Gudhhipadva

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, जीव निर्माण केले तो हा दिवस... एका अर्थाने आपला हॅप्पीवाला बर्थडे...
कारण आपली खरी उत्पत्ती त्याचदिवशी झाली होती, नंतर फक्त अवस्था बदलत गेल्या..
.
हा दिवस साजरा करण्यासाठी "ब्रह्मध्वज" म्हणजेच गुढी उभारली जाते... ब्रह्मध्वज हे हिंदू धर्मात मांगल्याचे प्रतिक आहे... प्रत्येक शुभप्रसंगी घरावर ध्वज असावा... कारण हे घराच्या सौभाग्याचं लेणं आहे . घरावरचा ब्रह्मध्वज अनिष्ट गोष्टींपासून आपले रक्षण करतो...
.
रामचंद्रांनी अयोध्येत परत येण्यासाठी हाच दिवस निवडला होता....
.
आज गुढी सोबत भगवा ध्वज घरावर लावा. आणि सदैव राहू द्या. त्याची बह्मध्वजरुपात पुजा करा...
ब्रम्हध्वज नमस्तेSस्तु सर्वाभिष्ट फलप्रद|
प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ॥

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved