Posts

Showing posts from 2018

गुरुचरीत्र पारायण

Image
अनुष्ठानाने अनुभव येतो  आणि अनुभवाने अनुभूती... गुरुचरीत्र पारायण हा अनुभूतीचा मार्ग आहे... सात दिवस तन-मन-विचार-आचार एकरुप करुन विचारांच्या पल्याड असलेली मन:शांती मिळते... ते बळ पुढचं पुर्ण वर्षभर प्रवासासाठी कामी येतं... आपण गुरूंच्या सानिध्यान आहेत, त्यांच्यावर सोडलंय - ते सांभाळतायेत ही जाणिव राहते... .. "दत्त" या देवतेने माझी नौका भरकटू दिली नाही... काही वेळा प्रवाहाच्या उलटं चालायला लावलं, प्रसंगी वादळंही दाखवले, तडाखे देवून पैलतिरादिशेने ढकललंही... पण सांभाळून घेतलं... मार्ग दाखवला... त्या मार्गावर सद्गतीने चालण्याचं बळही दिलं... आणि ते देतांना गर्वाने फुलू दिलं नाही की संकटांनी फुटू दिलं नाही... पैसा कमवायचा ? कमव... पण मातू नको ... प्रसिद्धीच्या मागे पळ - पण उतू नको... दत्तगुरूंना गाणं खुप आवडतं - म्हणून त्यांच्यासमोर कुणीही जावून धांगडधिंगा केला तर चालणार नाही, तालात रहायचं...! .. सात दिवस - काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ या षड्रिपूंना आपोआप दूर ठेवलं जातं... स्वतःवरचं नियंत्रण जाणवतं, भक्कम होतं... परमात्मा-शक्ती यांसह एकरूपता होते आणि वाचा-वाणी-वि...

Brahman Reservation (ब्राह्मण आरक्षण)

ब्राह्मण आरक्षण... #ब्राह्मण_आरक्षण .. पहिला मुद्दा : आरक्षण इतकं सहज मागितल्याने आणि इतकं लगेच मिळत नाही... सरकार स्तर ते कोर्ट असं लढावं लागतं... त्यातही व्यापक स्तरावर लढा उभारावा लागतो... माणूस ते माणूस प्रत्येकजण त्यात सहभागी व्हावा लागतो... बरंच मोठं प्रकरण आहे... आत्ता मागणी केली, अखंड आणि प्रभावीपणे लढलं तर माझ्यासारख्या पंचवीस ते तीस दरम्यान असणाऱ्‍या मुलांच्या मुलांच्या मुलांना आरक्षण मिळू शकतं... आणि प्रत्यक्ष्य फायदा त्यांच्या मुलांना...!!  . आरक्षणाची गरज आहे कां ? - आरक्षणाची नाही पण आर्थिक आधाराची आणि सामाजिक सुरक्षेची गरज ग्राउंड लेव्हलवर खरंच आहे. (ग्राउंड लेव्हल : शहरी मध्यमवर्गीय आणि त्याखालील स्तर, ग्रामीण भागातील ब्राह्मण, शेतकरी) शिक्षणासाठी फि देणं बऱ्‍याच लोकांना परवडत नाही हे एकदम सत्य आहे... आणि त्यामूळे नोकरी व्यवसायात ब्राह्मण मुलं कमी पडतात. पिढी दर पिढी कुटूंबचं कुटूंबे गरीबीत राहतात.  . आरक्षणाचा विचार केला तर जो समाज मागासवर्गीय आहे त्या समाजाला आर्थिक, सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देतात. मराठा आरक्षणादरम्यान दि...

Bank, Me and PMO

एटीएमच्या सात हजाराचं प्रकरण फायनली सुटलं... . मागच्या एका पोस्टमध्ये म्हणालो तसं - एटीएममधून सात हजार काढायला गेलो आणि निघाले नाही, पण बॅँकेच्या खात्यातून डेबिट झाले... मग मी बॅँकेकडे तक्रार वगैरे केली पण त्यात यश मिळालं नाही... हा मुद्दा... अब आगे... . दरम्यान बॅँकेने "प्रिऑर्बीटरी व्हेरीफीकेशन प्रोसेस रिजेक्टेड" असा निर्णय दिला. रिव्हेरीफीकेशन प्रोसेस करायची असेल तर ५९८ रुपये भरा असं सांगितलं... माझे पैसे बॅँकेच्या चुकीनं गेले ते गेले, ते मिळवायच्या प्रयत्न करण्यासाठी मला परत सहाशेचा फटका बसणार होता. त्यावर "मी एक रुपयाही देणार नाही" असं उत्तर पाठवलं...! . नंतर, इथल्या सल्ल्यानूसार मी "बॅँक लोकपाल" कडे तक्रार केली... सगळं प्रकरण व्यवस्थित मांडलं... पण फार चांगला किँवा कुठलाही रिप्लाय मिळाला नाही. त्यांची डेडलाईन संपली... मग ग्राहक मंचाकडे मी रितसर तक्रार केली...  . ग्राहक मंचाकडून बॅँकेकडे पाठपूरावा केला गेला... बॅँकेच्या एथोरिटीने "प्रिऑर्बिटरी व्हेरीफीकेशन रिजेक्टेट" अश्या रिप्लायने केस डिसमिसची मागणी केली... आणि ती केस...

दिवाळीची प्रार्थना... देवा...

Image
देवा, माझ्या गरजा भागतील इतका पैसा मला दे, पण तो देतांना मी ऐतखाऊ होणार नाही हे नक्की बघ... मला मिळालेला पै न पै हा फक्त माझ्या प्रामाणिक कष्टाचाच असू दे... मला ते कष्ट करण्याची शक्ती आणि संधी दे... देवा, खूप पैसा मिळाला तरी, मी उतणार नाही, मातणार नाही ही सुबुद्धी दे, गरजवंतावर हुकूमत चालवण्याची आणि कमी पैसा असणाऱ्यांना तुच्छ लेखण्याची दुर्बुद्धी मला होवू देऊ नको... देवा, पैसा मिळवणं हे परमकर्तव्य असूनही, केवळ तो मिळवण्यासाठी मी कुटूंबापासून दूर जाईल, माझी कर्तव्य विसरेन - केवळ पैश्यांमागेच पळेन अशी धारणा माझी होवू देऊ नको - लक्ष्मी चंचल असते ही भावना माझ्यात सदैव जागृत ठेव... देवा, पैशांअभावी माझं कुठे अडणार नाही, आणि पैशांमूळे मी कुणाला नडणार नाही - इतकंच तू दे, पण पैशांमूळे माझ्यातला माणूस संपणार नाही - मी माणसाचा मशिन होणार नाही याची पदोपदी जाणीव करुन देत जा... देवा, गरजेपूरता पैसा तू देशीलच, पण मी येतांनाही रिकाम्या हाती आलो, जातांनाही रिकाम्या हातानेच जाईन - हे मला कधीही विसरू देऊ नको... देवा, मला श्रीमंत कर, पण, माझ्या हातून चार लोकांची पोटं...

चढ-उतार आणि डिल

माझा एक मित्र, पुण्यातल्या घराजवळ रहायचा, मूळ जळगावचा... एमबीए झालेला. २०१६ च्या सुरुवातीला आम्ही सोबतच स्वतंत्रपणे व्यवसाय सुरु केले. त्याने पुण्यात  अकाऊंटस् फर्म सुरु केली, एक सीए सोबत घेवून आरओसी, अकाऊंटस्, म्यूचूअल फंड सल्ला, पॅन कार्ड वगैरे कामं करायचा... नारायण पेठेत एक छोटंसं ऑफीस घेवून व्यवसाय थाटला. दरम्यान मी मुंबईत स्थायीक झाल्यामूळे आणि फार क्षदोस्ती वगैरे नसल्याने हाय-हॅलो शिवाय फार संपर्क उरला नाही...  .. एका कामासाठी पुण्यात आलो आणि अकाउंटस् बद्दलच एक काम असल्यानं मी त्याला फोन केला. काल भेटला...! सुरुवातीला बघितलं तर हा तोच का यावर विश्वास बसला नाही, कारण आधी हत्तीसारखा असणारा आता कुपोषित गाय झाला होता... "अरे काय ? तब्येत वगैरे बिघडली कां ? असा काय झालास ?, कसं सुरुय ? आणि त्याने हॉटेलमध्येच भाड भाड रडायला सुरुवात केली...! मागच्या दिड वर्षातलं अख्खं कर्मकांड ऐकवलं...  .. झालं असं -  व्यवसाय ऐन भरात असतांना एकेदिवशी त्याचा अपघात झाला... त्यात दोन महिने गेले, आणि आपसूक परीणाम व्यवसायावर झाला. दुखण्यातून सावरला, पण आर्थिक घडी बसवता त्याची...

सांगेन गोष्टी युक्तीच्या दोन...

झालं असं,  माझं क्ष नावाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या मुंबईतल्या शाखेतलं करंट खातं आहे... १७ ऑगस्टला पुण्यातल्या य नावाच्या बँकेच्या एटीएममधून मी सात हजार रुपये काढायला गेलो... प्रोसेस केली पण कळालं की एटीएम टेक्नीकली मेलेलं  होतं... त्यामूळे पैसे निघाले नाहीत, पण बाहेर आल्यावर सात हजार बँकेतून वजा झाल्याचा मेसेज आला. प्रथेप्रमाणे तासाभरात कस्टमर केअरला फोन करुन तक्रार दिली... प्रकरण मार्गी लावलं... एक आठवड्यात पैसे परत मिळतील हे सांगितलं गेलं... तक्रार क्रमांक मिळाला.. आठवडा उलटला... पैसे मिळाले नाहीत.  परत फोन केला...  - बँकेच्या होम ब्रांचमध्ये तक्रार द्या... तिथे व्हेरीफीकेशन वगैरे करुन पैसे परत मिळतील... - ठिक !  .. सविस्तर अर्ज लिहीला... त्यावर तक्रार क्रमांक लिहीला,  बँकेचा फॉर्म जोडला आणि दिला...  त्याची ओसी हातात घेतली.... दि. २७ ऑगस्ट २०१८... नियमाप्रमाणे १२ दिवसाच्या आत ! .. नंतर दोन तीनदा चकरा मारल्या. "प्रोसेस सुरु आहे"...! रिमाईंडर पाठवलंय वगैरे वगैरे.. एक महिना उलटला... .. परवा मी सपत्नीक तिथे गेलो... स...

खुनी गणपती Khuni Ganapati

Image
"खुनी गणपती" ... नांव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे... ! फोटोत दिसतंय ते खुनी गणपतीची - खुनी मशिदीजवळ होते ती ऐतिहासिक महत्व असलेली महापूजा...!  . १८९५ मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक १००० वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी विरोध झाला... त्याचं रुपांतर हाणामारीत झालं आणि ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, जखमी झाले... आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वकतले तथा खून पडनात"... या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नांव प्रचलीत झालं...! त्यावेळी ५ दिवस गणपती त्या मशिदीसमोर होता... .. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ब्रिटीशांकडून २२८ रुपये दोन्ही गटांना दिले जातात. आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली. .. दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन ...

शिक्षक दिन

= शिक्षक दिन = ... रफूचक्कर ... अकरावी - बारावीला धुळ्यात असतांना अकरावीचं कॉलेज वगैरे सुरु झाल्यानंतर शोधमोहिम सुरु झाली क्लाससाठी... धुळ्यात भरमसाठ क्लासेस आहेत, एक-एका क्लासमध्ये शंभर स्टुडंटस् एका बॅचला, परत पीसीएमबी वेगवेगळा क्लास - असा पसारा वाढवण्यापेक्षा लहान क्लास, एकाच ठिकाणी सगळे विषय मिळावे ही इच्छा पुर्ण झाली, आणि प्रा. दि. अ. नावाचा माणूस सापडला... धुळ्यात इंदीरा गार्डन पासून थोडं पुढे गेल्यावर प्रमोद नगरच्या अलीकडे एका घराच्या आऊटहाऊसमध्ये ते क्लास घ्यायचे...! .. अॅडमिशन - ओळख वगैरे सोपस्कार पार पडले, आणि क्लास सुरु झाला... साडेचार फूटी वामनमूर्ती, सावळा वर्ण, चेहऱ्यावर हलकंसं हसू, तोंडात सिगारेट आणि खाली लूना... हा माणूस शिक्षक म्हणून जबरदस्त आहे हे पहिल्या तीन-चार दिवसातच समजलं... गणित आणि फिजीक्सवर त्यांची कमांड वर्ल्डक्लास होती... आयआयटी एंट्रन्स क्लासेसला शिकवणारा माणूस अकरावी-बारावीला शिकवतोय - गणित-फिजीक्सचा बेस त्यांनी असा केला, नंतर त्याशिवाय जगणं कठीण वाटू लागलं... Trigonometry खेळणं वाटायचं... दरम्यान मी, गणेश, मनोज, निखील आणि एक ज्यु. राज ठाकरे, बाक...

अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpeyi

Image
दि. २८ मे १९९६, संसदेत एक ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता... संसदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातली एक महत्वपूर्व घटना घडणार होती... सभापती होते पी. ए. संगम्मा. अनेक पक्षांचा टेकू घेऊन निर्माण झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला बहूमत सिद्ध करायचं होतं, ऐनवेळी धोका झाला - आणि बहूमत नसल्याचे जाणून वाजपेयींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला... पण तत्पूर्वी त्यांच्यावर घोडेबाजाराचा आरोप केलेल्या काँग्रेस सरकारची संसदेतच पुराव्यासकट न भूतो न भविष्यती अशी पिसं काढून "मै यहाँसे सिधा राष्ट्रपती महोदयके पास अपना इस्तिफा सौंपने जा रहा हूँ".... म्हणत निघाले देखील ! कॉंग्रेस सरकारला तेव्हा बसलेला धक्का इतका जबरदस्त होता, पुढची आठ वर्ष ते त्यातून सावरले नाहीत ... केवळ तेरा दिवसांचं वाजपेयी सरकार पडलं - सुर्यास्त वाटला - पण प्रत्यक्ष्यात ते ढग होते, ते हटले आणि भाजपाचा लख्खं प्रकाश पडला... या रथाचे सारथी होते अटल बिहारी वाजपेयीजी... ! .. १९९८-१९९९ तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो... थोडीफार समज आली, तेव्हा हा देश आहे, यासाठी कुणी एक पंतप्रधान असतात, ज्यांचे फोटो...

श्यामच्या आईचं आज काय करायचं...

Image
*श्यामच्या आईचं आज काय  करायचं.......?*                         _यशोदा सदाशिव साने_  _मृत्यू २ नोव्हेंबर १९१७_  *श्यामची आई* नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला सुरू झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी करतो  आहे. ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या मंत्र्यांची आई नव्हती किंवा एखाद्या राजघराण्यातलीसुद्धा नव्हती.    कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे घरातल्या व्यक्तीसारखे पुजावे हे विलक्षण आहे.              गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. इतर भारतीय स्त्रियांसारखी माजघराच्या चुलीच्या धूरात विझून गेलेली ही आई. नवरा सासू सासरे मुले आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे? वसंत बाप...

दिलीप प्रभावळकर : 75th Birthday

Image
ज्या माणसांशिवाय मराठी चित्रपटसृष्टी अपूर्ण आहे, ज्यांना पडद्यावर बघितलं तरी घरातलं माणूस भेटल्याची जाणीव होते ते दिलीप प्रभावळकर... जन्माला येतांनाच ते आपल्याभोवती प्रभावळ घेऊन आले... मराठी चित्रपटसृष्टीतले बिग बॉस... बघताक्षणी आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बायडिफॉल्ट व्हावा अश्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा, प्रभावळकरांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस... ! .. साडेपाच - सहा फुट उंची, गौरवर्ण आणि चेहऱ्यावर असलेला अभिजात आत्मविश्वास... या रुपासह प्रभावळकर चित्रपटसृष्टीत अवतरले... एखाद्याच्या बाबतीत निसर्ग भरभरुन देतो - प्रभावळकरांच्या डोक्यावरचं टक्कलही त्यांच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावणारं, साजेसं आहे... ! शुद्ध मराठी, कणखर आवाज, न आणि ण, श आणि ष, ट आणि ञ यांतील फरकासह असणारी आणि विरामचिन्हांचा आदर करणारी सुस्पष्ट शब्दफेक, भारदस्त देखणं रुप या बळावर प्रभावळकर मराठी अभिनयातले सुपरस्टार झाले.. .. चि. वि. जोशी लिखीत चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये प्रभावळकरांनी बाळ कर्वे यांच्यासह कोकणस्थ भट चिमणराव साकारले... सत्तरच्या दशकातील मराठी मध्यमवर्गीय माणूस आणि मित्रासमवेत असणारी त्यांची जुग...

Fact behind Poladpur Accident

Image
मुंबई: पोलादपूर बस दुर्घटनेतून आश्चर्यकारकरित्या बचावलेले कोकण कृषी विद्यापीठाचे अधीक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताचा थरार एबीपी माझावर सांगितला. या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी मीच आहे. अपघात झाला, बस कोसळली त्यावेळी तिथे कोणीही नव्हती. त्यामुळे माध्यमांमधून जे काही अॅनिमेशन किंवा प्रत्यक्षदर्शी म्हणून दाखवलं जात आहे, ते सगळं झूठ आहे. लोकांच्या भावनांशी खेळू नका, वाट्टेल ते दाखवू नका, वाट्टेल ते बोलू नका, असा संताप प्रकाश सावंत देसाई यांनी व्यक्त केला. प्रकाश सावंत देसाई यांनी याबाबत सातत्याने मराठीतील एका वृत्तवाहिनीचे नाव घेतलं. त्या वृत्तवाहिनीने जे घडलं नाही ते दाखवलं. मी उडी मारली, मला दोरी टाकून वर घेण्यात आलं असं सांगितलं जात होतं. पण प्रसिद्धीसाठी ती वाहिनी काहीही दाखवत होती. आमच्या भावनांशी खेळत होती, त्यामुळे प्रचंड चीड, राग येत होता, असं प्रकाश सावंत देसाई म्हणाले. आसपास कोणी नव्हताच, तर ड्रायव्हर मागे बघत होता हे तुम्हाला कसं कळलं? मी प्रत्यक्षदर्शी आहे, मी जे सांगतोय तेच खरं आहे. मातीतून गाडी घसरली ते थेट खाली कोसळली, असं प्रकाश सावंत देसाईंनी सांगितलं. ...

"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !...

Image
"गुरुपोर्णिमा" - मला लाभलेलीे नवी गुरु ... !... ... दि. २० एप्रिल २०१८ - कसं वागावं, कुणाकडे बघू नये, कसं रहावं, काय केल्याने भलं होईल, काय न केल्याने तुझ्यामागे भिती राहणार नाही ... या प्रश्नांचं उत्तर -  "खाली मुंडी घालून गपगूमान ऐकावं त्यातच भलं असतं" या जागतिक मंत्राचा अनुग्रह मिळाला - आणि याच दिवशी आयुष्यात नव्या गुरूंचं पदार्पण झालं... सौ. तेजस्विनी तेजस कुळकर्णी ... ... "तेजसराव सांभाळा"... हे पाठवणीच्या वेळी सासूबाई म्हणाल्या होत्या.... त्यात तेजसराव आणि सांभाळा मध्ये साइलेंट "तुम्हाला स्वतःला" हे होतं, याची फोड सासरेबुवांनी हल्लीच केली... आपल्या माणसाची आपल्याला गॅरंटी असते (पक्षी : त्यांची मुलगी) -  म्हणून तुम्हाला सावध केलं..." - आपल्याला लाभलेली गुरु जबरदस्त आहे याची खात्री पटली ....! ... आई, पप्पा, आजोबा, शाळेतले शिक्षक, स्वतःचे अनुभव या सगळ्यांसह नवी गुरु लाभली आहे... "अहो, ऐक ना" म्हणाली की सरळ खुर्चीवर बसायचं आणि मिळणारं ज्ञान घ्यायचं इतकं सरळ सरळ शिक्षण सुरु आहे !  Jokes apar...

Rajiv Gandhi vs Rahul Gandhi

मला किती ही काँग्रेस नको असली तरीही पप्पू का जाना जरुरी है  Sarang Darshane ह्यांच्या  ब्लॉगवरील लेख आहे... राजीव आणि राहुल…. इंदिरा गांधी यांची हत्या ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी झाली, तेव्हा २० ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले राजीव गांधी बरोबर ४० वर्षांचे होते. मातेच्या दुर्दैवी हत्येनंतर काही तासांतच राजीव यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पुढे राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी धानू या मानवी बाँबच्या साह्याने तामिळी वाघांनी हत्या केली, तेव्हा राहुल तुलनेने खूप लहान होते. १९ जून १९७० रोजी जन्मलेले राहुल आणखी काही दिवसांनी आपला एकविसावा वाढदिवस साजरा करणार होते. राजीव यांची हत्या झाली तेव्हा ते अवघे ४६ वर्षांचे होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द उणीपुरी दशकभराची होती. राहुल गांधी हे आज ४८ वर्षांचे आहेत आणि यातला गेला चार वर्षांचा नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा काळ सोडला तर त्याआधीची सलग दहा वर्षे संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता होती. दहाही वर्षे डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान होते. इंदिरा गांधी जानेवारी १९८० मध्ये पुन्हा सत्तेवर आल्या. २३ जून १९८० रोजी राजकारणात असणारे धाकटे...

सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती

Image
सुमित्रा महाजन : लोकसभा अध्यक्ष... संयममूर्ती...! .. कुठलंही अधिवेशन हे लोकसभा - राज्यसभा सभापतींच्या समोर घडतं... राज्यसभेचे पिठासीन सभापती हे मा. उपराष्ट्रपती असतात, तर लोकसभेचे सभापती हे निवडून आलेल्या सदस्यांतून निवडतात... ! .. १६ व्या लोकसभेच्या सर्वोच्च पदावर एक महनीय व्यक्ती आहेत... सुमित्रा महाजन... माहेरच्या सुमित्रा साठ्ये... वय वर्ष ७५  ... ! सद्यस्थितीत भारतातील एकमेव महिला ज्यांनी सर्वात जास्त काळ लोकसभेत पद भूषवलं... १९८९ पासून आजपर्यंत त्या लोकसभेत आहेत... .. ही म्हणावं तर सगळ्यांत संवेदनशील, धगधगती लोकसभा.. सरकार ते विपक्ष सगळेच अतंरगी... पण या सदस्यांना फक्त नजरेच्याच धाकात ठेवण्याचं कसब त्या अनूभवातूनच असावं... वर्गात शिकवणाऱ्या बाई समोर आल्यानंतर सगळी पोरं जशी गप्प बसतात तसाच धाक सगळ्या सदस्यांना महाजनांचा वाटतो... .. आज तर खरा कस लागण्याचा दिवस, त्यातही सदस्यांना ओरडून शांत करणं - रा.गा.ला कडक शब्दांत समज देणं - अनावश्यक मुद्दे खोडून काढणं - निःपक्षपणे, तटस्थपणे सगळं सांभाळणं - हसत खेळत, मर्यादा सांभाळून सभागृह चालवणं - आणि न थकता, न कंटाळत...

Lesson

एखादी गोष्ट घडली, दुर्देवानं हरलो - काहीतरी गमावलं - त्रास झाला - किंवा धडपडलो ... तर नुकसान झालं असं समजू नका - त्यातून आपण लाखमोलाची गोष्ट कमावलेली असते... ... "धडा"... ! .. तो कसा घ्यायचा हे फक्त व्यक्तीसापेक्ष असतं !

CCTV

घरी बायको असतांना सीसीटीव्हीची गरज पडत नाही - जागरुक रहावंच लागतं ... ती दोन कप चहा पितांना, ओला टॉवेल चुकून बेडवर ठेवला तर, थोडाफार पसारा झाला तर, कप फुटल्यावर, सोफ्यावरच कव्हर विस्कटलं तर - फुस्स्स करुन नारद मुनी प्रकट होतात तसं कुठूनही प्रकट होते... आणि, ..... .... ... .. . पुढचा अर्धा पाऊण तास फैलावर घेते - ... त्यामुळे मी हल्ली घाबरून घाबरून राहतो... ! ..

Opportunity only knocks once : Business Lesson

माझी कंपनी टिके टेक्नॉलॉजी मध्ये एक प्रोजेक्ट २०१६ च्या शेवटी आम्ही दोघांनी सुरु केला... तेव्हा कंपनी सुरु करुन अवघं एक वर्ष झालेलं, तितकासा अनुभव नाही, छोटासा प्रोजेक्ट मिळाला तरी आकाश ठेंगणं व्हायचं... आणि त्यात तो प्रोजेक्ट म्हणजे तेव्हाच्या मानानं उंच उडी म्हणावा तसा... तेव्हा संपूर्ण कंपनीची टिम साईज होती ६ ... ! माझा एक मित्र ती कन्सेप्ट घेऊन आलेला... कन्सेप्ट आवडली... मिटींग झाली, माझे ६०- त्याचे ४० मध्ये ठरलं.. मी, तो मित्र आणि डेव्हलपमेंटचे दोघं अश्या चौघांच्या टिमनं त्या प्रोजेक्टवर काम करणं सुरु केलं ...! ... स्वतःचा कुठलाही लाँग टर्म प्रोजेक्ट किंवा प्रॉडक्शन म्हणा हवं तर (दुसऱ्यांचे प्रोजेक्टस् घेऊन त्यावर काम करणं नाही, हे स्वतःचं...) सुरु झाल्यानंतर किमान ६-८ महिने प्रॉफीट दूर, अडकवलेल्या कॅपिटलचं तोंड दिसत नाही... प्रॉफीट वगैरे निघत किमान वर्ष जातं... लाँग टर्म प्रोजेक्ट मूळातच लाँग टर्म असल्याने त्याचं यश-अपयश कळायला किमान एखादं वर्ष लागणार हे गृहीत असतं - एखादं बाळ जन्माला घातल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने शर्ट-पॅन्ट घालून ऑफीसला जावं आणि पैसे कमवावे हे जितकं अशक्य ...

पगडी

आत्ताच पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकानं टिळक पगडी न वापरता गोल गोल पागोटं वापरावी असा सल्ला दिला ... त्यामुळे दोन गोष्टी झाल्या .. एक : टिळक पगडी ज्या डोक्यावर हवी त्या डोक्याची तितकी बौद्धीक पात्रता हवी... कारण टिळक पगडी ही विद्ववत्तेची दर्शक आहे... ती विद्वत्ता कॉमन नाही... पुणेरी पगडी धारण करणारी व्यक्ती ही त्या लायकीची असावी ! .. दोन : काही गोष्टींची बरोबरी होवू शकत नाही ... त्यामुळे - सुंठीवाचून खोकला गेला, नी बुद्धीवाद्यांना आनंद झाला ! ... राष्ट्रवादी काँग्रेसला २०वा वर्धापनदिन मुबारक !

RIP Dr. Hathi

Image
तारक मेहता मधल्या डॉ. हाथीचा रोल करणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचं ऋदय विकारानं वोक्हार्ट मध्ये निधन झालं. रोजच्या बघण्यातला माणूस असा अचानक निघून जाणं खूप चटका देणारं असतं...  . प्रचंड अवजड शरीर सांभाळत अभिनय, नृत्यात असणारी त्यांची चपळता, संवादफेक, टायमिंग या गोष्टीला तोड नव्हती... कुमार आझाद यांच्या आधी निर्मल सोनी हे डॉ. हाथी या पात्राचा रोल करायचे, पण निर्मल सोनी यांचा करार संपल्यावर आझाद आले आणि त्यांनी डॉ. हाथी म्हणून आपली जागा प्रेक्षकांच्या मनात, घरात पक्की केली. वेळेवर येणं, नियमितता आणि सहकारी कलाकारांना हसत खेळत सांभाळून घेण्याची हातोटी यामुळे कुमार आझाद यांनी प्रत्येकाच्या मनात जागा निर्माण केली होती...  . एखादा माणूस दररोजच्या बघण्यातला असेल आणि त्याचं अचानक जाणं हे जरी खूप चटका देणारं असलं तरीही, जाण्याचं कारण हे देखील धडा देणारं असतं... कवी कुमार यांचं अवाढव्य शरीर हे त्यांची ओळख होती, त्यावरच त्यांना अनेक भूमिका मिळाल्या - आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी त्या फुलवल्या, तरीही - त्याच अवाढव्य शरीराने त्यांचा घात केला... त्यात सिगरेटची सवयही जीवघेणी ठ...

Plastic Ban : Be Alert

प्लास्टिक चेक करायला येणाऱ्या लोकांचं आयकार्ड आधी चेक करा, हा टोळधाडीचा धंदा होईल - प्लास्टिक सापडलं तर भले दंड भरायचा - पण आयकार्ड चेक करुन ती माणसं खरी असल्याची खात्री झाल्यानंतरच ! .. तोतया ट्राफिक पोलीसांना असंच फटकारलं परवा... धुळे - नाशिक हायवेवर मालेगांवच्या अलीकडे रात्री २ वाजता गाडी अडवली, ४-५ पोलीस - काही खाकी वर्दीत आणि काही सिव्हील ड्रेस वर... लायसन्स - (हरकत नाही) दाखवलं ! पेपर्स - (याचीपण हरकत नाही...) दाखवलं ! पीयूसी - (ठीक आहे...) दाखवलं... ! आधार कार्ड - ह्या ? आधार कार्ड कां हवंय ? - ते कम्पलसरी असतं... - कधीपासून ? - नवा नियम आहे ... - आधारकार्ड लागत नाही, आणि माझ्याकडे नाहीय ... - मग २०० रुपये दंड लागेल ... - भरणार नाही, मूळात तुम्ही ट्राफीकला नाही, त्यामूळे तुम्ही अडवूच शकत नाही, आणि अडवलं तरीही आधारकार्ड नसणं हे दंडात्मक नाही... - तुम्हाला भरावे लागतील, किंवा गाडी इथे सोडावी लागेल... - ठिक आहे... तुमचं आयकार्ड दाखवा... मी गाडी सोडतो इथे... पोलीस मुख्यालयात जातो - तिथे दंड भरतो ... - शहाणपणा करतोय ? - तो मी मुख्यालयातच करतो... तुम्ही बेकायदा लू...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved