वाद झाले नाही.
२. सगळी ठरवलेली कामं विनातक्रार "पूर्ण" झाली.
३. दिवसभर फ्रेश वाटलं.
४. माझ्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी समजल्या.
५. इतर कुणाबद्दलची उठाठेव पडली नाही. त्यामुळे वाईट वाटणं, त्रासांचं देणं घेणं वगैरे भानगडी नव्हत्या.
६. अनेक गुंतागुंतीचे प्रॉब्लेम्स खूप सहज सुटलेत. उत्तरं सहज सापडली.
कालचा दिवस खरंच जगलोय असं वाटलं... पहिल्यांदाच...!
.
आणि दोन -
दिवसभरात जे जे खाल्लं, पाण्यापासून जेवणापर्यंत त्या प्रत्येक घासाचं / घोटाचं मनःपूर्वक स्वागत केलं. प्रत्येक कण/थेंब पूर्ण लक्षपूर्वक घेतला...
कारण त्यातूनच रक्त तयार होतं... शक्ती येते...
आणि त्या येणाऱ्या शक्तीचं स्वागत कम आवाहन केलं.
दिवसभर फ्रेश वाटायला हे सुध्दा एक महत्वाचं कारण होतं. काल खरंच फुल्ल वाटत होतं...
.
ट्राय इट वगैरे नाही सांगत पण, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचं आणि पोटात जाणाऱ्या प्रत्येक थेंबाचं / कणाचं आनंदाने स्वागत करा... प्रत्येक क्षणाकडे, घासाकडे, घोटाकडे पूर्ण लक्ष द्या.
आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त लक्ष द्यायला हवं.
- तेजस कुळकर्णी.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved